विठ्ठलाच्या चरणांवर खड्डा कोणी केला…जाणून घ्या कशामुळे विठ्ठलाच्या चरणांवर पडले आहेत हे दोन खड्डे…जाणून घ्या काय घडलं होत त्याकाळी कि

लाईफ स्टाईल

पंढरीची वारी ही वारकऱ्यांसाठी, भाविकांसाठी एक पर्वणी असते. त्यांचा वारी कडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. वारी हा एक प्रकारचा उत्साह पसरतो. ही परमा त्म्याची सेवा वाटते. महाराष्ट्रातील अनेक घराणी आहेत जे परंपरेने वारकरी आहेत. पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थव्रत वारी हाच त्यांचा कुळाचार आणि वारी हा त्यांचा कु ळध र्म, असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.

हे वारकरी सामूहिक रीतीने उपासना करणारे लोक आहेत. दिंडी आणि फडातचा वर्षभराचा कार्यक्रम ठरलेला असतो. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारी. वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय हा मुख्य धा र्मिक प्रवाह आहे. त्याचा महाराष्ट्रातील लोकांवर खूप प्र भाव पडलेला आहे.

“मराठी वर्षातील आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते.” आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी सुरू असल्याचे मानले जाते.

“संतकृपा झाली इमारत फळा आली । ज्ञानदेवे रचिला पाया । उभारीले देवालया ।। नामा तयाचा हा किं कर । तेणे केला हा विस्तार । जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ।। तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।” असा महिमा गायला जातो. आषाढी एकादशी म्हटले की, प्रथम डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी.

वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीलाही अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे ते ज एकवटलेले असते, अशी मान्यता आहे. पंढरपूरच्या वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी थोडीच आहे. वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. को रो ना वि षाणू सं स र्गामुळे यंदा पायी वारी रद्द करण्यात आली. मात्र, परंपरा सुरू राहावी, यासाठी प्रातिनिधिक वारी साजरी केली जाणार आहे. ठरलेल्या तिथींना आळंदी, देहूहून संतांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवले.

जसे एक तरी ओवी अनुभवावी, असे म्हटले जाते. तसे, एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, असे आग्रहाने सांगितले जाते. सुमारे ८०० वर्षांपासून वारीची परंपरा अविरतपणे सुरू आहे, अशी मान्यता आहे. पंढरीच्या वारीची परंपरा वर्षानुवर्षे अखंडपणे चालत आली आहे. वारी सुरु होण्यामागे इतिहास आहे. पंढरपूर क्षेत्राबद्दल, विठूमाऊलींबद्दल इतिहास आहे. तसा श्री विठ्ठलाचया अंगावर असणारी काही चिन्हे व त्यांचाही इतिहास आहे.

विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहून म नाला आनंद मिळतो. आत्म्याला शांती मिळते. विठ्ठलाच्या मूर्तीकडे बारकाईने पाहिल्यास आपल्याला त्याच्या अंगावर काही चिन्हे दिसून येतात. जसं की विठ्ठलाच्या कपाळावर लावत असलेल्या तिलक हा उलटा असतो. म्हणजे पानाच्या आकाराचा असतो. त्याचबरोबर विठ्ठलाच्या पायाच्या बोटांवर ही दोन ख ड्डे आहेत. ते कशाचे आहेत आणि कसे पडले यामागे इतिहास आहे.

यामागची कथा, याचे रहस्य काय आहे, हे आपण जाणून घेऊ. भगवंताचे चरणावर दोन बोटे रूतलेली आहेत. ती कशाची आहे त्याबद्दल खूप मतांतरे आहेत. पण आपण विशेष माहिती आणि त्यामागची कथा पाहू. तर मु क्तीकेशी नावाची एक दासी, सुंदर अशी स्त्री होती. तिला तिच्या सौंदर्याचा खुप गर्व होता. ती पंढरपूर क्षेत्राजवळ आसपास राहायची.

आणि त्यावेळी वारीला खूप संख्येने लोक यायचे, विठ्ठलाचे गुणगान करत, नामस्मरण करत दिंडीतून चालायची आणि हे सर्व मुक्तकेशी पाहत असायची. तिला वाटलं की हे सगळं काय आहे, हा घोळका कुठे चालला आहे, एवढे कुणाचे गुणगान करत आनंदात, आतुरतेने हे लोक कुठे चाललेत. तिने एका वारकऱ्याला प्रश्न विचारला की तुम्ही एवढे लोक आनंदात रममा न होऊन कुठे चाललाय ? तेव्हा वारकऱ्यांने तिला उत्तर दिलं, आम्ही आमच्या पंढरीच्या राजाकडे त्याला भेटायला चाललोय.

तिने पुन्हा प्रश्न केला, कोण आहे हा राजा ? कसा दिसतो ? वारकऱ्यांने विठ्ठलाचे खूप सुंदर वर्णन केले. विठ्ठलाचे वर्णन करताना वारकरी म्हणाला, आमचा राजा गोकुळात असताना खूप लोणी खायचा, त्याला लोणी खूप आवतं त्यामुळे तो खूप नरम आहे. त्याचे ते जस्वी रूप पाहून कोणीही त्याच्यावर भाळेल असा रूपवान, सुंदर आमचा राजा आहे.

हे वर्णन ऐकून तिला इच्छा झाली की या राजालाला भेटावं, कोण आहे हा पाहावं. कारण तिला तिच्या सुंदरतेचा ग र्व होता. म्हणून हा राजा कोण आहे, त्याच्या सौंदर्याचे वर्णन एवढं करत आहेत हे पहावे. म्हणून ती वारकऱ्यांसोबत निघाली. तिच्या मनात भाव चांगला होता. तीही त्यांच्यासोबत नामस्मरण करत राहीली, त्यामुळे तिची शुद्धता झाली आणि पंढरीला आल्यानंतर तिला भगवंतांना भेटायची संधी मिळाली.

व्हा संधी मिळाली तेव्हा तिने पाहिले, तर एक पाषाणाची मू र्ती दिसते. यात काय विशेष ? आणि ही लोण्यासारखी न रम कशी असणार आहे, असे म्हणून परीक्षा घेण्यासाठी आपली दोन बोटे तिने चरणावर लावली आणि काय आश्चर्य ती बोटे रुतली गेली, नंतर ती बोटे निघाली. त्यावेळी तिला कळालं आणि ती  रडू लागली. भगवंतांचे म हात्म्य तिला कळालं. त्यानंतर ती विठ्ठलाच्या भक्तीत लीन झाली.

विठ्ठलाचे चरणांवरचा तो ख ड्डा म्हणजे मुक्तीकेशीची बोटे आहेत. विठ्ठलाच्या चरणांवर ख ड्डा पडण्यामागे ही अख्यायिका सांगितली जाते. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *