वैकुंठ कसा असतो..जाणून घ्या वैकुंठा बद्दलचे हे रहस्य जे अजून कोणलाही माहित नाही…कारण तिथे

धार्मिक

नमस्कार मित्रांनो! आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सनातन शा स्त्रांमध्ये स्वर्ग-नर्क, पाप-पुण्य, मोक्ष, आत्मा इत्यादी गोष्टींचा उल्लेख सापडतो. तसेच वैकुंठ अशा नावाचा एक घटक किंवा भाग स्वर्गलोकामध्ये अस्तित्वात असल्याचे प्राचीन काळापासून सांगण्यात येते. आणि हे वैकुंठ म्हणजे स्वर्गाहूनही समृद्ध; अशाप्रकारे त्याचे वर्णन केले जाते.

संत तुकाराम महाराज जे वारकरी संप्रदायामध्ये एक फार मोठे संत होऊन गेले त्यांना त्यांच्या पुण्यामुळे वैकुंठ प्राप्त झाले असे म्हणतात. स्वतः भगवंत त्यांना वैकुंठामध्ये नेण्यासाठी पृथ्वीवर अवतरले आणि वैकुंठात त्यांना घेऊन गेले. असे अनेक अभंगांमधून आपण ऐकले असेल. पण हे वैकुंठ आहे तरी कसे? खरंच आहे आणि आहे तर कुठे आहे?

आणि असेल तर मग तिथे काय वेगळं असेल? शा स्त्रकारांनी वैकुंठा बद्दल इतके आकर्षण कोणत्या कारणामुळे निर्माण केले? त्याबाबत आपण थोडे जाणून घेऊ. माणूस पाप पुण्य करतो आणि त्याप्रमाणे त्याला त्याचे फळ मिळते. पुण्य केल्यास असे म्हणतात की स्वर्गात जागा मिळते आणि पाप झाल्यास न रक येताना भो गाव्या लागतात. याच श्रेणीमध्ये पुढे जर आपण गेलो.

तर माणूस जेव्हा सत्कर्म करत करत पुण्याचा संचय करत जातो आणि त्याचा पुण्यसंचय इतका वाढतो की तो परमेश्वराचा प्रा णप्रिय घेऊन जातो. आपल्या भक्तीने, उपासनेने, कर्माने, विचाराणे एखादा व्यक्ती जेव्हा उत्तुंग शिखर गाठतो तेव्हा भगवंत त्याच्यावरती प्रसन्न होऊन त्याला कायमचे सुखी करतो आणि आपल्याजवळ ठेवतो.

अशा प्रकारे तो व्यक्ती जी वन म रणाच्या या दुष्ट बंधनातून कायमचा मुक्त होतो. आणि केवळ आणि केवळ परमेश्वराचाच बनून राहतो. थोडक्यात समजून घेऊ. आपण एखादी जर परीक्षा पास करण्यासाठी अभ्यास करत असू. म्हणून आपण अभ्यास केला, सातत्याने त्याचा ध्यास घेतला, त्याच्या पुढे आपल्याला सर्व शून्य वाटले. आपण रात्रंदिवस मेहनत करून वाचन, लेखन, मनन, चिं तन करून सतत अभ्यास केला.

ज्ञान प्राप्त करण्याची साधना केली तर त्याचे फळ म्हणून आपल्याला इच्छित असलेली परीक्षा आपण पास होऊन आपल्याला मनासारखी नोकरी लागतेच. अशाच प्रकारे साधना केल्याने, भक्ती केल्याने, भगवंताच्या मार्गावर निश्चितपणे चालल्याने अखेर भगवंत भेटतो. म्हणजेच आपल्या मनासारखे होते.

याबाबतचे अनेक उदाहरण आपल्या पौराणीक तसेच प्राचीन इतिहासात सापडतात. जसे की भक्त प्रल्हादाने भगवान विष्णुची साधना केल्याने एके दिवशी भगवान विष्णू त्याच्या र क्षणासाठी धावले. त्याचप्रमाणे शबरी नावाची आदिवासी स्त्री होती. तिनी वर्षानुवर्ष श्रीरामाच्या नाम स्मरणात आणि साधनेत घालवली. आणि अखेर तिच्या इच्छेनुसार तिला श्रीरामाचे दर्शन झाले.

अहिल्या नावाची एक स्त्री आपल्या पापकर्मामुळे भ्र ष्ट झाली आणि त्यामुळे प्रायश्चित म्हणून श्री रामाचे नामस्मरण करायला लागली तेव्हा तिच्या इच्छेनुसार अखेर पूण्य संचय झाल्याने भगवंतांनी तिला दर्शन देऊन सद्गतीला लावले. अशाप्रकारे भगवंताचे भक्त असतात जे सर्व दुर्गुणांवर मा त करून भगवंताने दाखवलेल्या मार्गावर चालतात आणि भगवंताला प्रसन्न करून घेतात.

अशा सर्व भक्तांना भगवंत आपल्याजवळ म्हणजेच वै कुंठात कायमचे बोलावून घेतो. हा वैकुंठ मोठा आकर्षक आणि सर्व सुख सुविधांनी युक्त असा आहे. नद्यांचे प्रवाह, सुंदर सुंदर दर्या, धबधबे, निसर्गरम्य वातावरण, डोंगर, झाडे, वनस्पती, नयनरम्य असे वातावरण अशाप्रकारे निसर्ग शक्तींनी युक्त, समृद्ध असलेले हे वैकुंठ आणि त्यामध्ये भगवंताचा राजमहाल.

या राजमहालाला आतमध्ये जायला सोन्याचे आणि माणिक लावलेले सात दरवाजे आहेत. हा महाल इतका भव्य आणि मजबूत आहे की त्याचे नवलच वाटावे. सात सोन्याचे दरवाजे, नंतर अठरा दरवाजात जे भगवान विष्णूच्या सभागृहाचे मुख्य द्वार आहे तिथे जय आणि विजय नावाचे द्वारपाल द्वाराचे संरक्षण करत उभे असतात.

आपल्या सिंहासनावरती भगवान विष्णू माता लक्ष्मी समवेत विराजमान झालेले असतात. आणि अनेक भक्त या वैकुंठामध्ये निवास करणारे असतात. कपाट-कारस्थान, उजनीचपणा, स्वार्थ-भेद, अनिती, कुविचार, अनै तिकता, अन्याय, ढोंग-सोंग, खोटेपणा, मोह-माया, लोभ, अहंकार, दंभ इत्यादी सर्व दुर्गुणांपासून कोसो लांब असलेले.

हे सर्व निवासी केवळ आणि केवळ प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, ममता, गोडवा, कृतज्ञता असेच सदगुण जाणतात. या सर्वांचे परस्परांवर अनन्यसाधारण असे प्रेम असते. आणि त्यामुळे वै कुंठाचे संपूर्ण वातावरण खूप प्रसन्न, रम्य असते. सगळीच जिवाभावाची माणसे असल्यामुळे वैकुंठामध्ये सुरक्षेचे अभिवचन असते, स्वातंत्र्य असते.

प्रेरणा सतत मिळणारी असते. आणि कोणत्याही प्रकारची चिं ता, भ य या वातावरणात नसते. सर्व शक्तिमान भगवंताचा सहवास या ठिकाणी सतत मिळत असतो. त्यामुळे वैकुंठामध्ये कोणत्याच प्रकारचा चुकीचा तसेच वाईट प्रसंग कधीच कुठेच दिसत नाही. सगळीकडे समाधान, शांतता, सुख भरभरून असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *