हनुमान आजही जिवंत आहेत, हे आहेत त्यांच्या जिवंत असण्याचे पुरावे..आजही याठिकाणी एक वानर अशा पद्धतीने..

अजब गजब

नमस्कार मित्रांनो, रामायणामध्ये अस सांगितलं आहे की श्रीराम पृथ्वी सोडून जाईपर्यंत हनुमानजी अयोध्येमध्ये श्रीरामांसोबत राहिले होते. श्रीराम अयोध्या सोडून गेल्यानंतर हनुमानजी जंगलात राहू लागले. श्रीराम अयोध्या सोडून गेल्यानंतर त्रेतायुग संपले आणि द्वापार युग चालू झाले. पण रामायण झाल्यानंतर आणि श्रीराम अयोध्या सोडून गेल्यानंतर हनुमानजी कुठे गेले याबद्दल कोणालाच महित नाही.

आपल्याला माहीतच आहे की भगवान हनुमान यांना वानर म्हणले जाते, वानर म्हणजे वनात विचारण करणारा. जेव्हा लंकेवर विजय मिळवून हनुमानजी श्रीरामांसोबत अयोध्येला परतले तेव्हा त्यांना माता सीतेने वरदान दिले होते. हनुमान हे चिरंजीव आहेत, रामायणामध्ये असे लिहिले आहे की माता सीता ने हनुमानला कलियुगाच्या शेवटपर्यंत राहण्याचे वरदान दिले होते.

आणि त्याचबरोबर एकाच वेळी अनेक ठिकाणी उपस्थित राहू शकतात हे ही वरदान दिले होते. भगवान विष्णूच्या वरदानानुसार त्यांना इच्छामृ त्यूचे वरदान होते. जिथे भगवान राम यांचा जप केला जातो तिथे स्वतः हनुमान उपस्थित होतात कारण त्यांना भगवान राम यांचे नाव अत्यंत प्रिय आहे. आज आपण हनुमान जि वंत असल्याचे पुरावे बघुया,

पहिली गोष्ट म्हणजे, एकदा भीम आपल्या भावाची आज्ञा म्हणून ऋषी पुरुष युगा यांना शोधण्यासाठी निघाले. त्यांना शोधत असताना ते एका घनदाट जंगलात पोहोचले, जंगलात चालताना भीमला हनुमान दिसले भीमने त्याला माकड समजून आपली शेपूट हटवण्यास सांगितले तेव्हा हनुमान ने त्याला स्वतः शेपूट हटवण्यास सांगितले पण भीम त्यांची शेपूट हलवू शकले नाही.

तेव्हा त्यांना जाणीव झाली की हे सामान्य माकड नसून स्वतः हनुमान आहे व नंतर भीमने हनुमानाची माफी मागितली. दुसरी गोष्ट म्हणजे, एके दिवशी अर्जुन रामेश्वर कडे जायला निघाले रामसेतू बघून अर्जुनाने म्हणले की मी असतो तर येथे बा णांनी सेतू बांधला असता हे ऐकून हनुमान म्हणाले की बा णांनी बांधलेला सेतू एका व्यक्तीचेही ओझे झेलू शकणार नाही.

तेव्हा अर्जुन म्हणाला की मी बांधलेला सेतू जर तुमच्या ओझ्याने तु टला तर मी अ ग्नित प्रवेश करेन. तेव्हा हनुमान म्हणाले की माझ्या दोन्ही पायांचे जरी ओझे या सेतूने झेलले तरी मी हार मानेन आणि अर्जुनाने सेतू बांधला पण हनुमान यांनी पाय ठेवताच तो सेतू तु टला यामुळे अर्जुन अ ग्नित प्रवेश करू लागले तेव्हा श्रुकृष्ण प्रकट झाले व त्यांनी अर्जुनला श्रीरामांचे नाव घेऊन सेतू बांधायला सांगितला आणि तेव्हा हनुमानाने पाय ठेवला तरी हा सेतू तुटला नाही.

तेव्हा हनुमानाने अर्जुनाला सांगितले की ते यु द्धाच्या शेवटपर्यंत त्यांची रक्षा करतील म्हणूनच कुरुक्षेत्राच्या यु द्धात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजात हनुमान विराजमान झाले आणि शेवटपर्यंत त्यांची रक्षा केली. यु द्ध झाल्यानंतर हनुमान मूळ स्वरूपात प्रकटले आणि त्यानंतर तो रथ भसमसात झाला. तिसरी गोष्ट म्हणजे, माधवाचार्य यांचा जन्म इसवी सन 1238 मध्ये झाला होता. माधवाचार्य यांनी हनुमानाला साक्षात बघितले होते.

माधवाचार्य हे रामाचे भक्त होते आणि याच कारणामुळे त्यांना हनुमान दिसले होते. चौथी गोष्ट, समर्थ रामदास यांचा जन्म रामनवमी इसवी सन 1608 मध्ये झाला. ते हनुमानाचे परमभक्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते. महाराष्ट्रात त्यांनी रामभक्ती सह हनुमान भक्तीचा प्रचार केला. त्यांनाही आपल्या जी वन काळात हनुमानाचे दर्शन घडले होते.

तेराव्या शतकात तुलसी दास यांनाही हनुमानाचे दर्शन घडले होते असे ते सांगतात. त्यांना रामचरित मानस लिहिण्यासाठी हनुमान यांनी प्रेरित केले होते असही ते सांगतात. कंबोडिया मध्ये देखील हनुमानजींच्या कथा ऐकायला मिळतात. तसेच आफ्रिकेपासून ते अमेरिकेपर्यंत आज सुद्धा बलाढ्य वानर जि वंत असल्याची चर्चा आहे. आज सुद्धा बऱ्याच ठिकाणी मोठ्या पावलांचे ठसे पाहायला मिळाले आहेत.

यावरून शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, हे ठसे हा मोठ्या ब लाढ्य प्राण्याचे आहेत ज्याचे शरीर मोठे असेल. जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये असे मोठ्या पावलांचे ठसे पाहायला मिळालेले आहेत. असे म्हणतात की जेव्हा श्रीराम मानवी श रीर सोडून गेले, तेव्हा हनुमान यांनी आयोध्या सोडून श्रीलंकेच्या जंगलामध्ये श्रीराम यांच्या स्मरणार्थ पीदारू पर्वतावर गेले. तेथे त्यांच्या भक्तांनी त्यांची खूप सेवा केली.

त्यांची श्रद्धा आणि भक्ती याच्यावर खुश होऊन हनुमानजी यांनी त्यांना असे वचन दिले की, प्रत्येक 41 वर्षांनी ते स्वतः त्यांच्या कुळात राहायला येतील. तसेच कोणत्याही हनुमान मंदिराच्या आसपासच्या परिसरात तुम्हाला वानरे पाहायला मिळतील आणि हे अगदी खरे आहे. आपण देखील हे पाहतोच की प्रत्येक हनुमान मंदिराच्या आसपास आपल्याला वानरे पाहायला मिळतात. या सर्व पुराव्यांवरून आजही हनुमानजी जि वंत आहेत असे आपल्याला समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *