वृषभ राशी:- जून 2022…या चार गोष्टी आपल्या आयुष्यात घडणारच..पण या दोन मोठ्या अडचणींना देखील द्यावे लागणार तोंड अन्यथा

राशी भविष्य

वृषभ रास ही अतिशय परिश्रमाची रास म्हणून ओळखली जाते. मोठमोठी स्वप्न पाहणं आणि सहजरीत्या ती पूर्ण करणं हे कौशल्य तुमच्यात असते. म्हणून तुम्ही सदैव मोठी स्वप्न पाहून त्यासाठी प्रयत्न करता. वृषभ राशीचा स्वामी म्हणजे शुक्र प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणे, प्रत्येक कार्य उत्साहाने करणे. हा तुमचा मूळ गुणध र्म…

व्यक्तिमत्व – या महिन्याच्या सुरुवातीला शुक्र व्यय स्थानातून प्रवास करत आहे. राशी स्वामी जेव्हा व्यय स्थानात असतो तेव्हा तो आ त्मविश्वास कमी करतो किंवा खर्च वाढवतो. त्यातही भरीस भर म्हणजे शुक्र सोबत राहू देखील उपस्थित आहे. परिणामी एकीकडे आ त्मविश्वास कमी होणे, इगो वाढणं या परस्पर दोन गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाबतीत घडू शकतात.

तुमच्या राशीत पंचमेश इष्ट देवाचे स्वामी चतुर्थात उपस्थित आहेत. हा एक केंद्र त्रिकोण असलेला खूप मोठा राज योग तुमच्या राशीत निर्माण झालेला आहे. तुम्हाला आ त्मविश्वास देईल. हाती घेतलेल्या कार्यात यश देईल. कारण लक्ष्मीनारायण योग या पत्रिकेत जेव्हा निर्माण होतो तेव्हा फार मोठे यश प्राप्त होत असतं. हा योग तुमच्या राशीत निर्माण झालेला आहे. ग्रहांचा राजा रवी आणि पंचमेश ग्रहद्वारे हा योग निर्माण झालेला आहे. 15 जून पर्यंत हा योग आहे. त्यामुळे रवी राशी परिवर्तन करीत असल्यामुळे बदल घडून येईल.

कौटुंबिक- कुटुंब धनेश म्हणजे बुध ग्रह होय. ते तुमच्या राशीत विराजमान आहेत. धनप्राप्ती होऊन कुटुंबासाठी कार्य करणे. बोलण्यात ज्ञान दिसून येणार. या सर्व गोष्टी या महिन्यात तुमच्या सोबत होणार आहेत. कारण तुमचा कुटुंबेश धनेश बुध ग्रह तुमच्या राशीत आलेला आहे. विविध मार्गांनी धनप्राप्तीचे योग निर्माण होतील. त्याचा पुरेपूर लाभ घ्या.

पराक्रम, परिश्रम- ऋषभ जातक हे मुळता परिश्रमी म्हणून ओळखले जातात. राशीचं बोधचिन्ह बैल आहे. बैल हा कष्टकरी प्राणी म्हणून ओळखला जातो. जेवढे तुमचे कर्म, परिश्रम समृद्ध असतात. त्यामुळे तुमची रास श्रमाला महत्त्व देत असते. तुमचा राशिस्वामी सध्या व्ययस्थानात असल्यामुळे थोडं परिश्रम टाळण्याची वृत्ती तुमच्यात निर्माण होऊ शकते. परिश्रम करण्यापेक्षा तो टाळण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. जे तुमच्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध असेल.

वास्तू, वाहन, जमीन व सुख शांती- चतुर्थी स्थिती खूप महत्त्वाची आहे. ते म्हणजे रवी महाराज होय. तो महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीत विराजमान आहे. त्यामुळे वास्तु, वाहनाच सुख निश्चितपणे प्राप्त होईल. घरात सुख, शांतीचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक ऐक्य दिसून येते. तुमच्या कुटुंबात एखादा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाचा आनंद घ्या.

शिक्षण व इष्ट देवाचं सहकार्य- पंचमेश राशीत असणे ही अत्यंत महत्त्वाची बाब म्हणता येईल. अकाऊंट, मॅनेजमेंट, सीए क्षेत्रातील विद्यार्थ्यांची जर परीक्षा असेल तर हा काळ त्यांच्यासाठी लाभदायक आहे. त्यांना या काळात यश प्राप्त होणार आहे. इतर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ शुभ आहे. नशिबाच्या पाठिंब्यामुळे जून महिना करिअरच्या दृष्टीने चांगला राहील.

आ रोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू – तुमचे षष्ठेश षष्ठ स्थानावर दृष्टी ठेवून आहेत. राशी स्वामी शुक्र हे तुमचे षष्ठेश असून ते राशीच्या व्ययस्थानातून विराजमान आहेत. त्यामुळे या काळात आ रोग्य या सारख्या स मस्यांचा सा मना करावा लागेल. श त्रु त्रा स देण्याचा प्रयत्न करतील. त्याकडे दुर्लक्ष करून पुढे वाटचाल करत. आ रोग्याची काळजी घ्यावी लागेल. आईच्या प्रकृतीत सुधारणा असताना सासरच्या मंडळींकडून आर्थिक मदत मिळू शकते.

नोकरी, व्यवसाय – व्यवसाय करत आहेत त्यांना या काळात धनलाभची संधी प्राप्त होईल. अर्थात त्यासोबत व्यवसायवृद्धी घडून येईल. नोकरी करत आहेत त्यांना या काळात अतिरिक्त परिश्रम करावे लागतील. तसेच नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ काही खास घेऊन येऊ शकतो.येणाऱ्या काळात या काळात करिअरमध्ये प्रगतीच्या योगासह पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.

भाग्य – भाग्यस्थान हे पत्रिकेतील हे त्रिकोणाचे स्थान म्हणून ओळखले जाते. या स्थानाचा स्वामी केंद्र स्थानात स्वराशीचा मूळचा त्रिकूट राशीचा आहे. धनाच्या आगमनाचे नवीन मार्ग उघडल्यामुळे आर्थिक बाबतीत हा काळ चांगला आहे. भौतिक सुख-सुविधांसह व्यवसाय वाढेल. नोकरीत अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. स माजात मा न-सन्मान वाढत असताना क्षेत्रातील तुमच्या प्रयत्नांसाठी तुमचा सन्मान होऊ शकतो.

कर्म- तुमचे भाग्य शनिमहाराज 12 जुलै पर्यंत तुमच्या कर्म स्थानात विराजमान असतील. या काळात कर्म कराल. त्यातून भाग्य वृद्धि निर्माण होतील. त्यामुळे हा महिना तुम्हाला महत्त्वाचा आहे. तुमचे लाभेश गुरु गुरु महाराज लाभस्थानात विराजमान आहेत. नवम दशम आणि एकादस भौतिक आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाचे महत्त्वाचे असतात.

व्यव, परदेशगमन- या दृष्टीने विचार केला असता यांच्या मनात काहीतरी खरेदी करण्याचा विचार होऊ शकतो आणि विना गरजेचा वस्तू देखील खरेदी करू शकतात. मात्र नंतर तुम्हाला जाणवेल की या वस्तूंची खरं तर आपल्याला काही गरज नाही. त्यामुळे विनाकारण खरेदी शक्यतो टाळावे. याचबरोबर काही अनपेक्षित खर्च देखील तुम्हाला करावा लागेल. प्रवास करण्याचे भरपूर योग असल्यामुळे प्रवासावर तुमचा खर्च होऊ शकतो.

शिक्षणावर तुमचा खर्च होईल. दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते वृषभ राशीसाठी जून महिन्यातील 10, 18 आणि 27 जून हे दिवस शुभ आहेत. 8, 17 आणि 26 जून हे दिवस ता णत णावाचे व सं घर्षाचे जातील. उपाय – तुमच्या सुख स्थानात सूर्य देवाची रास येते. शांत झोप येण्यासाठी तुम्ही दर रविवारी आदित्य हृदय स्तोत्र पठण करा….

Leave a Reply

Your email address will not be published.