मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हाती कसे गेले?…काय होत्या या मागच्या घडामोडी…जाणून घ्या अज्ञात असा इतिहास

लाईफ स्टाईल

छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले. याला हिंदवी स्वराज्य असेही म्हणतात. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालावधीत औरंगजेबा विरूद्ध गनिमी कावा वापरून केलेल्या ल ढा यांमुळे सा म्राज्याचा विस्तार वाढला. इ.स. १६८० मधील महाराजांच्या मृ त्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले आणि आपल्या ८ वर्षाच्या कारकीर्दीत स्वराज्याच्या सीमा वाढवल्या, मात्र १६८९ मध्ये फितुरीने औरंगजेबाने त्यांची ह त्त्या केली.

स्वराज्यात काही काळ अस्थै र्य माजले, सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजीराव जाधव सारख्या शूर सरदारांनी स्वराज्याचे अस्तित्व टिकवले. औरंगजेबाच्या मृ त्यूनंतर शिवाजी महाराजांचे वंशज जरी राज्य करत असले तरी पंतप्रधान असलेल्या पेशव्यांनी हिंदवी स्वराज्याच्या सिमा वाढविल्या. पेशवे हे एक उत्कृष्ट सेनानी होते आणि त्यांच्या कारकीर्दीत मराठा साम्राज्य अधिक विस्तार पावले, मराठ्यांचे हे राज्य पेशव्यांकडे गेले कसे असा प्रश्न आपल्या सर्वांच पडत असेल जाणून घेऊयात त्याबद्दलच.

शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे महाराजांच्या मृ त्यु नंतर राजे बनले आणि त्यांनी वडिलांची विस्तार करण्याची नीती चालू ठेवली. राजपूत-मराठा एकी होऊ नये आणि दख्खनातील सुलतानांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी औरंगजेब आपल्या साऱ्या राजदरबाराला आणि ५,००,००० सै न्याला घेऊन दक्षिणेला आला. अपुरे सै न्य व फंद फि तुरी असून देखील संभाजी महाराजांनी १६८१ ते १६८८ अशी यशस्वी झुं ज दिली. या काळात संभाजी महारांजानी एकही किल्ला गमावला नाही की आरमारातले एकही मोठे जहाज मोगलांच्या हाती लागून दिले नाही.

जंजिय्राचे सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज, मुंबईकर इंग्रज, मोगल या चारही आघाड्यांना हा राजा पुरून उरला वतनदारी मिळवण्यासाठी संभाजी महाराजांच्या काही स्वकीयांनी मोगलांशी हात मिळवणी केली, मोगलांना त्यांची माहिती दिली आणि १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज फि तुरीमुळे पकडले गेले. त्यांचा प्रचंड शा री रिक छ ळ करण्यात आला. त्यातच त्यांचा मृ त्यू झाला.

संभाजी महाराजांच्या मृ त्यूचा परिणाम औरंगजेबाच्या अपेक्षेच्या उलट झाला, मराठ्यांनी श रण न जाता त्यापासून स्फूर्ती घेतली व ते अधिक तीव्रतेने ल ढू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी राज्याच्या कोल्हापूर व सातारा अशा दोन स्वतंत्र छत्रपतींच्या गाद्या औरंगजेबाच्या मृ त्यू नंतर इ.स. १७०७ मध्ये निर्माण झाल्या. औरंगजेबाच्या अझमनामक मुलाने शाहूंची सु टका करून त्यांना राजपदाची वस्त्रे व राजपद दिले.

चौथाई आणि सरदेशमुखीसाठी मात्र इ.स. १७१३ पर्यंत मराठ्यांच्या अंतर्गत सं घर्षामुळे त्यांना वाट पाहावी लागली. छत्रपती शाहू महाराज यांचा १२ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेक करून घेऊन विधिवत त्यांना मराठी राज्याचे अधिपती असल्याचे जाहीर केले. त्यांनी सातारा ही राजधानी केली. अष्टप्रधान मंडळ स्थापन करून मातब्बर सरदारांकडे खाती सुपूर्त केली. त्यांनी अनेक गुणी, कर्तृत्ववान व पराक्रमी माणसे निवडून रा ज्य विस्तार केला.

याकामी त्यांना बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव व बाळाजी बाजीराव हे कर्तबगार पेशवे आणि कान्होजी आंग्रे, रघूजी भोसले, दाभाडे, उदाजी चव्हाण यांसारखे कर्तबगार व निष्ठावान सरदार-सेवक लाभले. दक्षिण हिंदुस्थानातील मोगलांचा सुभेदार सय्यद हुसेन अली याने छत्रपती शाहूंबरोबर १७१३ मध्ये तह केला. त्यानुसार मोगलांच्या दक्षिणेतील मुलखावर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतःहून व सूल करावे आणि त्या बदल्यात मोगल मुलखाचा बं दो बस्त करून मराठ्यांनी बादशहास दहा लाख रु. खं ड णी द्यावी आणि १५,००० फौ ज मराठ्यांनी बादशहाच्या मदतीस ठेवावी.

तसेच शाहूंच्या मातोश्री, कुटुंब वगैरेंची दिल्लीच्या बादशहाच्या कबजात असलेल्या आप्तेष्टांची मुक्तता करावी असे ठरले. त्याची शाहूंनी तत्काळ अंमलबजावणी केली. परंतु मोगल बादशहा फर्रुखसियार यास हा तह मान्य नव्हता. म्हणून त्याने सय्यद बंधूंबरोबर यु द्धा ची तयारी केली. सय्यद हुसेन अली बरोबर झालेल्या करारानुसार मराठ्यांची फौ ज घेऊन शाहु महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना दिल्लीला पाठविले. त्यांच्या सोबत राणोजी शिंदे, खंडो बल्लळ, खंडेराव दाभाडे, बाजीराव, संताजी भोसले वगैरे मातब्बर सरदार होते.

हे सर्व सै न्य यथावकाश फेब्रूवारी, १७१९ मध्ये दिल्लीत पोहोचले. याची परिणीती म्हणून सय्यद बंधूंनी फर्रुखसियार यास पदच्युत करून तु रुं गात टाकले आणि रफी-उद्-दरजत यास बादशाही तख्तावर बसविले. सय्यद बंधूंनी या नामधारी बादशहाकडून मराठ्यांना विधिवत सनदा दिल्या. त्यामुळे दक्षिणेतील मोगलांच्या सहा सुभ्यांतून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले आणि छत्रपती शाहूंना स्वराज्याचा सनदशीर हक्क प्राप्त झाला. शिवाय बादशहाच्या कै देत असलेले शाहूंचे बंधू मदनसिंग, मातोश्री येसूबाई यांची सु टका करण्यात आली.

परंतु महाराणी ताराबाई संस्थापित करवीरच्या गादीबरोबरचा म्हणजे छत्रपती संभाजी राजांबरोबरचा सं घ र्ष संपला नव्हता. निजामाच्या मदतीने छत्रपती संभाजींनी छत्रपती शाहूं विरुद्घ मोहीम उघडली. ती आठ-दहा वर्षे चालली. अखेर दुसरा पेशवा पहिला बाजीराव याने निजामाचा पालखेड यु द्धा त पराभव करून ६ मार्च १७२८ रोजी मुंगी-शेगाव येथे तह होऊन छत्रपती शाहू हेच मराठ्यांचे एकमेव छत्रपती असून चौथाई व सरदेशमुखीचा तोच खरा धनी आहे, हे निजामाने मान्य केले.

त्यानंतर छत्रपती संभाजी व छत्रपती शाहू या बंधूंत १३ एप्रिल १७३१ रोजी वारणेचा तह झाला. या तहानुसार वारणा नदी दोन्ही रा ज्यांची सरहद्द म्हणून मान्य करण्यात आली. वारणेच्या तहानंतर कोल्हापूर–सातारा अशी मराठी राज्याची दोन स्वतंत्र संस्थाने (छत्रपतींच्या गाद्या) उभयता मान्य करण्यात आली. तथापि कोल्हापूर व सातारा यांत आपापसांत पुढे अनेक वर्षे सं घर्ष चालू होता. छत्रपती शाहूंना पुत्र संतती नव्हती म्हणून त्यांनी महाराणी ताराबाई यांचा नातू रामराजा उर्फ राजाराम द्वितीय यांना दत्तक घेण्याचे ठरविले.

आणि मृ त्यू पूर्वी रा ज्य कारभार-विषयक सर्व अधिकार आज्ञापत्राद्वारे पेशवे बाळाजी बाजीराव यांना दिले. पुढे छत्रपती शाहूंच्या नि ध नानंतर, इ.स. १७४९ मध्ये राजाराम द्वितीय यांना विधिवत सातारच्या गादीवर बसविण्यात आले. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे व राजाराम द्वितीय यांत २५ सप्टेंबर १७५० रोजी सांगोला येथे करार झाला. सांगोला करारानुसार पेशव्याने छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. बाळाजी बाजीरावांनी त्यांना सालिना ६५ लाख रुपये नेमणूक करून दिली.

राजाराम द्वितीय हे पेशव्यांच्या आहारी जात आहेत, हे पाहून ताराबाईंनी संधी साधून राजाराम द्वितीय यांना कै द केली. इ.स. १७५५ मध्ये बाळाजी बाजीरावांनी ताराबाईंशी समझोता केला, त्यामुळे प्रत्यक्षात ताराबाई रा ज्य कारभार पाहू लागल्या आणि राजाराम यांना फारसे अधिकार उरले नाहीत. पुढे ताराबाईंच्या मृ त्यू नंतर (१७६१) जवळपासचा थोडाबहुत प्रदेश, इंदापूरची देशमुखी एवढाच मर्यादित अधिकार छत्रपतींना राहिला होता. तत्पूर्वीच मराठ्यांच्या स त्तेचे केंद्र पुणे होऊन पेशवे मराठी रा ज्याचे सूत्रधार-सर्वेसर्वा झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *