वृषभ रास एप्रिल २०२२: या गोष्टी या महिन्यात आपल्या जीवनात घडणारचं…कौटुंबिक, आर्थिक, आ रोग्य, या राशीच्या लोकांना या पैलूंमध्ये दिसतील हे परिणाम

राशी भविष्य

नमस्कार मित्रांनो, एप्रिल महिन्यात सर्वच ग्रह राशी परिवर्तन करत आहेत जी अत्यंत मोठी बाब ठरणार आहे, कदाचित हजारो वर्षानंतर हा योग जुळून आलेला असावा त्यामुळे या काळात युग परिवर्तन होईल असं म्हणलं तरी चालेल. दशम भावात बृहस्पती, मंगळ आणि शुक्राची उपस्थिती राहील सोबतच, नवम भावात शनी ची उपस्थिती राहील या कारणाने, तुम्हाला भाग्याचे पूर्ण सहयोग मिळेल आणि कार्य क्षेत्रात यश मिळेल.

व्यक्तिमत्त्व:- व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामी ची स्थिती लक्षात घेणं महत्वाचं ठरतं या महिन्यात तुमचा शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे आणि मीन राशीत शुक्र उचीचा ठरतो. राशी स्वामी जेव्हा उंच असतो तेव्हा व्यक्तिमत्व समृद्ध होत असते. शिवाय या महिन्यात तुमचा राशी स्वामी उंच शिवाय लाभस्थानात विराजमान असेल त्यामुळे तुम्हाला लाभ देखील प्राप्त होतील. त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या.

कुटूंब – कौटुंबिक दृष्ट्या विचार केला असता या महिन्यात सौख्य व लाभ होतील शिवाय एप्रिल महिन्याचा चौथा आठवडा तुमच्यासाठी महत्वाचा ठरेल. महिन्याच्या उत्तरार्धात दुसऱ्या भावाचा स्वामी बुध, राहू सोबत द्वादश भावात राहील. या कारणाने कुटुंबात वा द-विवा द स्थिती बनू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर मतभद वाढू शकतात. या वेळी तुम्ही आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

पराक्रम व परिश्रम:- पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमचा परिश्रमेश म्हणजे चंद्र ग्रह होय तो दर सव्वा दोन वर्षांनी राशी परिवर्तन करून भ्रमण करत असतो मात्र परिश्रम स्थानावर पडणारी दृष्टी ही तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. हा महिना तुम्हाला प्रचंड परिश्रमाचा राहील. परिश्रमाची दिशा देखील योग्य राहील. अधिक स्मार्ट वर्क कराल आणि त्यातून यश प्राप्त होईल.

वास्तू, वाहन, जमीन, सुख शांती:- या दृष्टीने विचार केला असता चतुर्थ स्थान महत्वाचे ठरते. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या चतुर्थ स्थानावर शुक्र आणि गुरू या दोन नैसर्गिक शुभ ग्रहांची दृष्टी पडेल मात्र महिन्याच्या शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्यापासून मंगळाची दृष्टी देखील राहील जो तुमच्या पत्रिकेला अवकारक आहे. महिन्याच्या सुरुवातीचे दिवस तुमच्यासाठी वास्तू आणि वाहन खरेदी करण्याच्या दृष्टीने लाभदायक राहील, शेवटचा आठवडा देखील लाभदायक राहील, मधील दिवस मात्र थोडे सं घर्षाचे राहतील.

शिक्षण:- शिक्षणाच्या दृष्टीने महिन्याचे सुरुवातीचे दिवस तुमच्यासाठी सं घर्षाचे राहतील. पण अभ्यासात तुम्ही सातत्य ठेऊ शकाल मात्र अपेक्षित यश गाठणं तुमच्यासाठी कठीण राहील. 13 एप्रिल रोजी तुमचे गुरू महाराज लाभ स्थानात प्रवेश करतील तेथून त्यांची दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडेल आणि तेथून शैक्षणिक यशाला सुरुवात होईल.

आ रोग्य:- आ रोग्याच्या दृष्टीने हा महिना आव्हानात्मक असेल. या वेळी बुध आणि राहू द्वादश भावात स्थित होऊन सहाव्या भावाल बघेल. यामुळे आ रोग्याला घेऊन तुमची स मस्या वाढू शकते. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना २०२२ मध्ये त्यांच्या आ रोग्याची काळजी घ्यावी लागेल. चांगल्या दिनचर्येचे पालन केल्याने तुम्हाला जी वनात एक सुखद अनुभव घेता येईल.

नोकरी व व्यवसाय:- नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी महिना अत्यंत उत्तम म्हणता येईल तर व्यावसायिक जातकांसाठी हा महिना भाग्याचा, उन्नतीचा व वृद्धीचा हा काळ असेल. एकंदरीत तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तुमच्या प्रगतीची सुरुवात होणार आहे.

भाग्य:- वृषभ राशीतील जातकांसाठी हा महिना प्रत्येक क्षेत्रात चांगला राहणार आहे. या महिन्यात तुम्हाला जोडीदाराकडून भाग्याची प्राप्ती होईल. या महिन्यात तुमचे भाग्य समृद्ध राहील. भाग्याकडून या महिन्यात पूर्ण सहयोग प्राप्त होईल. त्याचा उपयोग करून घ्या. महिन्याच्या पूर्वार्धात पंचम भावावर सूर्याची पूर्ण दृष्टी राहील. यामुळे तुमचे प्रेम जी वन सामान्य राहील.

ही वेळ आर्थिक दृष्ट्या चांगली राहणार आहे कारण, या काळात बृहस्पती सोबत सूर्याच्या एकादश भावात स्थित होण्याने तुमच्यासाठी परीस्थिती अनुकूल राहील. या काळात धन लाभाचे योग आहेत. तुमच्या कमाई मध्ये सुधार पाहिला जाईल.

कर्म -या महिन्यात कर्मेश कर्म स्थानात येतील त्यामुळे तुमचे कर्म समृद्ध होतील. त्यापासून तुम्हाला भरघोस लाभ प्राप्त होईल. २०२२ मध्ये गुरू तुमच्या अकराव्या भावात प्रवेश करेल, त्यामुळे तुमचे भावंडांसोबतचे संबं धही सुधारतील. या वर्षी शनिदेव तुमच्या नशिबातून तुमच्या कर्माकडे वाटचाल करतील, त्यामुळे करिअरचा आलेख उंचीवर जाईल.

लाभ- या महिन्यात लाभाच्या भरपूर संधी तुम्हाला प्राप्त होतील. विविध मार्गांनी तुम्हाला लाभ प्राप्त होईल त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या. बृहस्पतीच्या एकादश भावात जाण्याने नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या जातकांना खूप फा यदा मिळेल. शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना उत्तम परिणाम घेऊन येत आहे. एप्रिल महिन्यानंतर वै वाहिक जी वनात सुखद अनुभव येऊ शकतात. प्रेमात असलेल्या या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष चांगले राहील. शुभ व ता ण त णावाचे दिवस – वृषभ जातकांसाठी 6, 16 आणि 24 हे दिवस शुभ तर 4, 14 आणि 22 एप्रिल हे दिवस ता ण त णावाचे असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *