सर्व अप्सरा इतक्या का मुक का असायच्या…पुरूषांना पाहून त्या अधिक का… जाणून घ्या यामागचे रहस्य काय होते?

लाईफ स्टाईल

हिं दू पुराणांनुसार अप्सरा या स्वर्गाधिपती इंद्राच्या दरबारात नृत्यगायन करणाऱ्या स्वर्गीय सुंदऱ्या होत्या. ऋग्वेदानुसार काही अप्सरा या गंधर्वांच्या पत्‍नी किंवा सहचारिणी असल्याचा उल्लेख मिळतो. नृत्य, संगीत, गायन अशा अनेक कलांत अप्सरा निपुण असल्याचे सांगितले जाते. मानवांची नैतिक मूल्ये अप्सरांना बंधनकारक नसावीत असे अनेक कथांतून दिसते.

इतर कोणतेही मर्त्य राजे, देव-दानव किंवा ऋषी-मुनी स्वतःपेक्षा श्रेष्ठ होऊ नयेत आणि इंद्रपद बळकावू नयेत म्हणून या राजांना व ऋषी-मुनींना भुलवण्यासाठी, त्यांच्या उद्दिष्टांपासून त्यांना दूर सारण्यासाठी देवराज इंद्र या अप्सरांना त्यांचा तपोभं ग करण्याकामी वापरत असे असे पुराणांत दाखले मिळतात.

अप्सरा सदैव तरुण असतात, त्यांना वृद्धत्व नाही. भागवत पुराणानुसार कश्यप ऋषींच्या बारा पत्‍नींपैकी मुनि (ऊर्फ वसिष्ठा) ही पत्‍नी बऱ्याच अप्सरांची माता असल्याचे दिसते. अन्य पौराणिक वाङ्‌मयात कश्यपाच्या अरिष्टा (ऊर्फ प्राधा), ताम्रा व खशा नामक पत्‍नी काही अप्सरांच्या आई असल्याचे उल्लेख आढळतात.

काही कथांमध्ये स्वतः ब्रह्मदेवाने अप्सरांची निर्मिती केल्याचेही वाचायला मिळते. याशिवाय, मेरु पर्वताची रवी करून केलेल्या समुद्रमंथनातून ‘रंभादि देवांगना’ निघाल्याचा उल्लेखही सापडतो. इंद्राच्या दरबारात २६ अप्सरा होत्या. त्यापैकी उर्वशी, मेनका, रंभा व तिलोत्तमा या नृत्य-संगीत कलांत विशेष पारंगत होत्या.

या अप्सरांना आपल्या इच्छेप्रमाणे रूप धारण करण्याची विद्या अवगत असल्याचेही सांगितले जाते. या अप्सरांनी आपल्या कामाने स्वर्ग आणि पृथ्वीवरील इतिहास बदलून टाकला होता. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, त्या अप्सरा कोण होत्या आणि त्यांनी एवढे काय केले ?

ध्रुताची:- भारद्वाज ऋषीची तपश्चर्य भं ग करण्यासाठी इंद्रदेवाने ध्रुताची हिला पाठवले. भारद्वाज गंगा स्नान करून आपल्या आश्रमाकडे निघाले असता त्यांनी, नदीतून स्नान करून बाहेर येताना ध्रुताची हिला पाहिले. स्वतःवर संयम न राहिल्याने ऋषींचे वी-र्य पात झाले आणि त्यांनी ते वी-र्य एका मडक्यामध्ये भरून ठेवले त्यातूनच द्रोणाचार्य यांचा जन्म झाला.

रंभा:- रंभेच्या सौंदर्यावरती अनेक जण मोहित होते. प्रत्येक जण तिच्याशी विवाह करू इच्छित होता. रामायणानुसार रंभा ही कुबेर च्या मुलाची पत्नी होती. रावणाने रंभा सोबत जबरदस्ती सहवास करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी रंभेने रावणाला शाप दिला होता की, इथून पुढे त्याने कुठल्याही स्त्री सोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मृ त्यू होईल. सांगितले जाते की याच श्रापामुळे लंकापती रावणाने माता सीतेला हात देखील लावला नाही.

मेनका:- हिं दू पौराणिक कथेनुसार स्वर्ग लोकातील अप्सरांमध्ये सर्वात सुंदर मानले जाते. मेनका ही सुंदरतेसोबत कुशाग्र बुद्धी आणि प्रतिभाशाली स्त्री होती. पौराणिक कथेनुसार, महर्षी विश्वामित्र यांच्या कठोर तपश्चर्येमुळे इंद्रदेव भयभीत झाले आणि त्यांनी मेनकाला पृथ्वीवर जाऊन त्यांची तपश्चर्या भं ग करण्यास सांगितले.

मेनकाने आपल्या सौंदर्यामुळे विश्वामित्र यांची तपश्चर्या भं ग केली. मेनकाला पाहून महर्षी विश्वामित्र मोहित झाले आणि मेनकाच्या प्रेमात पडले. मेनकाला देखील महर्षी विश्वमित्र यांच्यावर प्रेम झाले आणि या दोघांनी विवाह केला. किती दिवसानंतर या दोघांना कन्यारत्न प्राप्त झाले हे कन्यारत्न “शकुंतला” या नावाने प्रसिद्ध झाली. शकुंतला ही राजा कणव याच्या आश्रमामध्ये, लहानाची मोठी झाली आणि पुढे जाऊन तिचा विवाह राजा दुष्यंत यांच्याशी झाला.

उर्वशी:- एकेकाळी भगवान विष्णूने नर आणि नारायण अवतार घेतला. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी नर आणि नारायण यांनी केदारखंडमध्ये आज ज्या ठिकाणी ब्रदीनाथ धाम आहे तेथे तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.त्याच्या तपश्चर्येमुळे इंद्र अस्वस्थ होऊ लागला. नर आणि नारायण यांनी इंद्रलोकाचा ताबा घेऊ नये असे इंद्राला वाटू लागले.

म्हणूनच इंद्राने तपश्चर्या मोडण्यासाठी अप्सरांना नर आणि नारायण यांच्याकडे पाठवले.पण नर आणि नारायण तिच्याकडे आकृष्ट झाले नाहीत, उलट नारायणाने आपल्या मांडीतून इंद्राच्या अप्सरांहून सुंदर अशी अप्सरा निर्माण केली. या अप्सरेचे नाव होते उर्वशी. नारायणाने ही अप्सरा इंद्राला दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *