शौचास न येणे किंवा त्यासाठी वेळपर्यंत बसावे लागते अश्या लोकांनी करा हे उपाय…मिळेल त्वरित आराम ! पोटासंबंधित सर्व आजारांवर प्रभावशाली घरगुती उपाय….

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, बद्धकोष्ठता, मलावरोध ही समस्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये आढळते. बद्धकोष्ठता म्हणजेच पोट साफ न होणे खाण्यातील बदलामुळे किंवा शरीराला योग्य पाणी न मिळाल्यामुळे सकाळी उठल्यावर पोट साफ होत नाही आणि पोटाचे विकारही होतात. याकडे दुर्लक्ष करणे शरीरासाठी अपायकारक ठरू शकते.

पोट साफ न झाल्यामुळे दिवसभर जड पणा, अपचन, डोकेदुखी, पोटदुखी, अस्वस्थता जाणवू शकते. बद्धकोष्ठता होण्याचे नेमके कारण म्हणजे दैनंदिन जीवनात व्यायामाचा अभाव, वेळच्यावेळी जेवण न घेणे, जेवणात पालेभाज्याचा अभाव, मैद्याच्या पदार्थांचे खुप सेवन करणे. जेवणात दूध, तूप, लोणी यांचा समावेश कमी असणे, पाणी कमी पिणे अशा चुकीच्या सवयींमुळे बद्धकोष्ठता होते.

तसेच काही जणांना चुकीच्या पद्धतीने जेवण्याच्या सवयी असतात जस की पटापट खाणे, अन्न नीट चावून न खाणे, भरपेट खाणे इत्यादी. यासाठी काही घरगुती आहेत जे केल्यामुळे तुम्ही बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करू शकता ते आपण पाहुया.

उपाय- 1 लिंबू – एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यामध्ये थोडंस लिंबू रस टाकून सकाळी उपाशीपोटी तुम्हाला प्यायचं आहे असं केल्याने तुमचे पोट साफ होते शिवाय शरीरही साफ होते. एरंडेल तेल- एरंडेल तेल हा बद्ध’कोष्ठतेवरील फार जुना आणि प्राचीन उपचार आहे. या तेलामुळे आतड्यातील जं’तू म’रतात. जर आपल्याला एक चमचा एरंडेल तेल पिणे शक्य नसल्यास ते ग्लासभर दुधात एकत्र करून रात्री प्यावे. आतड्याच्या धीम्या कार्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास सं’भवतो तो दूर होईल. आणि आतड्यासं’बंधितच्या सर्व सम’स्यांवर आपण मा’त कराल.

अळशीच्या बियांनी दूर होते बद्धकोष्ठता:- बद्धकोष्ठतेमुळे एखाद्या व्यक्तीला आठवड्यातून तीन पेक्षाही कमी वेळा बाथरूमला होते. ही एक सामान्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला कोरडे किंवा कडक मल, पोटदुखी, सुस्तीसोबतच सूज येण्याची समस्या निर्माण होते. जरी बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी औषधे खूप प्रभावी असली तरी अळशी सारख्या नैसर्गिक उपायांनी लोकांना बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यास यश मिळवून दिले आहे.

तज्ञांचे म्हणणे आहे की अळशी मध्ये असलेले विद्रव्य फायबर पाण्यात विरघळते. ज्यामुळे मल एकदम मऊ होतो आणि तो गुदद्वारातून अगदी सहज बाहेर पडतो. एक चमचा बारीक केलेल्या अळशी मध्ये 1.9 ग्रॅम फायबर असते, जे दैनंदिन मूल्याच्या 8 टक्के असते. अळशीच्या बिया कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळून जातात.

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी अळशीचा वापर कसा करावा?:- संपूर्ण बियाणे ग्राऊंड सीड्स आणि तेलाच्या स्वरूपात अळशी सहज उपलब्ध होते. आपण ते कोणत्याही स्वरूपात घेऊ शकता. पण बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दररोज 1 ते 4 चमचे अळशीचे सेवन केले पाहिजे. अळशीचे तेल आणि संपूर्ण बियाणे यांच्या तुलनेत ग्राऊंड सीड्सचे सेवन जास्त प्रभावी आहे.

जास्तीचे फायबर मिळवण्यासाठी अळशी दलिया, सूप किंवा रोजच्या वापरातील धान्यांमध्ये मिसळून खाणं एक चांगला मार्ग आहे. जर तुम्हाला या सर्व गोष्टी आवडत नसतील तर दही किंवा स्मूदीमध्ये देखील अळशी घालून तुम्ही आस्वाद घेऊ शकता. दिवसातून एकदा किंवा दोनदा एक ग्लास पाण्यात 1 चमचा ग्राउंड फ्लेक्स सीड्स घालून प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होते.

मनुके – मनुके देखील बद्धकोष्ठतेवर फार गुणकारी आहेत. यामध्ये असणारे फायबरमुळे पोट साफ होते. संध्याकाळी 10 ते 12 मनुके घेऊन एक ग्लास दुधामध्ये ते उकळून घ्यायचे आहे आणि कोमट झाल्यानंतर ते दूध तुम्हाला प्यायचे आहे आणि त्यातील मनुकेही खायचे आहेत. हा उपाय तुम्हाला सलग दहा ते बारा दिवस रात्री झोपताना करायचा आहे. अस केल्याने तुम्हाला जो अपचनाचा त्रास होतो तो कमी होईल व पोट साफ होईल.

आवळा चूर्ण – एक कप कोमट पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा आवळा पावडर टाकून हे पाणी तुम्हाला रात्री झोपताना प्यायचं आहे, हा उपाय तुम्हाला सलग 10 ते 11 दिवस करायचा आहे. आवळा हा पाचक असतो त्यामुळे तुमचे अन्नपचन चांगल्या प्रकारे होते. हा उपाय केल्याने तुमच्या आतड्यांना मऊ पणा येतो व मला पुढे सरकला जातो आणि पोट साफ होते.

गाईचे तूप – हा उपाय तुम्हाला बारा महिने करता येतो. ज्यांना पोट साफ होत नाही त्यांनी एक ग्लास कोमट पाण्यात 1 ते 2 चमचे गाईचे तूप टाकून रात्री प्यायचं आहे यामुळे तुमच्या आतड्याचे चांगल्या प्रकारे ग्लिसरीन होते व पोट साफ होते. पेरू – पेरूमध्ये व्हिटॅमिन बी आणि सी भरपूर प्रमाणात आहे. पेरूच्या गरामध्ये व बियांमध्ये असणाऱ्या फायबरमुळे पोट साफ होऊन भूक लागते. त्यामुळे पोटाच्या कोणत्याही समस्या असतील तर पेरू नक्की खा.

त्रिफळा चूर्ण – यामध्ये हिरडा , बेहडा व आवळ्याचे चूर्ण असते म्हणून याला त्रिफळा चूर्ण म्हणतात. एक चमचा त्रिफळा चूर्ण तुम्हाला एक कप कोमट पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि रात्री झोपताना प्यायचं आहे. पण हा उपाय तुम्हाला महिन्यातून 3 ते 4 वेळेसच करता येतो म्हणजेच आठवड्यातून एकदा हा उपाय केला तरी चालतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *