नमस्कार मित्रांनो, पूजा आपल्या ओल्या केसांवरून हात फिरवत स्वतःलाच आरशात पाहू लागली. तिला तिचेच प्रतिबिंब पाहताना हसू येत होत. आजकाल ती खूप आनंदी, खुश राहत होती. स्वतःला आरशात पाहून खुदकन ला जायची. एखाद प्रेमगीत ऐकून शहारून जायची. बाहेर पडलेल्या गुलाबी थंडीमध्ये ‘त्याच्या‘ आठवणीत हरवून जात असायची. वाहणाऱ्या वाऱ्यासोबत वाहायची आणि आपल्या एकटेपणाला त्याच्या आठवणीत त्याच्या सोबतच्या क्षणात गुंफत राहायची.
तिच्या वाढदिवसाला रात्री बारा वाजता त्याचा पहिला फोन आला होता,”हॅप्पी बर्थडे टू यु“ खुपच सुंदर गाण म्हणून विश केल त्याने ती खुप खुश झाली, खूप वेळ त्यांच्या गप्पा चालू राहिल्या आणि अचानक शेवटी तो तिला म्हणाला, पुढचे काही दिवस आपल बोलणं होऊ शकणार नाही, मी जिथे जाणार आहे तिथे नेटवर्क नसेल आणि मला वेळही मिळणार नाही. सो प्लीज चि डू नको जानू स्वतःची काळजी घे.
वर्षभरापूर्वीच त्याचं लग्न झाल. देशसेवेत असल्याने त्याला जास्त सुट्टी मिळत नसे. महिन्याभराच्या सुट्टीमध्ये दोघांनी खूप आनंदाचे क्षण एकमेकांसोबत घालवले. त्यानंतर तो गेला ते थेट सहा महिन्यांनी आला. तेव्हा देखील बऱ्याच आठवणी तिच्यासाठी ठेऊन गेला. पण निव्वळ आठवणींच्या वर आयुष्य थोडीच जगता येत, ऐन तारुण्यात असलेली ती केवळ महिन्याभराच्या सोबतीने समाधानी थोडीच होऊ शकणार होती.
एवढ्या मोठ्या घरात एकटीनेच राहाण तिच्या जी वावर येत असे. म्हणून आता ती नोकरी करू लागली. पण तिथे सुद्धा फारस मन रमत नव्हतं. त्याच्या आठवणीने जी व कासावीस व्हायचा. मग वैतागून ती सोशल मि डिया सर्फ करू लागली. आणि एक दिवस अचानक त्याची तिला रिक्वेस्ट आली.
हाय हेल्लो पासून सुरु झालेल्या गप्पा चांगल्या ओळखीमध्ये रुपांतरीत होऊ लागल्या. मेसेज वरून बोलता बोलता फोन नंबर एक्चेंज झाले. मग गप्पांना अधिकच उधाण आले. सकाळ संध्याकाळ, दिवसरात्र केवळ त्याच्याशीच बोलण, दोघ एकमेकांत एवढे गुंग झाले कि आपला नवरा देशसेवेसाठी सीमेवर ल ढत आहे, याच देखील तिला भान राहील नाही.
नेमक काय बरोबर आणि काय चूक हे तिला काही समजत नव्हतं. पण जे होत होतं ते तिला आवडत होतं. ती त्याच्या आठवणीत जास्त गुंतून जाऊ लागली होती. त्याच्या सोबत न बोलता राहणं आता तिला अवघड वाटत होतं. त्याच सतत फोन करण, आपली काळजी घेण, आपल्याला हव नको ते विचारण सगळ तिला आवडत होत. हेच सगळ तिला तिच्या नवऱ्याकडून अपेक्षित होत.
पण त्याच्या नोकरीमुळे ते शक्य होत नव्हत. सुरवातीला तिने सगळ समजून घेतलं होत. पण मनाप्रमाणेच श रीराच्या ही काही अपेक्षा असतातच ना. श रीर किती दिवस गप्प राहणार? ती मनाने जशी त्याच्यात गुंतत होती तशी तिची घालमेल अधिक होत होती. तिच्या श रीराने देखील आता साद घालायला सुरवात केली आणि एक दिवस त्याच्याकडूनच मागणी आली.
अपेक्षेप्रमाणे त्याने तिच्याकडे श रीर सु खाची मागणी केली. काय करू तिला काही समजेना. श रीर होय म्हणत होत, पण मनाच काय? मन स्वतःच्या नवऱ्याशी प्रतारणा करायला तयार होत नव्हत. खूप धी राने एक दिवस त्याला होय म्हणाली. शरी राची अपेक्षा म नाला मान्य करावी लागली. दोघांच्या भेटीचा दिवस ठरला, तिच्याच घरी भेटायचं अस ठरलं. आज ती खूप खुष होती. आपल्या श रीराची भूक आज कितीतरी दिवसांनी भागणार होती.
तिने त्याच्यासाठी जय्यत तयारी करून ठेवली. स्वतःला तयार करत असतानाच अचानक दारावरची बेल वाजली. तोच आला असणार या कल्पनेनेच तिच्या अंगावर शहारे आले. ती धावतच दरवाज्याकडे गेली तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने दरवाजा उघडत असतानाच फोन उचलला समोरून आवाज आला,”जय हिंद ! तुमचे पती श त्रूशी ल ढत असताना वीरम रण पावले….
पुढचे काही शब्द फक्त समोरून बोलले गेले. त्यांना तिच्या कानाची वाट सापडली नाही. ती या बातमीने को सळून गेली. एवढे दिवस आपण आपल्या पतीची एकदाही आठवण काढली नाही. याच तिला खूप दुःख झाल. त्याच्या मागे आपण हे काय करत राहिलो याच तिला खूप वा ईट वाटत राहील. ती आता स्वतःचाच तिरस्कार करू लागली… तिला काही सुचत नव्हतं, दारात बेल वाजत होती आणि डोक्यात मोठयाने घ णाचे घा व पडल्यासारखं वाटत होतं.
डोकं सुन्न झाल होत, काय होतंय समजत नव्हतं, फक्त तिला एकच विचार येत होता की आपण चुकलो, आपण पाप केलं, आपलं लग्न झालं असून सुद्धा आपण पर पुरुषाचा विचार केला. डोळ्यातून पाणी वाहत होत, हातात कांदा का पतानाचा चा कु होता, तिने सपकन तो चा कु स्वतःच्या पोटात खुपसून घेतला. खाली को सळली.. दाराची बेल ही वाजन बंद झालं. सगळं कसं शांत झाल होत. फरशीवर र क्त पसरलं होत आणि डोळ्यात अश्रू होते, ……!
टीव्ही वर तेच गाणं सुरू होतं मलमली ता रुण्य माझे तू पहाटे पांघरावे…..! आता यातलं काय योग्य काय अयोग्य तुम्ही ठरवा देशाच्या रक्षणासाठी आपली पत्नी सोडून सिमेवर ल ढणारा आणि प्रा ण गमवणारा तिचा पती योग्य..? का पतीपासून दूर राहून एकटे पणाची ल ढाई स्वतःशीच ल ढणारी, स्वतःच्या भवनांना वाट करून देण्यासाठी दुसऱ्या पुरुषाशी तिचं मैत्री करणं योग्य…?