अरेंज मॅरेज मध्ये बऱ्याचदा असं घडताना दिसून येतं की लग्नानंतर पती-पत्नी दोघांना कळतं की आपण एकमेकांसाठी ठीक नाही आहोत किंवा आपण एकमेकांना नीट ओळखतच नाही. असं होऊ नये म्हणून लग्न ठरताना मुली मुलांना असे काही प्रश्न विचारू शकतात ज्यामुळे भविष्यात संसारात काही स मस्या येणार नाही. वै वाहिक जी वनात शरीर सं बंध महत्त्वाचे पण किती काही दिवसांच्या लैं गि कवर्तनावरून जजमेंटल होणे हा जोडीदारावर अन्यायच नाही का ?
व्यवसायाने इंटेरियर डिझायनर असलेल्या राधाचं लग्न आयटी इंजिनिअर असलेल्या राकेश सोबत झालं. दोघेही चांगले कमवते होते. त्यांचं लग्न ही त्यांच्या घरच्यांच्या पसंतीनुसार झालं होतं. अरेंज मॅरेज पण जरी असलं तरी लग्नापूर्वीच्या एका भेटीतच आपण एकमेकांना चांगले ओळखू शकतो आणि चांगले जोडीदार बनू शकतो असं दोघांनाही वाटू लागलं. लग्नानंतर ते दोघेही काश्मीरला दहा दिवसाचा हनिमून करून परतले आणि घरच्यांना काही कळायच्या आत ते दोघेही सेपरेट झाले.
लग्नाला पंधरा दिवस झाले नव्हते. लग्नाच्या पंधराव्या दिवशीच राधा तिच्या आईकडे निघून गेली. ती कायमचीच …पुढच्या दोन महिन्यांमध्ये राधामध्ये आणि राकेशमध्ये कोणता संवाद झाला नाही. राधाला फोन करायचा प्रयत्न केला होता, पण तिने मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला होता. दिवस असेच जात होते. घरच्यांना काहीच कळत नव्हतं. ते दोघे एकत्र राहत नव्हते. एकत्र नांदत नव्हते. हे कळायला त्यांना कोणताच मार्ग नव्हता. पण समजणार तरी कसं या दोघांच्यात नेमके काय झाले हे त्यांनी कोणाला सांगितलं नव्हतं.
तिसऱ्या महिन्यात मा नसिकदृष्ट्या डिस्टर्ब असलेला राकेश डॉ क्ट रांकडे समुपदेशनासाठी गेला. त्याच्याशी मोकळा संवाद साधण्याचा प्रयत्न डॉ क्ट रांनी केला. काहीसा अबोल, शांत स्वभावाचा राकेश घडाघडा बोलू लागला. काश्मीरला हनि मूनच्या दिवसात राकेश आणि राधा यांचे फिजिकल इंटिमेसी शा रीरिक जवळीकता झाली खरी पण त्यांच्या शरीरांच्या तारा काही जुळल्या नाहीत. राधाला राकेशचा लैं गि कवर्तनात धुसमुसळेपणा जाणवला. राकेश सोबत तिला राहायचं नाही हा निर्णय घेऊन तिने काश्मीर मधून निघतानाच मनात पक्का करून टाकला होता .
राकेश आणि राधा एक असे प्रतिनिधिक उदाहरण आहेत. अगदी खरंखुरं. तुमच्या माझ्यासारखंच. त्यांच्यासारखी अनेक जोडपी लग्नानंतर फक्त पंचवीस ते वीस दिवसाच्या संसारा नंतर विभक्त होतात. लग्न, ह निमून नंतर एका महिन्याच्या आतच विभक्त होणाऱ्या जोडप्यांची संख्या सतत वाढत आहे आणि त्याचं सुरवातीचं प्रमुख कारण आहे जोडीदाराला जज करण्याबद्दल त्याच्याबद्दल आपले मत मांडण्यात किंवा बनवण्यात घाई करणे ! इंटरनेट, मोबाईलच्या आजच्या काळात रोमां टिक- से न्शु अल् -पॉ र्नअसा बहुविध कंटेंट सर्वाना उपलब्ध झाला आहे.
त्यातून ज्याच्या त्यांच्या स्वभावानुसार आवडी-निवडीनुसार प्रत्येकाच्या लैं गि कप्रेरणा, लैं गि कवर्तन प्रभावित होत आहे. लग्न-ह निमूनच्या निमित्ताने आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवायला मिळणाऱ्या आनंदाच्या लाटांसोबत नातेसं बंधाची आव्हान येतात, ती कशी हाताळायची हे माहीत नसल्यामुळे नवीन जोडपी गोंधळतात. मनमोकळ्या संवादाच्या अभावामुळे त्यांची मा नसिक घालमेल होते आणि मग राधा सारखी नववधू नवऱ्याला सोडून जाते.
लग्नानंतरच्या नात्यांमध्ये नवरा बायकोमधील शरीर सं बंधाच महत्व अनन्यसाधारण आहेच ते नाकारून चालणार नाही. म्हणून पूर्वीच्या काळी अगदी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मराठीजनांच्या विवाह पत्रिकेत शरीर सं बं ध करण्याचे योजिले आहे असा स्पष्ट उल्लेख केला जायचा. पण दुसरीकडे, शरीर सं बं ध किंवा लैं गि कवर्तन ही बाब फक्त काही मिनिटांच्या असते, हे सुद्धा विसरून चालणार नाही.
लैं गि कवर्तन हे अत्यंत खासगी, नाजूक, संवेदनशील बाब असली तरी तिच्या पलीकडेही भाव भावनांचं -सुखदुःखाचे- कौटुंबिक नाते सं बं धाच जबाबदारीचे एक खूप मोठ जीवन आहे. आपल्या देशात लग्न हे दोन व्यक्तींमधील जन्म – जन्माचं नातं मानलं जात. लग्न हे असं नातं असतं ज्यात मुलगा आणि मुलगी संपूर्ण आयुष्य एकत्र घालवतात. त्याचबरोबर केवळ मुलगा आणि मुलगी नाही तर दोन कुटुंबे ही त्यांच्या लग्नामुळे एकत्र येतात.
अशा परिस्थितीत जर लग्न ठरलं असेल म्हणजेच नाते सं बं ध तयार होण्यापूर्वी तुम्हाला तुमचा लाईफ पार्टनर बद्दल माहिती नसेल, तर लग्न करण्यापूर्वी नक्कीच त्यांच्याबद्दल जाणून घ्या. पती-पत्नीला एकमेकांना जाणून घेण्यास आणि जी वनाशी जोडून घेण्यास बराच वेळ मिळतो. परंतु काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या लग्नापूर्वी जाणून घेतल्याच पाहिजे. जर तुम्हाला लाइफ पार्टनर बद्दल या गोष्टी आधीच माहीत असतील तर तुम्ही दोघं एकमेकांसाठी योग्य आहात की नाही ?
तुमचा पुढच आयुष्य कस असू शकत आणि तुमच्या जोडीदारासोबत कसं जगायचं आहे हे समजून घेणे सोपे जाईल. जी वनाच आव्हान एक जोडप म्हणून एकत्रितपणे पेलायचं असेल तर नवरा बायकोमध्ये सर्वात आधी भावनिक जवळीक निर्माण व्हायला हवी. ही भावनिक जवळीक लग्नाच्या आधी एकमेकांशी संवाद साधून निर्माण होऊ शकते. खरतर तशी भावनिक जवळीक, भावनिक मोकळेपणा निर्माण झाल्याशिवाय लग्न, ह निमून करण हेच मुळी आजच्या खुल्या समाजव्यवस्थेत चुकीच आहे. नव्या पिढीला हे जेव्हा समजेल तेव्हा त्यांना “सुखी संसाराचे गुपित” उलगडेल.