आपल्याला माहित असेल कि आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुडंलीला आणि राशीला किती महत्व असते, कारण याचं दोन गोष्टीवरून आपल्याला भविष्यातील घटनांची कल्पना मिळत असते, आपली ग्रह दशा काय आहे, आपले येणारे दिवस कसे असतील हे सर्व आपल्याला या दोन गोष्टीवरून कळत असते, आणि नुकत्याच झालॆल्या श्री गणेशाच्या आगमनाने आणि सकारात्मक असलेल्या ग्रह दशेमुळे काही राशींच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडून येणार आहे, चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
मेष:- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे, तसेच आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणत कष्ट करावे लागतील. तसेच येणाऱ्या दिवसात आपल्या प्राप्तीत वाढ संभवते. तसेच नोकरदारांना सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे. कार्यक्षेत्रात एखाद्या प्रभावी व्यक्तीच्या संपर्कात राहाल, ज्याचा फा यदा आपल्याला भविष्यात खूप मोठ्या प्रमाणत होणार आहे. वै वाहिक जी वन प्रेमाने परिपूर्ण असेल. तसेच आपले आणि आपल्या आई वडिलांचे आ रोग्य सांभाळा, पथ्यपाणी सांभाळल्यास प्र कृती उत्तम राहील.
वृषभ:- आपल्यासाठी गौरी आगमनाचा दिन विशेष लाभदायी ठरेल. १४ सप्टेंबर रोजी गुरू वक्री होऊन मकर राशीत तुमच्या भाग्यस्थानी प्रवेश करेल ज्याचा फा यदा खूप मोठया प्रमाणत आपल्याला होईल. दिनांक १४ पासून मात्र प्रगतीचा टप्पा चालू होईल. अनेक अ डचणींवर योग्य मार्ग निघेल. व्यावसायिक दृष्ट्या नवीन गुंतवणूक करणे फा यद्याचे ठरेल. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. आपल्या परिश्रमाचे योग्य मोल मिळेल. नोकरदार वर्गाला नवीन प्रस्ताव येतील. आर्थिक परिपूर्णता येईल. रा जकीय क्षेत्रात कर्तृत्वाचा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
मिथुन:- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. येणाऱ्या दिवसात आपण नवीन उलाढाल कोणतीही करू नका. शांतपणाने कृती करा. कारण आपली ग्रह दशा खराब आहे. व्यावसायिकदृष्ट्या मनाची चलबिचल अ वस्था होऊ देऊ नका. अनावश्यक उत्पादन वाढवणे टाळा. नोकरदार वर्गाने कामामध्ये गुंतून राहिलेले चांगले. आर्थिक दृष्ट्या जबाबदारी पार पाडाल. सार्वजनिक क्षेत्रात मन लागणार नाही. कौटुंबिक दृष्ट्या तडजो ड करणे हिताचे राहील. प्र कृतीच्या बाबतीत कोणतीही चालढकल करणे टाळा.
कर्क:- हा आठवडा आपल्यासाठी अतिशय आ व्हानांचा असणार आहे. अपेक्षित अशी फलप्राप्ती वाढण्यास मदत होईल. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा व गैरसमज टाळा. कोणतेही काम शांतपणे व विचारपूर्वक करा. स्वकष्टाने यशाचा मार्ग सुलभ होईल. कुटुंब व मुले यांच्या भवितव्याकडे अधिक लक्ष द्या. प्रवासाचे योग येतील. सर्व बाबतीत प्रगती करण्याचा प्रयत्न करा. तसेच सं तती प्राप्तीसाठी अजून वाट पाहावी लागेल, आ रोग्याची काळजी घ्या, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा.
सिंह:- हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. ग्रह द शा देखील योग्य आहे पण लक्षात ठेवा कि प्रयत्नांशिवाय पर्याय नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. शिवाय स्वतःची जबाबदारी इतरांवर टाकू नका. हा आठवडा नोकरी करणाऱ्या जातकांसाठी चांगला असून त्यांची नोकरीतील कामगिरी उत्तम होईल. व्यापारास गती येईल. आठवड्याच्या मध्यास आपण प्र णयी जी वनासाठी वेळ काढू शकाल. आपल्यातील सर्जनात्मकता आपल्या प्रिय व्यक्तीस खुश करण्यास कारणीभूत होईल. वै वाहिक जी वनात प्रेम व स्नेह वृद्धिंगत होईल.
कन्या:- योग्य ग्रह दशा आणि श्री गणेशाचे आगमन यामुळे आपले भाग्य बदलून जाणार आहे, येणाऱ्या काही दिवसांत अनेक सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यात घरणार आहेत, आपल्या प्रयत्नांना यश मिळणार आहे, मोठ्या प्रमाणात धन लाभ होणार आहे. तसेच सं ततीविषयी गोड बातमी कळेल. तसेच व्यापार आणि नोकरी मध्ये सुगीचे दिवस येथील. जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल. लाभदायी गोष्टींचा कालावधी चालू होईल. अपूर्ण राहिलेले मनसुबे पूर्ण होतील. तेव्हा समोरून येणाऱ्या संधीचे सोने करा. हाच तो कालावधी आहे.
तूळ:- ग्र हमान पाहता हा आठवडा सर्व बाबतीत आशावादी स्वरूपाचा राहणार आहे. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. कामकाजात प्रगती करण्याची संधी मिळेल. कारखानदारी व्यवसायाला चालना मिळेल. देवाणघेवाण उत्तम चालू राहील. ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारे योजना राबवणे शक्य असेल. नोकरदार वर्गाला अधिकारी वर्गाकडून सततचे असणारे दडपण कमी होईल. रा जकीय क्षेत्रात प्रसिद्धीचा झोत राहील. घरातील सदस्यांसमवेत मौजमजेमध्ये राहाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या परिश्रमाचे फळ मिळेल. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.
वृश्चिक:- हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. आपण स्वतःवर लक्ष केंद्रित कराल. चांगल्या गोष्टींचे परिवर्तन होण्याची वाट बघावी लागणार नाही. आपणास आपल्या वै वाहिक जोडीदाराचे सौख्य लाभेल. देवाणघेवाणीचे चक्र सुरळीत चालू राहील. मोठ्या उद्योग व्यवसायाचे व्याप वाढलेले असेल. नोकरदार वर्गाला कमी वेळात कामे पूर्ण करावी लागतील. नवीन योजनांचा उपयोग करून घ्याल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले असेल. बचत करणे सहज शक्य होईल. सा माजिक क्षेत्रात स माजसेवा करण्याची संधी प्राप्त होईल. नातेवाईकांशी कार्यक्रमानिमित्त भेटीगाठीचा सोहळा पार पडेल. कौटुंबिक जी वन सुखाचे असेल.
धनु:- हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः मुलांच्या शिक्षणासं बंधी. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या. व्यावसायिक दृष्ट्या स्थिर अवस्था आल्याने व्यापारी क्षेत्रात मोठी भरारी मा रता येईल. नावीन्यपूर्ण गोष्टी उदयास येतील. हाताबाहेरच्या गोष्टी आवाक्यात येण्यास मदत होईल. नोकरदार वर्गांच्या सेवासुविधा वाढलेल्या असतील. पैशाची बाजू समाधानकारक राहील. स माजसेवा करण्याचा मोह निर्माण होईल.
मकर:- एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात आपण सर्व बाबतीत प्रयत्नशील राहिल्यास बहुतांश गोष्टी साध्य होतील. नोकरदारांना दिलासा मिळेल. आर्थिक व्यवहारासं बंधी कागदपत्रांवर डोळे झाकून सह्या करू नका. मागील काही दिवस त्रा साचे गेलेले असले, तरी ती परिस्थिती आता मावळणार आहे. विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसविण्यात यश मिळेल. व्यावसायिक दृष्ट्या द्विधा अवस्था न करता निर्णय घ्या. आपणास आपल्या कामाचे यथोचित चांगले फल मिळेल. आपल्या मा न-सन्मा नात वाढ होईल. शासनाकडून लाभ सं भवतो. वै वाहिक जी वन सुखद होईल.
कुंभ:- हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. आपण कष्ट करण्याचा आनंद घ्याल व त्यामुळे आपली प्रतिमा उंचावेल. शनी पर्वातून आपण जात असला तरी ग्र हांच्या मिळणाऱ्या साथीने आपण यशाचा मार्ग गाठू शकाल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. कुटुंबातील सर्वांचाच उत्साह वाढता राहील. छोट्या-मोठ्या व्यापारांसाठी हा काळ उत्तम राहील. आपले आ रोग्य ह्या आठवड्यात उत्तम राहिल्याने कोणतीही मोठी स मस्या संभवत नाही. प्र णयी जी वनात हा आठवडा भावनात्मकतेचा राहील.
मीन:- आठवड्याच्या सुरवातीस आपणास नशिबाची साथ मिळाल्याने आपली बरीचशी कामे होऊ शकतील. व्यापारात प्रगती होईल. व्यवसायातील प्रगती दिसून येईल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत वरिष्ठांचा पाठिंबा चांगला राहील. आर्थिकदृष्ट्या विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसू लागेल. सा माजिक क्षेत्रात पुढाकार घ्याल. भावंडांशी काही गोष्टी स्पष्ट बोलताना शब्द जपून वापरा. कौटुंबिक जी वनात आनंद पसरेल. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामात यश प्राप्त होईल. नोकरीत आपली पदोन्नती संभवते. प्रकृती सांभाळा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.