आपल्याला माहित असेल आणि आपण पहिले देखील असेल कि चालत्या गाडीच्या मागे पळणे ही कुत्र्यांची आवडती सवय असते. चालत्या गाडीसोबत पण त्यांची काय दु ष्मनी असते काय माहीत? पण ते सात ज न्माचे श त्रुत्व असल्यासारखे गाड्यांचा पाठलाग करतात. यामागे काय कारण असेल असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. कुत्रे असे विनाकारण गाडीच्या मागे धावतात हे अनेकांनी अनुभवले असेल.
हे बघितल्यानंतर आपल्याला कदाचित हसू देखील आलं असेल. पण ज्यांच्यावर ही वेळ ओढवते त्यांची पंचाईत झाली असेल. अगदी पूर्वीच्या काळापासून कुत्रा हा माणसाचा अतिशय विश्वासू प्राणी आहे. तो प्रामाणिकपणाचे उदाहरण आहे. आपल्या इतिहासात देखील याचे दाखले पाहायला मिळतील. आजच्या काळात अनेक घरात एक तरी कुत्रा पाळलेला दिसतो.
कोणी हौसेने तर कोणी घरच्या सं रक्षणासाठी कुत्री पाळतात. त्यांच्या प्रामाणिक पणाचे दाखले म्हणजे एखाद्या गु न्ह्याचा तपास करताना पोलिसां सोबत श्वा नपथक असते. वासावरून गु न्ह्याचा तपास करण्यासाठी कुत्रे उपयोगी पडतात. अगदी सै न्यातही यांना मोलाचे स्थान आहे. एकंदरीत हा प्राणी सर्वत्र पाहायला मिळतो काहींना तो आवडतो.
ती लोकं सकाळी आपल्या सोबत त्यांना मॉर्निंग वॉकला नेतात.त्यांना राहायला डॉग हाऊस बनवतात. तर काही लोक कुत्र्याचा खूप ति रस्कार करतात. विशेषत: हा भ टक्या कुत्र्यांचा. जे कायम सायकल, गाड्यांच्या विनाकारण मागे लागतात. तसे करण्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत ते आपण पाहूया.
१- कुत्री मागे लागण्याचे अनेक कारणे सांगितली जातात प्रत्येक जण वेगवेगळे त र्कवि तर्क लावतो. पण यामागचे योग्य व मुख्य कारण आहे ते म्हणजे कुत्रा हा प्राणी ज्या ठिकाणी, ज्या परिसरात ज न्माला येतो. लहानाचा मोठा होतो तो परिसर, तेथील प्रत्येक गोष्ट त्याच्या ओळखीची असते. त्या भागात जर कोणी नवीन व्यक्ती किंवा गाडी दिसली तर त्यांना असु रक्षित वाटू लागतं.
कुत्रा हा प्राणी इमानदार असतो. त्यामुळे तो ज्या परिसरात राहतो, त्या लोकांच्यावर काही सं कट येऊ नये या काळजीने ते वाहनांच्या मागे लागतात. २- कुत्र्यांचा एरिया ठरलेला असतो आणि आपल्या परिसरात दुसरा कुत्रा त्यांना स हन होत नाही. जसं कुत्रा स हन होत नाही तसेच दुसरी गाडी ही त्यांना स हन होत नाही म्हणून ते त्या गाडीचा पाठलाग करतात.
३- अनेकवेळा अपघा तात कुत्रे म रण्याचे प्रमाण खूप आहे. जेव्हा एखाद्या अपघा तात एखाद्या कुत्र्याचा नातेवाईक म रतो तेव्हा त्याच्या म नात गाडीबद्दल रा ग निर्माण होतो, त्यामुळे कोणतीही गाडी दिसली की त्या गाडी मागे ते भुंकत पळत सुटतात. ४- कधी त्यांना एकटे वाटू लागले तर ते वेळ घालविण्यासाठी रस्त्यावरील वाहनांवर व रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांवर भुं कतात.
५- गाड्या चालू झाल्यावर वाहनांमधून जो आवाज येतो त्यामुळे तो आवाज त्यांना एखाद्या प्राण्याच्या गुरगुरूण्या सारखा वाटतो त्यामुळे ते मागे लागतात. ६ – कुत्रे हे निसर्गतः जि ज्ञासू प्रवृत्तीचे असतात त्यामुळे अनोळखी गाडीच्या मागे ते पाठलाग करतात. ७- आपल्या परिसरातील झाडांवर, भिंतीवर व तेथील गाड्यांवर कुत्रे मू त्रविसर्जन करतात. यावरून त्यांना स्वतःची व इतर कुत्र्याची हद्द कळत असते.
८- कुत्रे सं रक्षण करण्यासाठी ओळखले जातात म्हणून आपल्या जागेत आलेल्या अनोळखी लोकांवर किंवा प्राण्यांवर स्वतःचे आणि त्यांच्या टोळींचे र क्षण करण्यासाठी भुंकतात. अशा अनेक शास्त्रीय कारणांमुळे कुत्रे चालत्या गाडीच्या मागे धावतात.