नवरा बायकोचे नाते खूपच नाजूक असते. एक पवित्र बंधन असतं. इतर कोणत्याही नात्यामध्ये जितकी जवळीकता नसते, तितकी या नात्यांमध्ये जवळीकता असते. या नात्याला दुरावा कधीच सहन होत नाही. एकमेकांपासून दूर आपापल्या घरी राहणे ते लग्न झाल्यावर एकमेकांसोबत राहणे यामुळे आयुष्यात खूप मोठा फरक पडतो.
प्रेम अधिक वाटतं कारण आपला माणूस आता 24 तास आपल्या सोबत राहणार असतो. पण कधी-कधी लग्नानंतरच नवीन प्रेम जास्त वेळ टिकत नाही. जबाबदाऱ्या, कार्यालयीन कामे यात व्यस्त झाल्याने नात्याकडे बघायला वेळच नसतो. अशावेळी नवरा बायको मध्ये दुरावा निर्माण होऊन खूप स मस्या निर्माण होतात. कधीकधी नातं तुटतं.
सामान्यत: होणाऱ्या घटस्फो टांच्या मागचं कारण नवरा-बायकोमध्ये प्रेम, संवाद, काळजी, माया ,जिव्हाळा नसणं हे आहे. कधीकधी दोघांमध्ये यापैकी कोणतीच गोष्ट न राहिल्यामुळे सुद्धा गैरसमज निर्माण होतात आणि खूप दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्याने दोघांनाही त्यांचे आयुष्य खूप कंटाळवाणं वाटू लागतं. पण जर तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम टिकवून ठेवायचं असेल…
तर तुम्ही सकाळी उठून तुमच्या जोडीदारासोबत दिवसाची सुरुवात रो मँटिक पद्धतीने करा. दिवस चांगला जातो. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा राहतो. जर तुम्हाला तुमच्या वै वाहिक जी वनात असे काही घडण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला अशाच गोष्टी सांगत आहोत ज्या तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सकाळी सर्वात आधी करायला पाहिजे.
आजकालच्याा धकाधकीच्या जी वनात एकमेकांसोबत सकाळचा चहा प्यायला जमत नाही असे अनेकदा पाहायला मिळते. जर तुमच्या नात्यात तुम्हाला गोडवा टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला सकाळचा चहा तुम्ही एकमेकांसोबत घ्या. त्यामुळे तुमचा मूड फ्रेश होईल. दिवसाची सुरुवात हसून आणि विनोदाने होत असेल तर तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जातो.
अशा परिस्थितीत तुम्ही सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तुमच्या जोडीदाराला फोन वरील एक छानसा विनोद सांगू शकता किंवा काही वेळ बसून त्याच्याबरोबर गप्पा गोष्टी करू शकता. सकाळी सकाळी महिला खुप कामात असतात. त्या इतक्या कामात असतात की त्यांना सकाळी स्वतःसाठी जरा सुद्धा वेळ मिळत नाही. अशा वेळी त्यांना चहा नाश्ता ऑर्डर न देता, त्यांना सुद्धा चहा नाष्टा करण्यासाठी मदत करावी.
कधीतरी पत्नीसाठी स्वतः चहा किंवा कॉफी बनवा. किंवा सुट्टीच्या दिवशी तिच्यासाठी स्वतःच्या हाताने नाष्टा करून दिला द्या. स्त्रियांना स्वतःचं कौतुक ऐकायला खूप आवडतं. अशा स्थितीत जर तुमच्या जोडीदाराने सकाळी जर तुमची स्तुती केली तर त्यांचा दिवस खरोखरच आनंदात जातो. तुमच्या जोडीदाराचा विश्वास वाढवा. आणि जमेल तेवढी स्तुती करा.
आजकालच्या आधुनिक जगात लोक इतके व्यस्त झाले आहेत. सकाळी उठल्याबरोबर ऑफिसला जाण्यासाठी तयार होतात आणि या गडबडीत त्यांना सकाळी बायकोबरोबर दोन गोष्टी बोलायला सुद्धा वेळ नसतो. ही गोष्ट तिला खूप असुरक्षित वाटते त्यामुळे जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा सर्वप्रथम पत्नीचे गुड मॉर्निंग चुं बन द्या. लक्षात ठेवा तुम्हाला ही गोष्ट दररोज करावी लागणार आहे.
एक दिवस तुम्हाला चुकून चालणार नाही. लग्नाला किती वर्षे लोटली असतील तरी पण आपली सवय तुम्ही अजिबात सोडू नका. असे केल्याने तुमच्या दिवसाची सुरूवात तर चांगली होईलच पण तुमच्या शि ष्टाचार विकसित होईल. आणि तुमचा संपूर्ण दिवस खूप आनंदात आणि उत्साहात जाईल. रविवारी जेव्हा सुट्टी असते तेव्हा तिला बाहेर फिरायला घेऊन जा.
ती सुद्धा घरी बसून, घरातली सकाळपासून कामे करून खूप दमलेली असते. तिला सुद्धा काही तरी चेंज हवा असतो. तिला एखादी साडी गिफ्ट करा. एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन तिला आवडतं ते जेवण मागवा. ती खुश होऊन जाईल. तिच्याबरोबर बाजारात भाजी आणायला जा. स्त्रियांचा आनंद हा खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो हा तो पुरुषांना ओळखता यायला पाहिजे.
जर असं झालं तर सुखी संसाराची चाक समांतर राहतील… पण यातलं एखादं चाक जरी मागेपुढे झालं तर पुढे जाऊन दोघांनाही याचा पश्चाताप होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा नात्यात असतो तेव्हा एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांच्या आवडी निवडी जपून हा संसार आयुष्यभर टिकवला पाहिजे.