सिंह रास: जून राशिभविष्य…या महिन्यात या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणारचं…शिवाय या संकटाना द्यावे लागू शकते तोंड..एकंदरीत

लाईफ स्टाईल

सिंह राशीच्या जातकांना जास्तीत जास्त एकांतात वेळ व्यतीत करणं आवडतं. कारण शांतपणे एखाद्या प्रश्नावर विचार करणे तुमची मा नसिकता असते. शांतपणे विचार करून प्रश्नांची उत्तर शोधणे हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा मूळ गुण म्हणून ओळखला जातो.

व्यक्तिमत्व- राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची असते. राशीचा स्वामी म्हणजे ग्रहांचा राजा रवी होय. या महिन्यात तुमच्या दशम स्थानातून प्रवास करत आहे. 15 जून रोजी राशी परिवर्तन करून तो लाभस्थानात प्रवेश करेल. रवी प्रवास तुमच्यासाठी लाभदायक असतील. कारण पत्रिकेतील दशम स्थान राशीस्वामीला विशेष मानवत रवीची गती ही एक समान असते. एकही दिवस असा उगवत नाही की एका अंशाने पुढे गेला नाही. सतत एक समान गतीने पुढे चालतं हे तुमच्या राशीस्वामीच वैशिष्ट आहे. म्हणूनच त्याला कर्मस्थान विशेष मानवत तुमचे व्यक्तिमत्व समृद्ध होणार आहे.

कौटुंबिक:- धनेश असलेला बुध ग्रह तुमच्या कर्म स्थानात विराजमान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे तो तुमच्या राशीस्वामी सह विराजमान आहे. संपूर्ण महिना तो तिथेच राहणार आहे. अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होते. त्यामुळे कौटुंबिक सौख्य प्राप्त होणं, धन प्राप्त होणं, वाणी मध्ये प्रगल्भता येणे. यासारखे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होते.

परिश्रम व पराक्रम:- सिंह राशीचे परिश्रम म्हणजे शुक्र ग्रह होय. तुमचा भाग्य श त्रू स्थानात विराजमान आहेत. महत्वाची बाब म्हणजे शुक्र राहुच्या युतीत आणि त्यातून त्याची दृष्टी तुमच्या स्थानावर पडते. तसेच मंगळ ग्रहाची दृष्टी सुद्धा तुमच्या तृतीय स्थानात आहे. त्यामुळे अनेक वेळा परस्पर विरुद्ध परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील.

वाहन, जमीन, सुख, शांती:- तुमच्या पत्रिकेचे चतुर्थेश म्हणजे मंगळ होय. तुमच्या पत्रिकेत राजयोग कारक देखील आहे. या महिन्यात तुमचा पंचमेशसह अष्टमात विराजमान आहे. खरंतर केंद्र त्रिकोणाचे स्वामी असतात. त्यामुळे एक मोठा राजयोग घडून येतो. त्याला केंद्र त्रिकूट राजयोग असे म्हणतो. हा योग गुरु महाराजांच्या मीन राशीत आलेला आहे. मात्र तो तुमच्या अष्टम स्थानात असल्यामुळे कुठे तरी नकारात्मकता निर्माण होते.

तसेच त्याचा तुम्हाला मर्यादित लाभ प्राप्त होतो. वास्तुसाठी तुम्ही खर्च देखील कराल. वास्तविक वास्तु योगात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून योग्य ते सहकार्य प्राप्त होईल किंवा तुमची एखादी कौटूंबिक प्रॉ पर्टीत असेल ती विकली जाऊ शकते, नवीन वास्तु घेण्यासाठीहा संयोग तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतो.

शिक्षण इष्ट देवाचं सहकार्य:- या काळात तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. शैक्षणिक यश मिळेल. विशेषता तुम्ही फार्मसी किंवा मॅनेजमेंट या क्षेत्रात असाल तर यशाची उंची गाठणार आहात. स्पर्धा परीक्षेला तुम्ही जर बसलेला आहात तर तुम्हाला यश मिळण्याचे योग बनत आहेत.

आ रोग्य, कर्ज, स्पर्धक हितशत्रू:- अत्यंत उत्तम काळ कालखंड सुरू झाला आहे असे म्हणता येईल. शनि महाराज सप्तम स्थानात विराजमान आहेत. स्पर्धक व हितश त्रू माघार घेतील. को र्टात तुमचं कामकाज सुरू असेल त्यात यश मिळण्याची संधी वाढेल. एकंदरीत या सर्व दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक म्हणता येईल. त्याचा लाभ करून घ्या.

नोकरी, व्यवसाय:- सिंह जातक हे मुळता व्यवसायिक वृत्तीची असतात. म्हणजे अनेक सिंह जातक ते नोकरी करत असले तरी त्यांच्यात मनातून व्यवसाय करण्याचे असते. व त्यांची नोकरी त्या प्रकारचे असते तेथे उच्च पदस्थ अधिकारी असतात. त्यामुळे त्यांचं जबाबदाऱ्या मोठ्या असतात. नोकरी असताना एखादा जोडीला व्यवसाय करण्याची उर्मी त्यांच्यात असते. त्यानुसार नोकरी आणि व्यवसाय दोन्ही आघाड्यांवर टक्केवारी वाढणार आहे. तुमच्या सप्तम स्थानात शनी महाराज द्वारे निर्माण झालेला शनि योग हा तुमच्यासाठी भाग्य ठरेल.

भाग्य:- तुमच्या राशीचे भाग्य म्हणजे साक्षात ग्रहांचा सेनापती मंगळ होय. कारण तो मित्राच्या राशीत भाग्यसह विराजमान आहे. मात्र 26 जूनला भाग्य तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करेल. कर्म:- तुमचा करमेश शुक्र ग्रह भाग्य स्थानात विराजमान आहे. म्हणजे केंद्राचा स्वामी त्रिकोणात विराजमान आहे. शुक्राची स्थिती तुमच्यासाठी लाभदायक आहे. तुम्ही जे काही कर्म कराल त्यातून तुम्हाला प्राप्त होईल.

तसेच कर्मातून भाग्य समृद्धी लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचा बुध ग्रह कर्म स्थानात विराजमान आहे. भरभरून लाभ मिळणार आहेत. तुमच्या कर्मातून प्राप्त होईल ज्याचा तुम्हाला अत्यंत आनंद होईल. कारण तुमची रास कर्म प्रधान रास म्हणून ओळखली जाते. थोडक्यात कर्मातून लाभ प्राप्ति असेल. त्याचा उपयोग घ्या.

परदेशगमन:- जे सिंह जातक परदेशात आहे त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम अशी संधी निर्माण झाली आहे. नोकरीच्या उद्देशाने परदेशात आहेत, तिथे नोकरी स्थैर्य प्राप्त होईल. सहकाऱ्यांकडून योग्य ते सहकार्य मिळणार किंवा वरिष्ठांकडून कामाचं कौतुक होणार यासारखे प्रकार होऊ शकतात. तर व्यावसायिक जातकांसाठी व्यवसाय वृद्धी संधी निर्माण होणार आहेत. त्यात यश मिळेल, खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता ते मानवी आयुष्याला लागू असतात.

सिंह राशि साठी जून महिन्यातील 8, 17 आणि 26 जून हे दिवस शुभ आहेत. मात्र 5 ,16 आणि 24 दिवस ता णत णावाचे आणि सं घर्षाचे जातील. उपाय:- तुमच्या सुख स्थानात मंगळ ग्रहाची रास येते. त्यानुसार शांत झोप व सौख्यासाठी तुम्ही दर मंगळवारी गुळ आणि चण्याचा प्रसाद वाटायला हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *