विराट कोहलीनं खरेदी केल्या जगातील सर्वात महागड्या दहा वस्तू…एकेकाची किंमत वाचूनच आपली वाचा बंद होईल

लाईफ स्टाईल

“विराट कोहली” हे नाव आत्ताच्या काळातील सगळ्यात गाजलेलं नाव आहे असं म्हंटल तर काही चुकीचं ठरणार नाही. कारण विराट कोहली याला भारतातच नाही तर अनेक देशात प्रसिद्धी मिळालेली आहे. तसेच त्याचे फॅन फॉलोअर्स कितीतरी दशलक्ष आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या विराट कोहली हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे.

आणि ही एक गोष्टच अशी आहे ज्यासाठी आपले भाग्य हे स्वतः शिव शंकरानी लिहलेले असायला पाहिजे, होय असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. तसेच आपल्याला माहित असेल कि गेल्या १२ वर्षांपासून विराट क्रिकेट संघात आहे आणि मागील ४ वर्षांपासून तो भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार पद सांभाळत आहे.

तसेच विराट कोहली हा एकदम आक्रमक व अ ग्रेसि व्ह क्रिकेटर आहे आणि क्रिकेट जगतात त्याने स्वतःची एक वेगळीच ओळख करून ठेवली आहे. अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर करून ठेवले आहेत. तो इतका आक्रमक आहे कि त्याने सर्वात लवकर म्हणजे कमी डाव खेळून १०,००० रन्स पूर्ण केल्या आहेत. असे अनेक विक्रम त्याने केले आहेत व अजून हि होत आहेत.

त्यामुळेच त्याची तुलना क्रिकेट चा देव मा नल्या जाणाऱ्या “सचिन तेंडुलकर” यांच्याशी केली जाते. विराट कोहलीचे तीन वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री “अनुष्का शर्मा” हिच्याशी ल ग्न झाले. आणि मागच्या वर्षी लॉक डाउन मध्ये त्याला ‘कन्यारत्न’ देखील झाले आहे आणि अर्थात त्या भाग्यलक्ष्मीचे नाव म्हणजे विरूष्का..! विराट जसा क्रिकेट मध्ये अ ग्रेसि व्ह आहे, तसाच तो रियल लाईफ मध्येसुद्धा अ ग्रेसि व्ह आहे.

विराट स्वतःच्या फिटनेस बद्दल खूप महत्वकांक्षी आहे. तो त्याच्या फिटनेस ची खूपच जास्तच काळजी करतो. तो त्याचे जी वन एकदम स्टायलिश जगतो. विराट कोहलीचा इनकम हा २०० कोटीच्या घरात आहे व तो जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू पैकी एक आहे. आता इतके पैसे कमावणाऱ्या विराटचे शौक हि तसेच आहेत. चलातर मग जाणून घेऊ त्याने खरेदी केलेल्या १० महागड्या वस्तू….

आपणास सांगू इच्छितो कि विराटच्या हातात आपण जे घड्याळ पाहतो ते ROLEX DAYTONA या सुप्रसिद्ध कंपनीचे आहे. आणि त्याची किंमत जवळजवळ ८७ लाख रुपय इतकी आहे. तसेच विराट कोहलीच्या स्वतःच्या अश्या अनेक गाड्या आहेत. परंतु त्याच्या गाड्यांच्या मध्ये ऑडी या कंपनीची ऑडी RS५ coupe या मॉडेलच्या गाडीचा समावेश आहे.

आणि त्या गाडीची किंमत ३.५ कोटी रुपये इतकी आहे. आणि विशेष म्हणजे या गाडीचे लॉंचिंग विराटच्या हातूनच २०१८ या साली झाले होते. तसेच २०१८ या वर्षी विराटने SUV या कंपनीची Range Rover Land Rover Vogue ही गाडी २.१ कोटी रुपयांना खरेदी केलेली आहे. विराट कोहली हा गाड्यांचा भलताच शौकीन आहे. त्याच्याकडे खूप गाड्या आहेत. त्यात सेडान Bentley Flying Spur ही ३.९८ कोटी रुपयांची गाडी आहे.

तसेच २०१९ या वर्षी विराटने Bentley Continental GT ही गाडी खरेदी केली, ती विराटकडे असणाऱ्या सर्व गाड्यानच्या मध्ये सर्वात महाग म्हणजेच ४.६५ कोटी रुपयांची आहे. अशा अनेक गाड्या आहेत ज्याची नावे घ्यायला दिवस जाईल. तसेच सध्या विराट अनुष्का सोबत राहत असलेला प्लॅट मुंबईतील वरळी येथे १९७३ टॉवर मध्ये ३५ व्या मजल्यावर आहे. त्याची किंमत ३४ कोटी रुपय इतकी आहे.

तसेच गुरुग्राम या विराट कोहलीच्या होमटाऊन मध्ये त्याचा ३८० कोटी इतक्या मोठ्या किमतीचा बंगला आहे. तसेच विराटकडे मुंबईत अनेक प्लॅट आहेत ज्याची किंमत जवळपास ३०० कोटीच्या घरात असेल. तसेच FC Goa या इंडियन सुपर लीगमधील क्लबचा विराट मालक आहे, त्याची किंमत सुमारे ३३ कोटी इतकी आहे.

तसेच विराटने बाहेरच्या देशात देखील अनेक कोटीची गुंतवणूक केली आहे, तसेच तो वीसहुन अधिक मोठं मोठ्या कंपन्यांचा मालक आहे, शिवाय त्याची अनेक हॉटेल सुद्धा आहेत, हे सोडून त्याचे अनेक व्यवसाय आहेत ज्याबद्दल बोलायचे म्हटले तर आपल्याला वेळ सुद्धा मिळणार नाही.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *