वृश्चिक रास: मासिक राशिभविष्य…येत्या महिन्यात या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणारचं…शिवाय या संकटाना द्यावे लागू शकते तोंड..एकंदरीत

राशी भविष्य

नमस्कार मित्रांनो, प्रत्येक संधीच सोनं करणं हे वृश्चिक जातकाचा स्वभाव असतो. प्रत्येक क्षणाला कार्यरत राहणं आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं आणि यश हे तुमचं कर्तव्य आहे. विशेष म्हणजे मागील महिन्यापासून तुमचा राशी स्वामी मंगळ ग्रह उंचीचा आहे त्यामुळे तुमच्या प्रगतीच्या दिशा उत्तम रित्या सुरू आहेत.

व्यक्तिमत्व- तुमचा राशी स्वामी मंगळ ग्रह संपूर्ण मार्च महिना उचीचा होता इतकंच नाही तर तो एप्रिलचा पहिला आठवडा उचीचा राहील. त्याचा शुभ परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होत राहील. परिश्रमी असलेली तुमची रास धडाडीने कार्य करत राहील. मार्च महिन्यात घेतलेल्या मेहनतीचे उत्तम आणि गोड फळ तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्यात निश्चित प्राप्त होईल.

कुटूंब:- कौटुंबिक दृष्ट्या विचार केला असता वृश्चिक राशीचे कुटुंबेश हे गुरू महाराज होय आणि ते तुमच्या सुख स्थानातून प्रवास करत आहेत. त्यांनी तुमच्यासाठी वास्तू योग निर्माण केले आहेत, सौख्य निर्माण केले आहेत. एकंदरीत कुटुंबेशाची स्थिती पाहता हा महिना तुम्हाला कौटुंबिक सौख्याचा राहील. या महिन्यात तुम्हाला आई वडिलांचे भरघोस प्रेम मिळेल. जोडीदार सहकार्य करेल. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून तुम्हाला संतती सुख प्राप्त होईल. कौटुंबिक दृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील. त्याचा पुरेपूर उपयोग करा.

पराक्रम, परिश्रम:- पराक्रम, परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमची रास मुळातच परिश्रमी रास म्हणून ओळखली जाते. मागील महिन्यापासून तुम्ही योजना पूर्वक काम करत आहात आणि त्यात तुम्ही यश देखील प्राप्त करत आहात. तसेच भविष्यातही तुम्हाला यश प्राप्त होईल, कारण जेव्हा जेव्हा भाग्याची साथ कमी असते तेव्हा तुम्ही ते परिश्रमाने भरून काढता आणि भाग्याची साथ असताना ती परिश्रमाने भरून काढता. हीच स्थिती या महिन्यात देखील असेल.

वास्तु, वाहन, जमीन:- या दृष्टीने फक्त एप्रिल महिना तुम्ही जाऊ द्यावा कारण मे महिन्यापासून तुम्हाला वास्तू व वाहनाचे शुभ योग निर्माण होणार आहेत, त्या काळात तुम्हाला वास्तू पासून सुख प्राप्त होईल. एकंदरीत वास्तू, वाहन, जमीन सु खशांती यासाठी लाभदायक काळ तुमच्यासाठी निर्माण होणार आहे.

इष्टदेव – या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून इष्ट देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद देणार आहेत. तुमच्या हातून धा र्मिक कार्य घडतील. व्यक्तिमत्वात सकारात्मकता येईल. जबाबदाऱ्या घेण्याची वृत्ती वाढेल. मनाचा शांत पणा वाढेल, संवेदनशीलता वाढेल.

शिक्षण- अतिशय अनुकूल ग्रहमान आहे. आपण हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. शैक्षणिक दृष्ट्या विचार केला असता जे जातक मेकॅनिकल, टेक्निकल, कला अशा कोणत्याही शाखेत असला तर हा महिना तुमचाच आहे. या काळात जर तुमची स्पर्धा परीक्षा असेल तर त्यात तुम्हाला यश मिळेल. शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना अत्यंत लाभदायक आहे. तुमच्या कर्तृत्वाला वाव मिळेल.

नोकरी व व्यवसाय:- नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता, जे जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना अत्यंत लाभदायक राहील. जे जातक गेल्या काही महिन्यांपासून पदोन्नतीची वाट बघत असतील त्यांना ती अनपेक्षित पणे प्राप्त होईल. सोबत काम करणाऱ्या सहकार्याकडून सहकार्य प्राप्त होईल. कार्यस्थळी कर्तृत्व गाजवण्याची संधी तुम्हाला प्राप्त होईल. कामातून समाधानाची प्राप्ती होईल.

जे जातक व्यवसाय करतात त्यांच्यासाठी देखील हा महिना प्रचंड लाभदायक ठरेल. व्यवसाय वृद्धीच्या संधी प्राप्त होतील. किंबहुना आपल्या व्यवसायात नावीन्य निर्माण करणं हे तुमच्यासाठी या महिन्यात महत्वाचे असेल आणि त्यात तुम्ही यशस्वी देखील व्हाल. थोडक्यात नोकरी व व्यवसायासाठी हा महिना लाभदायक ठरेल.

भाग्य:- भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना भाग्यवर्धक असेल मात्र या महिन्यात सर्व ग्रह राशी परिवर्तन करतील त्यानंतर मे महिन्यानंतर तुमचे भाग्य समृद्ध व सक्रिय होईल. तुमची आर्थिक उन्नती सुधारेल. तुमच्या वैयक्तिक जी वनातही प्रगती दिसून येईल आणि तुमच्या वै वाहिक जी वनातील पूर्वीच्या स मस्यांचे निराकरण होऊ शकते. तुम्ही अधिक आ त्म विश्वासी, धैर्यवान आणि महत्त्वाकांक्षी असाल आणि तुमचे अपेक्षित परिणाम साध्य कराल. आ रोग्य – आ रोग्याच्या दृष्टीने हा महिना लाभदायक असेल, तुमचे आ रोग्य सदृढ राहील.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *