सोने खरेदी आणि गुंतवणूक कारण्यासाठी हीच सुवर्ण संधी…कारण दिवाळी २०२१ पर्यंत सोने गाठणार हा नवा आकडा…पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीचा विक्रम होणार

लाईफ स्टाईल

आपण पाहत असाल कि २०२० च्या तुलनेत सोने किती स्वस्त झाले आहे, आज दिल्लीमध्ये सोन्याचे भाव ४६ हजार पर्यंत खाली आले आहेत, त्यामुळे अनेक सामान्य लोक सोन्याचे भाव अजून कमी होतील या आशेवर बसले आहेत, पण आम्ही आपणांस सांगू इच्छितो कि जर आपण सोने घेणार असाल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करणार असाल तर आपल्यासाठी हाच योग्य काळ आहे.

होय, कारण डॉलरच्या तुलनेत आज सोन्याच्या किंमतीत तब्ब्ल ४७७ रुपयांची घ सरण नोंदवली गेली आहे. तसेच दिल्लीच्या सराफ मार्केटमध्ये आज सोन्याचा भाव ४७७ रुपयांनी घसरून, प्रति दहा ग्रामवर ४६ हजार ०३२ रुपयांवर बंद झाला आहे. तर मागील सत्रात सोन्याचा भाव ४६ हजार ८५५ वर बंद झाला होता.

पण अनेक आंतरराष्ट्रीय मार्केटमधील तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, किंमतीत झालेल्या या घ सरणीमुळे आपण सोन्यामध्ये अधिक गुंतवणुक करु शकतात. कारण त्याच्या मते सोने २०२० प्रमाणे पुन्हा एकदा इतिहास रचण्यास तयार होणार आहे त्यामुळे जे कोणी लोक सोने घेणार असतील त्याच्यासाठी हा सुवर्ण क्षण आहे.

कारण गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याची किंमत जवळपास भारतामध्ये ५८ हजार 200 च्या पातळीवर पोचली होती, आणि हा आज पर्यंतचा इतिहास नोंदवला होता, तसेच अनेक जाणकारांच्या म्हणण्यानुसार, या दिवाळीपर्यंत MCXवर सोन्याचा दर ५५ हजारांच्या पार जाईल.

तसेच ICCI बँकेचे तज्ञ लोकांच्या नुसार डॉलरची वाढ आणि अमेरिकन बॉन्ड उत्पन्नातील वाढ यामुळे सोन्याच्या किंमतीवर मोठ्या प्रमाणत दबाव आला आहे. तसेच डॉलर इंडेक्स दुपारी ३.५७ वाजता ०.२९९ च्या फरकाने ९३.२०० वर चढला. एकीकडे आज बाजारात सोन्याची घसरण नोंदवली गेली.

पण इकडे अचानक चांदीच्या किंमतीनी जोर धरला आणि चांदीच्या किमतीमध्ये आज मोठी वाढ झाली आहे. आपणांस सांगू इच्छितो कि आज चांदी २ हजार ६०० रुपयांनी वाढून ७० हजार ५७० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. तसेच मागील व्यापार सत्रात चांदी ही 67 हजार 942 रुपयांवर पर्यंत गेली होती.

सोने चांदीचे आंतरराष्ट्रीय आणि वितरण दर:- आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर सध्या १ हजार ९९० डॉलर आणि चांदीमध्ये खूप कमी प्रमाणात घसरण होऊन २८.३६ डॉलर्सने घसरले आहेत. तसेच MCXवर, सध्या जून डि ली व्हरीमधील सोन्याचा भाव ५६ रुपयांनी घसरून 46 हजार पर्यंत आला आहे.

तसेच ऑगस्टच्या डि ली व्हरीमधील सोन्याचा भाव ३८ रुपयांनी घसरून ४७ हजार ४०० रुपये प्रति दहा ग्रॅम पातळीवर आला होता आणि त्याचा व्यापार देखील झाला होता. पण आंतरराष्ट्रीय मार्केटमधील तज्ज्ञांच्या नुसार सोनं पुन्हा वाढणार हे निश्चित आहे. त्यामुळे जर आताच्या या लॉ कडा ऊनच्या परिस्थितीमध्ये जरी हा भाव पडत असेल.

तर याकडे आपण सुवर्ण संधी म्हणून पाहिले पाहिजे, तसेच अजून काही दिवस हा भाव घसरत राहणार आहे. म्हणून ही गुंतवणूक करण्याची एक उत्तम संधी आहे. तसेच तज्ज्ञांच्या नुसार सोने येत्या दिवाळी पर्यंत ५८ ते ६० हजार पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तसेच जर आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा या संधीचा फा यदा उठवू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *