श्रीमंत असलेल्या बापाला मुलगा चुना लावून गेला अमेरिकेला; त्यानंतर बापाचे झालेले हाल पाहून तुम्हालासुद्धा रडू येईल..प्रत्येकाने वाचले पाहिजे असा लेख

लाईफ स्टाईल

मित्रांनो आयुष्यात खूप संकटे येतात आणि लोक या संकटांचा उगाच बाऊ करतात. परंतु आपल्या भोवती असे लोक आहेत त्यांच्या वागण्यामुळे सर्वांसमोर एक आदर्श निर्माण होतो. आज अशीच एक कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. जी वाचून तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल. अजय नेहमी प्रमाणे मंदिरच्या बाहेर असलेल्या भिक्षेकरी यांना तपासत होता.

हे सगळे भिक्षेकरी म्हणजे रुग्ण होते, पण त्यावेळी त्याची नजर एका कोपऱ्याकडे गेली. तेथे एक बाबा बसले होते. दिसायला तेजस्वी, त्यांच्या चेहऱ्यावर वेगळे तेज होते चेहरा खूप काही बोलत होता. स्वच्छ कपडे घातलेले, साधी राहणीमान त्यांच्याकडे पाहतच होतो. पण ते भिकारी नव्हते हे नंतर कळालं. त्यांच्या उज व्या गुडघ्या पासून त्यांना पाय नव्हता, कोणीतरी त्यांना काहीतरी देत होते.

अजय त्या बाबा कडे जात असताना त्या ठिकाणी त्याला सांगितले डॉ क्टर तुम्ही तिथे जाऊ नका तो माणूस वेडा आहे. पण अजय व्यक्तीजवळ गेला. त्याने हात पुढे केला पण त्या बाबांनी काही हात पुढे केला नाही. पुढे अजय म्हणाला बाबा काही प्रॉ ब्लेम आहे का ? ते म्हणाले मला एक स मस्या आहे. ते अजयला म्हणाले आय हॅव वन प्रॉ ब्लेम इन माय राईट आईज आय ह्याव पेन, माझ्या उजव्या डोळ्यात दु खत आहे.

त्यांचं इंग्रजी ऐकून अजयला धक्काच बसला. डोळ्यात पाहिलं त्यांचे डोळे कोरडे पडले होते. त्यांच्या डोळ्यात मोती बिंदू झाला आहे, त्यांना सांगितलं तेव्हा बाबा म्हणाले ओ माय गॉड मोती बिंदू. 1999 मध्ये माझा उ पचार झाला होता. अजय म्हणाला बाबा मी आठवड्यातून दोन दिवस असतो पण तुम्ही अनेक दिवस येथेच दिसतात. तुम्ही भिक्षेकरी वाटत नाहीत. तुम्ही शिकलेले वाटता त्याचं हे बोलणं ऐकून ते हसायला लागले.

तेव्हा त्यांना विचारलं काय झाले बाबा का हसताय ? मी काही चुकीचे बोललो का मी तुम्हाला दुखावलं तर नाही ना ?माफ करा. ते म्हणाले तुला माझ्या बद्दल माहित असून काय करणार आहेस ? अजय आणि बाबा एका टपरीच्या बाजूला जाऊन बसले आणि बाबा बोलायला लागले. ते म्हणाले आय एम मे कॅनिकल इं जिनिअर वरिष्ठ पदावर या कंपनीमध्ये कामाला होतो. माझ्या ज्युनियरला काम शिकवत असताना माझा पाय मशीन मध्ये सापडला.

कंपनीने खर्च दिला मला पैसे देऊन घरी बसवलं. त्यानंतर कार्यशाळा काढली आणि कुटुंबाची काळजी घेतली. माझ्या मुलाला सुद्धा मेकॅ निकल इंजिनियर केलं. व्यवसाय वाढवण्यासाठी त्याने आपल्या नावावर घर आणि कंपनी केली आणि नंतर ती विकली सुद्धा पण मी त्याला थांबवलं नाही. कारण त्याचा व्यवसाय वेगाने वाढवावा आणि तो अमेरिकेला गेला.

तेव्हा सुद्धा बाबा हसत होते एखाद्या व्यक्तीच्या हसणे एवढे तरुण असू शकते, हे अजयने पहिल्यांदाच पाहिलं अजय म्हणाला बाबा तुम्ही खूप शिकलात. कुठे काम करा तुम्हाला खूप अनुभव आहे. कोणत्याही कंपनीत काम करू शकता. बाबा म्हणाले मी येथे एका कंपनीमध्ये काम करतो. त्यानंतर पाच ते सात इथे येऊन बसतो. इथे खायला देतात ,पण जे खायला दिले जाते ते स्वीकारत नाही.

पण काही पैसे दिले तर मी स्वीकारतो. माझी घरी बायको आहे. तिला लकव्याचा त्रा स आहे. मला सात हजार पगार मिळतो. मी खुश आहे. मी घरी गेलो की तिघांसाठी जेवण बनवतो. आता डॉ क्टरांना समजत नव्हते की हे दोघे म्हणाले होते आणि तिसरा कोण ? लहान असताना माझ्या मित्राच्या आईने माझ्यासाठी सर्वकाही केले. काही दिवसांपूर्वी मित्राचे निधन झाले. त्याची 92 वर्षाची आई पोरकी झाली. माझ्यावर केलेले सर्व काही जाणीव ठेवून मी त्यांना घरी आणले.

आईला मधु मेह आणि उच्च र क्तदाब आहे. मी खर्च करतो. पूर्ण करण्यासाठी येथे बसतो, जे काही पैसे मिळतात ते पैसे मी मे डिकल वाल्याला घेऊन देतो. अजयला बाबांचा अभिमान वाटत होता. स्वतः अपंग असताना दुसऱ्यांचा विचार करतात. बाबा म्हणाले ती दुसऱ्या कोणाच्या आई नाही ती माझी आई आहे. कारण या आईने माझ्यासाठी खूप काही केले. आता हे माझे कर्तव्य आहे. तुम्ही तर औ षधासाठी बसलात हे तुमच्या घरच्यांना कळलं तर ?

ते म्हणाले त्या अंथरुणातून उठू पण शकणार नाही. मी घरी गेल्यावर त्यांच्यासाठी सगळं काही करतो. बाबा म्हणाले तुम्हाला चालणार असेल तर एक सांगू का, तुम्ही चांगले काम करता. असेच काम करत राहा. त्यावर अजय म्हणाला बाबा तुम्ही मला तुमचा मुलगा समजा. आजीला जी औ षधे लागतात ती माझ्याकडून घ्या वाटले तर. मला नातू समजा त्यांचा आधीच माझा मुलगा सोडून गेला.

आता जर तुम्ही मला जी व लावला आणि तुम्ही पण मला सोडून गेला तर मग माझ्यासाठी पुन्हा थाऱ्यावर येणं कठीण होऊन जाईल. त्या बाबांनी अजयच्या हातावर टाळी दिली आणि बाबांनी त्याचा निरोप घेतला. त्यांच्या स्पर्शातून त्यांनी ते नात मनोमन स्वीकारल्याची जाणीव मात्र अजयला झाल्यावाचून राहिली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *