भारत देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न, भारताची किर्ती जगभरात उंचावणाऱ्या, देशासाठी महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. या पुरस्काराची घोषणा 2 जानेवारी 1954 साली भारत स रका रने राजपत्र काढून 26 जानेवारी 1954 ला प्रत्यक्ष सुरू केली. सेवा, कला, साहित्य, वि ज्ञान, शांतता, मानवता, उद्योग, कारखानदारी आणि 2014 मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या क्रीडा क्षेत्र या क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं.
भारत देशातला हा सर्वोच्च नागरी आणि प्रतिष्ठित पुरस्कार आहे. आणि या पुरस्काराचे स्वरूप असे आहे की, कांस्य धातुपासून पिंपळाच्या पानाच्या आकाराचे एक पदक आणि या पदकाच्या दोन्ही बाजूंवर एका बाजूवर सूर्याची आकृती आणि त्याखाली देवनागरी लिपीत” भारतरत्न” हा शब्द कोरलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतलले राष्ट्रीय चिन्ह 4 सिंहांच्या राजमु द्रा आणि त्याखाली देवनागरी लिपीमध्ये कोरलेले शब्द ”सत्यमेव जयते” अशा स्वरूपाच हे पदक आहे.
आणि पांढ-या रंगाच्या फितीमध्ये बांधून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कृत व्यक्तीला हे पदक प्रदान करण्यात येत. या पदकाबरोबर कोणत्याही स्वरूपाची रोख रक्कम दिली जात नाही. पण या पदकाची किंमत सुमारे अडीच लाख रुपये आहे तरी कसली रोख रक्कम दिली जात नसली तरीसुद्धा या मानकऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा भारत स रका र तर्फे दिल्या जातात.
यामध्ये भारत स रका रच्या कॅबिनेट मं त्र्यांच्या बरोबर व्हीआयपी श्रेणी याना मिळते. तसेच भारतरत्न पुरस्कार मिळणाऱ्या या महान लोकांना राज्य अतिथी म्हणजेच पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांसारखे वागवले जाते. तसेच महत्वाचे म्हणजे संसदेच्या बैठका सत्रांमध्ये सहभागी होण्याची या व्यक्तींना सवलत आहे. तसेच भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी प्रथम श्रेणीचा मोफत विमानाचे तिकीट आणि भारतीय रेल्वेचं मोफत प्रवासाची तिकिटे या मा नकऱ्यांना मिळतात.
तसेच आवश्यकता असेल तर त्या मानकऱ्यांना झे ड दर्जाची सु रक्षा सुद्धा मिळते. तसेच इ न्कम टॅ क्समध्ये सवलत मिळते. तसेच स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या वेळी विशेष अतिथी म्हणून त्यांचा सन्मा न केला जातो. देशातील कोणत्याही राज्यात प्रवासा वेळी स रका री गेस्ट हाऊस वापरण्याची त्यांना सुविधा असते.
तसेच परदेशातील प्रवासादरम्यान भारतीय दूतावासा तर्फे सर्व सुविधा या मानकऱ्यांना पुरविल्या जातात आणि त्याचबरोबर इंडियन ऑर्डर ऑफ प्रि सेडन्स कार्यक्रम यानुसार राष्ट्रपतींना प्रथम स्थान आहे. यानुसार भारतरत्नाच्या मा नकऱ्यांना सातवे स्थान प्रदान केले आहे. देशाचे माजी राष्ट्रपती ज्यांची संपूर्ण कारकीर्द रा जका रणामध्ये गेलेली आहे असे श्री प्रणव मुखर्जी हे नुकतेच भारतरत्नचे मानकरी ठरले होते.
तसेच पहिली महिला मानकरी ज्या ठरलेले आहेत त्या म्हणजे इंदिरा गांधी, त्यांना 1971 झाली हा पुरस्कार मिळाला. तसेच लालबहादूर शास्त्री यांना हा पुरस्कार 1966 ला मिळाला. तसेच महात्मा गांधींचे अनुयायी नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष त्यांना 1990 साली हा पुरस्कार मिळालेला आहे.
आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरस्काराचे मा नकरी ठरलेल्या महाराष्ट्रीय व्यक्ती… आतापर्यंत आठ महाराष्ट्रीयन व्यक्तींना भारतरत्न द्वारे सन्मानित केलेलं आहे. त्याच्यानंतर पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती मानकरी ठरले ते म्हणजे महर्षी धों डो केशव कर्वे. 1958 साली त्यांच्या वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांच्या ज न्मशताब्दी निमित्ताने त्यांना पुरस्काराने सन्मानित केल आहे.
आतापर्यंत महर्षी धों डो केशव कर्वे, पांडुरंग वामन काणे, आचार्य विनोबा भावे यांना म रणोत्तर, डॉ क्ट र बाबासाहेब आंबेडकर यांना म रणोत्तर, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, क्रिकेटमधील देव सचिन तेंडुलकर आणि 2019 साली नानाजी देशमुख यांना म रणोत्तर असं आतापर्यंत आठ महाराष्ट्र व्यक्ती या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या आहेत.
तसेच पंडित भीमसेन जोशी यांचे नाव महाराष्ट्र व्यक्तीमध्ये जातं, तर पुरस्कारासाठी शिफारस पं तप्रधान राष्ट्रपतींकडे करतात. आतापर्यंत पं तप्रधान पदावरती असताना पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांना या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. तसेच भारतरत्न हा पुरस्कार काढून घेणं, भारतर त्न रजिस्टरमध्ये नोंदवलेले नाव कमी करण्याचा अधिकार महामहीम राष्ट्रपतीना असतो.
आणि काढून घेतलेले पदक पुन्हा त्या व्यक्तीला देणे, त्याच्या नावाची रजिस्टर मध्ये पुन्हा नोंद करण्याचा आ देश देणे याचा अधिकार सुद्धा महामहीम राष्ट्रपती यांनाच आहे. असा हा महान, मौल्यवान आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या भारतरत्न पुरस्कार विजेत्यांना कोटी कोटी प्रणाम..
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.