वृषभ राशि भविष्य (२०२२ फेब्रुवारी); व्यवसाय, नोकरी, धन, स्वास्थ्य, शिक्षण आणि कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने तुमच्यासाठी का महिना कसा राहील ?

राशी भविष्य

नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, तर आज आपण फेब्रुवारी २०२२ हा महिना आपल्यासाठी कसा असणार आहे हे पहाणार आहोत, ग्रहदशा, नोकरी, भविष्य, आ रोग्य, सं तती याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. व्यक्तीमत्व:- व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामींची स्थिती महत्वाची ठरते. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून तुमचा राशी स्वामी मंगळ ग्रह हा तुमच्या राशीत विराजमान आहे, राशी स्वामी राशीत असणं ही शुभदायक गोष्ट असते.

व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने, कर्तृत्वाच्या दृष्टीने हा अत्यंत शुभ काळ असतो. मात्र याच काळात केतू ग्रह हा देखील तुमच्या राशीत आहे यामुळे मंगळाच्या शुभ गोष्टींमध्ये मोठी उणीव निर्माण झाली आहे. अर्थात कळत नकळत संताप होणं, एखाद्या शत्रूकडून नकळतपणे दगा दिला जाणे, ज्याच्यावर तुम्ही प्रचंड विश्वास ठेवता त्याच्याकडून फसवणूक होणं हा प्रकार या काळात घडू शकतो म्हणून वृषभ राशीच्या लोकांनी सावधगिरीने आपली पावले उचलायला हवी.

कुटुंब:- कौटुंबिक दृष्ट्या विचार केला असता तुमचा कुटुंबेश आणि कुटुंब स्थानातील ग्रह यांची स्थिती महत्वाची ठरते. तुमचे कुटुंबेश म्हणजे तुमचे गुरू महाराज होय ते शनी महाराजांच्या कुंभ राशीत म्हणजे चतुर्थ स्थानात विराजमान आहेत तसेच 16 फेब्रुवारी ला तुमचा राशी स्वामी कुटुंब स्थानात जाणार आहे.

एकंदरीत ही स्थिती कौटुंबिक शिस्तीच, कडक वातावरण दर्शवत आहे त्यामुळे कुटुंबात शांतीचे वातावरण राहील. मात्र या काळात तुम्हाला तुमच्या आईच्या आ रोग्यविषयी जास्त काळजी घ्यावी लागेल. वडिलांकडून तुम्हाला विशेष सहयोग प्राप्त होणार आहे. एकंदरीत कौटुंबिक पातळीवर तुम्हाला संमिश्र फळं मिळणार आहेत.

परिश्रम:- परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या परिश्रमाचा कारक ग्रह म्हणजे शनी महाराज होय ते परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशी स्वामी सोबत लाभ योग करत असल्यामुळे तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य राहील किंबहुना योग्य प्रमाणात केलेले व योग्य तो लाभ मिळवुन देणारे परिश्रम तुम्ही या काळात करणार आहात. त्याची शुभ फळं शिक्षणात, करियर मध्ये, आर्थिक लाभामध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहेत.

वास्तू, वाहन, जमीन खरेदीविक्री:- वास्तू, वाहन, जमीन, सुख-शांती या दृष्टीने विचार केला असता हा काळ वृषभ जातकांसाठी अजिबात योग्य नाही. त्यामुळे जे जातक नवीन वास्तू किंवा वाहन खरेदी करणार असतील त्यांनी थोडी प्रतिक्षा करावी. पण ज्यांना जमीन म्हणजे एखादा प्लॉट किंवा शेतजमिन घ्यायची असेल त्यांच्यासाठी हा काळ उत्तम ठरणार आहे. तसेच शुभ योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. काही लोकांना घराचे नूतनीकरण करायचे असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ योग्य आहे.

शिक्षण:- शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकाना या काळात अधिक परिश्रम घ्यावे लागतील, मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेत असला तरी नेहमी पेक्षा तुम्हाला जास्त वेळ अभ्यास करावा लागणार आहे तरच अपेक्षित यश तुम्हाला मिळेल कारण या महिन्यात ग्रहांचे सहकार्य त्या तुलनेत कमी आहे. फेब्रुवारी मध्ये तुम्ही थोडं जास्त अभ्यास करा त्यानंतर शिक्षणासाठी उत्तम कालावधी येणार आहे.

आ रोग्य:- या काळात एक उत्तम आरोग्य वृषभ राशीच्या लोकांना प्राप्त होऊ शकतं. आ रोग्य उत्तम असेल तर माणूस कर्तृत्व चांगल्या प्रकारे करू शकतो त्यामुळे या काळाचा सदुपयोग करा. स्पर्धक सहसा तुमच्या वाट्याला जात नाहीत पण या महिन्यात तर ते अजिबात जाणार नाहीत. शनिदेव नवम भावात स्थित असण्याने वृषभ राशीतील लोकांना फा यदा मिळेल. काही मोठी आ रोग्य स मस्या होणार नाही.

नोकरी व व्यवसाय:- नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना सामान्य म्हणता येईल. रोज छोटे मोठे प्रश्न उभे राहतील त्यांच्यावर समाधान शोधत तुम्ही मार्ग काढत रहाल व शेवटी यश मिळेल. पण नवम भावात सूर्य, बुध आणि शनिदेवाची उपस्थितीने कर्मच्या अनुरूप भाग्याची पूर्ण साथ मिळेल. नोकरीपेशा लोकांसाठी यशाचे संकेत आहेत. व्यापार करणाऱ्या लोकांसाठी ही वेळ उत्तम असेल तथापि, नवीन व्यापार सुरु करण्यात स मस्या येऊ शकतात.

भाग्य:- भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता, फेब्रुवारी महिन्यात वृषभ जातकाना संमिश्र फळ प्राप्त होऊ शकतात कारण महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात तुम्हाला भाग्यच पूर्ण सहकार्य प्राप्त होईल तर दुसऱ्या पंधरवाड्यात सहकार्य कमी झालेलं असेल तरी देखील तुम्ही कर्माने यश खेचून आणणार आहात.

कर्म : कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्मेश कुटूंब स्थानात आहेत. त्यामुळे कुटुंबाच्या मदतीने तुमचे एखादे कठीण काम पूर्ण होऊ शकते. सा माजिक माध्यमातून उत्कर्ष साधाल. जुन्या मैत्रीची भेट होईल. वै वाहिक सौख्य लाभेल. मा नसिक समाधान वाटेल. उपासना फलद्रूप होतील.

शुभ दिवस:- वृषभ राशीच्या लोकांसाठी 1, 9 आणि 20 फेब्रुवारी दिवस शुभ तर 7, 17 हे दिवस त णावाचे व सं घर्षाचे असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *