सातबारा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी कुठेही मिळू शकतो. म्हणूनच सातबारा उतारा हा जमिनीचा एक प्रकारचा आरसाच आहे. महाराष्ट्र शा सनाच्या महाराष्ट्र जमीन म हसूल का यदा 1971 अंतर्गत शेतजमिनीच्या ह क्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी रजिस्टर बुक्स असतात.
या रजिस्टरमध्ये कुळांचे मालकी ह क्क, त्यातल्या पिकांचे ह क्क यांचा समावेश असतो. त्याच बरोबर या रजिस्टरमध्ये एकवीस वेगवेगळ्या प्रकारचे गावचे नमुने ठेवलेले असतात. यापैकीच गावचा नमुना नं.7 आणि गावचा नमुना नंबर 12 मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणूनच या उताऱ्याला 7/12 उतारा असे म्हणतात. गाव नमुना नंबर 7 आणि गाव नमुना नंबर 12 हे एकत्र करून त्यातील माहिती सातबाराच्या रूपात दिली जाते.
सबब सातबारा उतारा म्हणजेच गाव नमुना सात व बारा यांमधील उतारा असतो. त्याच बरोबरीने सातबारा उताऱ्यात गावचा नमुना नंबर 6 अ मधील माहिती सुद्धा समाविष्ट केलेली असते. सातबारा उतारा हा जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे हे समजून घेण्यासाठी शा सकीय अभिलेख म हसूल विभागातर्फे दिला जातो. क्रमांक सात व क्रमांक 12 हे जमिनीच्या मालकी ह क्क सं बं धीच्या का यद्यामधील विशेष कलमे आहेत.
उदाहरणार्थ, सखाराम या नावाच्या शेतकऱ्याने त्याच्या मालकीची 1 हे क्टर जमीन 10 जून 2015 रोजी केशव नावाच्या शेतकऱ्यास रजिस्टर खरेदी खताने विकली. रजिस्टर दस्त 10 जून रोजीच नों दवला. 11 जून 2015 रोजी या जमीनीचा मालक कोण असा प्रश्न विचारला तर खरेदीदार केशव हाच मालक परंतु 11 तारखेला 7/12 र सखारामचे नाव असू शकते.
बऱ्याच वेळा खरेदी-विक्री नंतर तीन चार महिन्यांनी 7/12 वर नोंदी होतात. म्हणून खरेदीदाराचा मालकी ह क्क तीन चार महिन्यांनी निर्माण होतो असे नाही. प्रत्येक जमीन धारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती हे सातबारा उतारा यावरून समजू शकते. गाव नमुना7 हे अधिकार पत्र आहे व गाव नमुना 12 हे पीक पाहणी पत्रक आहे. जमीन व म हसूल याच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या त लाठ्याकडे हे गाव नमुने असतात.
सातबारा उताराच्या अगदी वर गाव, तालुका, जिल्हा इत्यादी नमूद केलेले असते. सातबारा हा जमीन मालकी ह क्काचा प्राथमिक व अं तिम पुरावा असतो. तसेच गावाचे नाव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भूधा रणा पद्धती, क ब्जेदारचे नाव, खाते क्रमांक, शेताचे स्थानिक नाव, लागवडी योग्य क्षेत्र, पोटख राब क्षेत्र, आकारणी, कुळाचे ह क्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला ( नमुना सात) लिहिलेला असतो.
तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जल सिंचनाचे साधन इत्यादी तपशील खालच्या बाजूला( नमुना 12) मध्ये लिहिलेला असतो. साधारणपणे दर दहा वर्षांनी सातबारा पुस्तके नव्याने लिहिली जातात.
सातबारा उताऱ्यावरील घटकांची सविस्तर माहिती:- गाव नमुना सातच्या उतार्याच्या डाव्या बाजूस भूमा पन, सर्वे गट नंबर किंवा हिस्सा दाखवलेला असतो. सर कारने प्रत्येक जमिनीच्या गटाला एक नंबर दिलेला असतो. त्यालाच भूमा पन, सर्वे किंवा गट नंबर असे म्हणतात. आणि या प्रकारातील जमिनीचा हि स्सा कितवा आहे हे हि स्सा नंबर मध्ये दाखवलेले असते.
त्या जवळच जमीन ज्या प्रकाराने धा रण केलेली असते ती भूधा रणा पद्धतीने दाखवलेली असते. सदरची जमीन त्या व्यक्तीकडे कशी आली हे यावरून समजते. भोगवटदार वर्ग 1 म्हणजे ही जमीन वं श परंपरेने चालत आलेली व मालकी ह क्क असलेली असते. भो गवटादार वर्ग 2 म्हणजे सर कारने अ ल्पभूधा रक किंवा भूमिही नांना दिलेल्या जमिनी.
जि ल्हाधि कार्यांनी परवानगी दिली तरच या जमिनीची विक्री, भाडेप ट्टा, गहा ण, दान, ह स्तांतरण करता येते. स रकारने विशिष्ट शर्ती किंवा कामांसाठी भाडेपट्ट्याने दिलेली जमीन भूधर णमध्ये मोडते. अशा अटींचा भं ग केल्यास स रकार की जमीन काढून घेते. भूमा पन क्रमांकाचे स्थानिक नाव या रकान्यात शेतकऱ्याने आपल्या जमिनीला नाव दिले असल्यास खाचर किंवा वाळू खाचर असा उल्लेख असतो.
खालील जमिनीचे लागवडीचे योग्य क्षेत्र यामध्ये जिरायत, बागायत, भात शेतीचे क्षेत्र दाखवलेले असते. याच्या खाली पो. ख. म्हणजे पोट ख राबा म्हणजेच लागवडीस पूर्णतः अयोग्य असे क्षेत्र दाखवलेले असते. यामध्ये पुन्हा वर्ग अ म्हणजे शेतातील बांध, नाले, खान यांचा समावेश होतो. सर्व वर्ग ब मध्ये रस्ते, कालवे, तलाव व विशिष्ट कामासाठी राखून ठेवलेल्या जमिनींचा समावेश होतो.
गाव नमुना सातच्या मध्यभागी मालकाचे किंवा क ब्जेदार असे नाव दिलेले असते. गाव नमुना सात उजव्या बाजूला भू धारकाच्या जमिनीचा खाते क्रमांक व त्याखाली कोणाची कुळवहिवाट असेल तर त्या कुळाचे नाव लिहिलेले असते. खं डाची रक्कम दाखवलेली असते. काही वेळा संपूर्ण जमीन विकत न घेता त्यातील काही भागच विकत घेतला जातो अशा भागाला तुकडा असे म्हणतात.