आपल्याला माहित आहे कि आपण कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना आपण सर्वात पहिला गणपती या देवतेला आवाहन करतो, आणि आपले सर्व कार्य कोणत्याही अडचणी शिवाय अगदी आनंदाने पार पडावे अशी प्रार्थना आपण करतो. तसेच गणपती हे शिवपार्वती यांचे पुत्र असून त्यांच्या आधी पूजेचा मान श्री गणेशाना मिळालेला आहे. म्हणून गणपतीला आद्य देवता असे म्हटले जाते.
तशी गणपतीला असंख्य नावे आहेत. जसे की लंबोदर, धू म्रवर्ण, एकदंत, विघ्नेश्वर, वक्रतुंड, कृ ष्णपिं गाक्ष, भालचंद्र, विनायक, अशा आणि कितीतरी नावांनी लोक गणपतीची आराधना करत असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला बाप्पा योग्य फळ देखील देत असतात. तसेच आपणास माहित असेल कि भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात चतुर्थीला गणपतीचे पृथ्वीतलावर आगमन होते.
आणि या दिवसाची लोक अगदी उत्कंठेने आणि आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी लोक मोठ्या थाटामाटाने, वाजत गाजत, अति आनंदाने आपल्या आद्य आणि आराध्य देवतेचे स्वागत करतात. मोठ्या श्रद्धेने आणि भक्ती भावाने त्याला घरी आणून बसवतात. तसेच या गणेशाचे आणखी एक नाव म्हणजे गजानन, गजानन याचा अर्थ गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे मुख. तर ह त्तीचे मुख असलेला म्हणजेच गजानन.
तर आता गणेशाला हत्तीचे मुख कसे? तर त्याचे एकदा काय झाले, कैलासावर असताना पार्वती स्ना न करण्यासाठी जाणार असते. त्यावेळी भगवान शंकर कैलासावर नव्हते, म्हणून त्यावेळी माता पार्वतीने आपल्या अंगावरच्या मळापासून एक बालक बनवले आणि त्यात तिने आपला प्रा ण घातला आणि तो बालक जि वंत झाला. मग तिने त्याला गणेश असे नाव दिले आणि गणेशाला सांगितले कि, मी स्नान करण्यासाठी जात आहे.
त्यामुळे तू इथेच थांब आणि माझ्या आज्ञेशिवाय कोणालाही आत सोडू नको. असे म्हणून माता पार्वती स्ना नासाठी निघून गेली. पण थोड्यावेळातच भगवान शंकर तिथे आले आणि आत जाऊ लागले. तेव्हा गणेशाने त्यांना दारातच आडवले. गणेश म्हणाला, मी तुम्हाला आत सोडू शकत नाही. तेव्हा भगवान शंकरानी विचारले तू कोण? तेव्हा गणेश म्हणाला, मी पार्वती मातेचा पुत्र आहे.
माझ्या मातेने मला अशी आज्ञा दिली आहे की, तिच्या आ ज्ञेशिवाय कोणालाही आत सोडायचे नाही. त्यावेळी भगवान शंकरांनी त्याला अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो बाल गणेश शंकरांना आत सोडायला तयार होईना. हे पाहून भगवान शंकरांना भयंकर क्रो ध आला. इतके सांगूनही हा बालक ऐकत नाही हे पाहून भगवान शंकर यांनी रा गाच्या भरात गणेशाचे म स्तक ध डावेगळे केले.
पण काही वेळातच माता पार्वती तिथे आली आणि आपल्या पुत्राचे ध डा वेगळे झालेले शि र पाहून ती खूपच क्रो धित झाली आणि विलाप करू लागली. ती भगवान शंकरांना म्हणाली, माझा पुत्र मला जि वंत करून पाहिजे. तेव्हा पार्वतीचा आ क्रोश आणि हट्ट पाहून भगवान शंकरांनी नंदिला आज्ञा दिली, तू जा आणि उत्तरेकडे तोंड करून झोपलेल्या मातेच्या बाळाचे म स्तक ध डावेगळे करून ताबडतोब घेऊन ये.
आज्ञा मिळताच नंदी निघून जातो आणि थोडे अंतर गेल्यावर त्याला नुकतीच पिल्लाला जन्म दिलेली हत्तीन आणि तिचे पिल्लू उत्तरेकडे तोंड करून झोपलेले दिसले. त्याने लगेच हत्तीच्या पिल्लाचे म स्तक ध डावेगळे केले आणि कैलासावर घेऊन आला आणि भगवान शंकरांनी ते म स्तक गणेशाच्या ध डावर बसवले आणि तो जि वंत झाला. तेव्हापासूनच गणेशाला गजानन असे म्हणतात.
मग आता प्रश्न येतो कि, गणेशाचे ध डा वेगळे झालेले म स्तक कोठे जाऊन पडले? तर असे म्हटले जाते की, भगवान शंकरांनी गणेशाचे ध डावेगळे केलेले म स्तक एका गुहेमध्ये सुरक्षित ठेवलेले आहे आणि भगवान शंकर स्वतः त्याचे र क्षण करतात. तसेच या गुहेला आज पाताळ भुवनेश्वर या नावाने ओळखले जाते. तर या गुहेतील गणेशाच्या मूर्तीला आदि गणेश या नावाने ओळखले जाते.
तर सध्या ही गुहा उत्तराखंड मध्ये पिठोरा गड येथे आहे आणि ही गुहा गंगोली घाटापासून 14 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. आणि याठिकाणी आजही भगवान शंकर आपला पुत्र गणेशाच्या म स्तकाचे या गु हेमध्ये र क्षण करतात अशी अख्यायिका आहे. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.