होळीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी पेटत्या होळीमध्ये टाका ही एक वस्तू…पैसा इतका येईल कि कायमची गरिबी संपून जाईल

धार्मिक

आपल्याला माहित असेल कि यावर्षी पंचांगानुसार यंदा होळीचा सण २८ मार्च रोजी साजरा होणार आहे. यावेळी होळीबरोबर विशेष योगही येत आहेत, ज्यामुळे या होळीचे महत्त्व खूप मोठ्या प्रमाणत वाढले आहे. पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदाच्या तारखेला होळीचा सण २८ मार्चला साजरा केला जाईल.

या दिवशी, ध्रुव योग निर्माण होत आहे आणि चंद्र कन्या राशीत संक्रमण करणार आहे. तर इतर ग्रहांबद्दल बोलायचं झालं तर, शनि आणि गुरु मकरमध्ये विराजमान होणार आहेत. तसेच शुक्र व सूर्य मीन राशीत राहतील. तर दुसरीकडे, मंगळ व राहू वृषभ, बुध, कुंभ व मोक्षामुळे केतु वृश्चिक राशीत राहतील.

तसेच होळी दहनचा मुहूर्त 18 वाजून 37 मिनिट ते 20 वाजून 56 मिनिटांपर्यंत असेल. आपणास सांगू इच्छितो कि होळीची पूजा केल्यास आयुष्यात आनंद व समृद्धी येते. तसेच आजारांपासून मुक्त होते. या दिवशी भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हादाला होलिकापासून वाचवलं होतं. भगवान विष्णूच्या लीलेने स्वत: होलिका जळून भस्म झाली होती.

अशा या तयार झालेल्या शुभ योगादिवशी जर आम्ही हा सांगितलेला उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, पीडा, अनेक अडचणी त्या होळीच्या आगीसोबत जळून भस्मसात होतील आणि आपल्या जीवनात आपल्याला यश मिळेल आपल्या घरात आनंददायी वातावरण राहील आणि आपल्याला कोणत्याही गोष्टीची आयुष्यात कमतरता भासणार नाही.

चला तर मग जाणून घेऊ कि हा धनप्राप्तीचा उपाय काय आहे:- आपल्यातील प्रत्येक जण दिवस रात्र कष्ट करत असतो आहोरात्र मेहनत घेत असतो. तरीही आपल्याला योग्य फळ मिळत नाही. एवढे करून सुद्धा आपल्या घरात पैसे येत नाहीत. घरात सदैव दुःख, आजारपण असते. आणि अशा वेळी वर्षभरात असे काही शुभ दिवस असतात ज्या दिवशी केलेले काही उपाय आपले आयुष्य बदलून टाकतात.

अशावेळी जर आपण या होळीच्या सणाला पेटत्या होळीमध्ये काही वस्तू टाकल्या तर आपले संपूर्ण आयुष्य बदलून जाते. तसेच काही वास्तू दोष असले तेही निघून जातात. मित्रांनो आपल्याला फक्त या पेटत्या होळीमध्ये एक तुरटीचा तुकडा आणि काळे मिरे अशा दोन्ही गोष्टी टाकायच्या आहेत.

आपल्याला माहित असेल कि तंत्र, मंत्र शास्त्रात या तुरटीला आणि काळ्या मिऱ्याना किती महत्व आहे. तसेच तुरटीला नाकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी वस्तू मानली जाते तर काळे मिरे हे काळी छाया नाहीशी करण्यासाठी तंत्र शास्त्रात वापरली जाते. आणि जर अशा वेळी जर आपण या दोन गोष्टी पेटत्या होळीमध्ये टाकल्या तर आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला असणारी नाकारात्मक ऊर्जा नाहीशी होणार आहे.

शिवाय आपल्या घरावर जर एखादी काळी छाया असेल तर तिचा सुद्धा कायमचा नायनाट होणार आहे आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होणार आहे आणि जिथे सुद्धा सकारात्मक ऊर्जा असते तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून येते. यामुळे आपल्या घराची सदैव बरखत होते. शिवाय आपल्या आयुष्यात असणारे दुःख, ईडापिडा कायमची नाहीशी होणार आहे.

तसेच आपण आपल्या घरामध्ये या तुरटीचे सहा तुकडे प्रत्येक कोपऱ्यात ठेवा तसेच एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे येणाऱ्या तीन आमवस्याला दही भातासोबत आपल्याला काळे मिरे सुद्धा आपल्या घरावर टाकायचे आहेत. जर आपण हा उपाय केला तर आपल्याला काही दिवसांतच याचे परिणाम दिसण्यास सुरुवात होतील आणि आपल्या घराची प्रगती होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जेणेकरून ते सुद्धा त्याच्या आयुष्यात यशस्वी होतील आणि आपल्याला सुद्धा आशीर्वाद मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *