आपल्याला माहित आहे पुणे तिथे काय उणे! आणि ही म्हण जगजाहीर आहे. महाराष्ट्रची सांस्कृतिक राजधानी. सर्वात मोठा आयटी पार्क, पुणेरी पाट्या, पाट्यांवरून होणारे विनोद या सर्वच गोष्टींसाठी प्रसिद्ध शहर म्हणजे आपले पुणे. तसेच शिवरायांच बालपण गेलं ते इथच तसेच शाहिस्तेखानाची बोटे तो डली ती इथल्याच लाल महालात.
पेशवाई, शनिवारवाडा, टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव, मानाचे गणपती, त्यांच्या सार्वजनिक मिरवणुका, अफाट देखावे, प्रचंड पेठा सगळ्यांसाठीच प्रसिध्द असलेले पुणे, विद्येच माहेरघर म्हणूनही ओळखल जाते. त्याचं विद्येचे आराध्य दैवत म्हणजे गणाधिपती गणपती आणि पुण्यातील गणेशोत्सव त्यांच्या भव्य देखाव्यांसाठी प्रसिध्द आहेत.
पण इथले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. याच गणपतीच्या इतिहासाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. पुण्यातील पाच मनाच्या गणपतींमध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीचा समावेश नसला तरी, सार्वजनिक गणेशोत्सवात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या मूर्तीला दैवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे.
तर आपणांस सांगू इच्छितो कि मंडळाची स्थापना १८९३ साली करण्यात आली. १८९३ मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी या मूर्तीची स्थापना केली. १९६८ साली ‘दगडूशेठ गणपती’ ची मूर्ती मंडळाने प्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार आणि यंत्रविद्येचे अभ्यासक शंकरआप्पा शिल्पी यांच्या कल्पनेतून ही मूर्ती तयार करून घेतली. त्याकाळी या मूर्ती बनवण्याचा खर्च ११२५ रुपये इतका आला होता.
तसेच मूर्ती तयार करण्याचे काम सुरु असताना सूर्यग्र हण आले होते आणि मग ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेशयंत्र बसवले तर मूर्तीचे तेज उत्तरोतर वाढत जाईल आसनी मूर्तीला दैवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती. त्यांच्या श्रद्धेचा मंडळातील व्यक्तींनी आदर करून यंत्र बसून घेतले. संपूर्ण धा र्मिक पद्धतीने विधिवत ही मूर्ती घडवण्यात आली.
पुढे १९८४ साली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. मंदिर परिसर अपुरा पडू लागल्यावर २००२ मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले. तसेच नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ख्याती आहे. भक्तांच्या म नोकामना पूर्ण करणारा गणपती हा पुण्यातील श्रीमंत गणपती आहे पण श्रीमंत असला तरी तेवढाच दानशूर सुद्धा आहे बर का!
अनेक सा माजिक संस्था आणि लोकांच्या मदतीसाठी खं बीरपणे उभे राहणारे असे हे मंडळ आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पूर्वीच्या काळातील सुप्रसिध्द मिठाई व्यापारी होते. पुण्यातील बु धवार पेठेतील दत्तमंदिर ही त्यांची राहती इमारत होती. प्ले गच्या साथीत दगडूशेठ यांच्या मुलाचा मृ त्यू झाला. यामुळे दोघे पती पत्नी खचून गेले, त्यावेळी त्यांचे गुरु माधवनाथ महाराज यानी त्यांना आधार देत गणपती आणि दत्ताची मूर्ती तयार करून त्यांची पूजा करा असे सांगितले.
भविष्यात हि दोन्ही दैवते तुमचे नाव उज्वल करतील असे देखील त्यांनी सांगितले. महाराजांनी सांगितल्या प्रमाणे शेठ्जीनी संगमरवरी दत्ताची मूर्ती आणि गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. गणपती मूर्तीची प्रा ण प्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली. ही परंपरा परिसरातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी पुढे चालू ठेवली.
हे मंदिर वास्तुशात्रानुसार बनवले आहे. तसेच मंदिराचा मुख्य मंडप आणि भिंतींवर आदिशक्तीच्या अद्भुत मूर्ती आहेत. तसेच इथे फक्त बाप्पाच श्रीमंत नाही तर त्याच्या शरण येणारा प्रत्येक भक्त दा रिद्र आणि दुः ख यापासून मुक्ती मिळवतो. तसेच या मूर्तीची उंची ७.५ फूट आहे आणि अंदाजे ८ किलो सोन्याने मढवलेली आहे. मंदिराची निर्मिती अतिशय सुंदर पद्धतीने केली आहे. आणि बाप्पांची मूर्ती मंडपाबाहेर उभे राहूनही पाहता येते.
या गणपतीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट स्थापन झाला. हा ट्रस्ट अनेक समाजोपयोगी कामांना मदत करण्यात अग्रेसर आहे. आज दगडूशेठ गणपती हा सर्व भक्तांचा लाडका बाप्पा आणि आराध्य दैवत आहे. शहराच्या अभिमानाचे स्थान म्हणून प्रसिद्धीस आले आहे.
ट्रस्टच्या नावाने आज बरीच कार्ये केली जातात. मंदिराला एक मोठी आणि वैभवशाली परंपरा आहे. आज महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय मंदिर म्हणून हे मंदिर प्रसिध्द आहे. इथून कोणताही भक्त नि राश होऊन परतत नाही अशी याची ख्याती आहे. बोला गणपती बाप्पा मोरया !!!