हिंदू ध’र्मात मृत्यूनंतर तेरावे का केले जाते..? केले नाहीतर काय काय घडते..बघा गरुड पुराण मध्ये काय सांगितले आहे

धार्मिक

नमस्कार मित्रांनो, हिं दु ध र्मात एखाद्या व्यक्तीच्या मृ त्यू झाला की त्याचे अं त्यसंस्काराचे विधी केले जातात आणि त्यानंतर मृ त व्यक्तीच्या उद्धारासाठी मृ ताच्या कुटूंबाचे व्यक्ती तेरावा साजरा करतात. गरूडपुराणानुसार मनुष्याचा मृ त्यू झाला तर आ त्मा शरीर तर सोडते परंतु घर सोडत नाही.

तीन दिवस घरातच दारामागे बसून असते त्यानंतर तीन दिवसांचा विधी झाला आत्मा तेराव्या दिवसापर्यंत बाहेर झाडावर बसून राहते आणि ज्यादिवशी तेराव्याचा विधी केला जातो तेव्हा तेथून मार्गस्थ होते. तेराव्याच्या दिवशी तेरा ब्राह्मणांना मृ त व्यक्तीच्या नावाने भोजन दिले जाते.

पण तेरा ब्राह्मणांना किंवा व्यक्तींनाच भोजन का दिले जाते यामागे सुद्धा एक कारण आहे. ते म्हणजे यमपुरी मृ त्यूलोकापासून दक्षिण दिशेला 99 हजार योजने दूर आहे आणि येथे आ त्म्याला यमदूत घेऊन जात असतात. येथे जाण्यासाठी संपूर्ण एक वर्षांचा म्हणजेच 12 महिन्यांचा काळ लागतो. पण कधी कधी अधिक मास असेल तर 13 महिने लागतात.

आपण तेराव्या दिवशी तेरा लोकांना जेवण देतो याचा अर्थ त्यांच्या तेरा महिन्याच्या अन्न पाण्याची सोय करतो. एका व्यक्तीला जेवण देणे म्हणजे एका महिन्याच्या अन्न पाण्याची सोय करणे होय म्हणजेच आपण संपूर्ण तेरा महिन्याचे म्हणजे यमपुरीत पोहोचेपर्यंतचे अन्न पाणी त्यांना बरोबर देत असतो. म्हणून तेरा व्यक्तींना किंवा तेरा ब्राह्मणांना भोजन देण्याची आपली परंपरा आहे.

तसेच आपल्या हिं दू ध र्मात 365 पिंड दान करण्याचीही परंपरा आहे. मृ त व्यक्तीची मुले, नातेवाईक जलदान व पिंडदान करतात. जलदान केल्यास मृ त आत्म्यास पाणी मिळते तर पिंडदान केल्याने भोजन मिळते. पण जर आपण जलदान, पिंडदान नाही केले तर त्यांना यमपुरीत पोहोचण्यास खुप त्रा स होतो.

त्यांना तहानलेले व भूकलेले यमदूत तसेच यमपुरीत ओढत नेतात मग ते आ त्मे आपल्याच वं शजांना शाप देतात व पुढे त्यांच्या वंशाना ही त्रा स होतो. कधी कधी तर ते आपला वं श निर्वंश करून टाकतात त्यामुळे त्यांचा वं श तेथेच खुंटतो. म्हणून तेराव्या दिवशी तेरावे जरूर करावे म्हणजे त्यांच्या आत्म्याला अन्न पाणी मिळेल व ते शांतपणे यमपुरीत जाऊ शकतील व आपल्याला आशिर्वाद देतील.

तसेच गरुड पुराणात असे म्हणले आहे की तेरावे कधीही कर्ज घेऊन करू नये म्हणजेच आपण म रेपर्यंत इतके तर धन मिळवले पाहिजे की ओले पिंडदान कर्ज न घेता होऊ शकेल. कारण कर्ज घेऊन केलेले पिंडदान मृ त आत्म्या पर्यंत पोहोचत नाही, आपण ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहे त्यांच्या पूर्वजांना ते अन्न दान होते.

व आपले मृ त आ त्मे उपाशी राहतात म्हणून जास्त शक्य नसेल तर फक्त तेरा लोकांना जेवण द्या, साधे जेवण बनवा पण स्वतःच्या पैशाने ते जेवण बनवा व विधी करा. तेरावे करण्याच्या मागे काय शास्त्र आहे हे तर आपल्याला आता समजलेच असेल.

Leave a Reply

Your email address will not be published.