सध्या कुठे आहे शिवछत्रपतींचे 32 मन सुवर्ण सिंहासन? कोण केले होते ते गायब…काय आहे त्यामागील रहस्य जाणून घ्या…अज्ञात असा इतिहास

लाईफ स्टाईल

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी ३२ मण वजनाचे खास सोन्याचे सिंहासन तयार करण्यात आले होते. हे सिंहासन अत्यंत मौल्यवान तसेच असंख्य आणि अगणित रत्ने, हिरे, मोती यांनी जडवले गेले होते. हे सिंहासन रायगड जिल्ह्यातील पोलादपुर येथील श्री. रामजी दत्तो यांनी घडवले असल्याची इतिहासामध्ये नोंद आहे.

इ.स. ६ जून १६७४ मध्ये छत्रपती शिवरायांचा किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, म्हणून हा दिवस हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासातील सोनेरी दिवस मा नला जातो. कारण या दिवशी क्षत्रिय कुलावतंस शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले होते, आणि 32 मणाच्या सोनेरी सिंहासनावर विराजमान झाले होते. आणि या 32 मण सोन्याच्या सिंहासनाचे वजन किलो मध्ये करावयाचे म्हटल्यास १४४ किलो इतके होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होताच सगळ्या जा ती-ध र्माच्या लोकांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, बहुजनांचे आणि कामगारांचे रा ज्य अस्तित्वात आले. राजा शिवछत्रपतींना 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाल्याचे पाहताच संपूर्ण रयत आनंदित होती. त्या वेळी पारतंत्र्याचा अंधार दूर करून छत्रपती शिवरायांनी रयतेला स्वातंत्र्याची सकाळ दाखवली.

याच सिंहासनावर बसून शिवरायांनी रयतेला सं रक्षणाचा विश्वास दिला होता. याच सिंहासनाने मुघलांच्या विशाल सै न्याला आव्हान दिले होते. पण या शिवछत्रपतींच्या 32 मण सिंहासनाचे आज साडेतीनशे वर्षांनंतर काय झाले हे लोकांना माहिती नाही. इ.स.१६८९ हे पूर्ण वर्षच स्वराज्याच्या इतिहासात अत्यंत दु र्दैवी आणि वा ईट ठरले. कारण या वर्षाच्या सुरुवातीलाच हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना द गाफ टका करून, त्यांची ह त्या करण्यात आली होती.

यामुळे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती राजाराम राजे यांना, पन्हाळागड, प्रतापगड, जिंजी तसेच विशालगड अशा किल्यात राहावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबियांना बं दी करण्यासाठी औरंगजेबाने रायगड का बीज कराण्यासाठी सरदार जुल्फिकार खानला पाठविले. तेव्हा या हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड ही होती. तसेच याच ठिकाणी शिवरायांचे 32 मण सुवर्ण सिंहासन होते. कालांतराने राजाराम महाराज यांना जिंजीला पाठविले.

त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या ध र्मपत्नी महाराणी येसूबाई यांनी मुघलांशी तब्बल आठ महिने झुं ज दिली, पण सरते शेवटी मोगलांच्या लाखो सै न्याच्या पुढे येसूबाई यांना माघार घ्यावी लागली, आणि रायगडावर असलेलं छत्रपती कुटुंब व चांगल्या मौल्यवान वस्तू मोगल घेऊन गेले. सरदार मुसतेअली खान याला औरंगजेबाने रायगडावरील सर्व खजिना लु टायला सांगितले होते.

त्यामुळे कदाचित या मध्येच 32 मन सुवर्ण सिंहासन सुध्दा ज प्त केले गेले, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. पण त्या सोन्याच्या सिंहासनाचे काय झाले, हे कोणालाच माहीत नाही. यामध्ये काही इतिहासकारांच्या मते, रायगड ताब्यात आल्यावर मुघलांची 32 मन सुवर्ण सिंहासनावर नजर गेली. त्या सुवर्ण सिंहासनावावर जुल्फीकार खांन याने घणाचे घा व घालून ते सिंहासन तो डण्याचे काम केले.

पण त्याचा काही भाग तसाच राहील्याने, हिऱ्या मोत्यांनी आणि रत्नांनी जडवलेले 32 मन सुवर्ण सिंहासनाला मोगलांनी आ ग लावून, ते सोने वि तळवण्याचे काम केले. शिवछत्रपतींचे हिंदवी स्वराज्याचे सिंहासन मोगलांनी उद्ध्वस्त केल्याची माहिती समजताच, स्वराज्याचे मावळे पे टून उठले. तेव्हा धनाजी, संताजी, विठोजी अशा अनेक शुरविर मावळ्यांनी, औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले होते.

त्यामुळे हिंदवी स्वराज्य मोगलांपासून सुरक्षित राहिले. शिवरायांचे सिंहासन जुल्फिकार खानने फो डले किंवा लु टले असावे आणि त्याच्या तावडीतून सु टले असेल तर इंग्रजांनी १८१८ मध्ये रायगड घेतला तेव्हा त्यांनी ते नेले असावे किंवा राजाराम महाराजांच्या आज्ञे वरून सिंहासन कोण्या अज्ञात स्थळी लपवले असावे. अशा शंका आणि दावे एका बाजूने व्यक्त केले जातात.

त्यानंतर पेशव्यांकडे रायगडची व्यवस्था ३०/०८/१७७२ पासून आली. त्यानंतर पेशव्यांच्या कागदपत्रात त्या सिंहासनाचा उल्लेख वेळोवेळी झालेला आहे. उदा. पेशव्यांनी १६ मार्च १७७३ मध्ये सिंहासनासाठी खरेदी केलेल्या कापडावर १६०८ रुपये ८ आणे खर्च टाकले आहेत. रायगडाचा ताबा जेव्हा इंग्रजांकडे आला तेव्हा त्यांनाही काहीही आढळून आले नाही. उपलब्ध कागदपत्रांवरून गडाच्या खाली सिंहासन नेल्याचे उल्लेख मिळत नाहीत किंवा त्याचबरोबर ते कोणी लु टल्याचे मोगली कागदपत्रं सांगत नाहीत.

त्यामुळे शिवरायांचे सिंहासन गडावरच कोठेतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता ते गडावरील तलावात आहे की अन्यत्र कोठे हा संशोधनाचा विषय असू शकतो. एका आख्यायिकेनुसार राजाराम महाराजांनी गड सोडताना सिंहासन गंगासागर तलावात लपविले. तलावातच का? तर सिंहासनाच्या जागेवरून लपविण्याजोगी जवळची जागा तळेच आहे व त्याकाळी तळे उपसता येणे अवघड होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *