नमस्कार मित्रांनो, “तुझा बाप उरात ज खमा घेऊनच जगला. एकाही जखमेनं खपली धरली नाही. सगळ्या जखमा भळभळतच राहिल्या. कधी त्यातून ना सकं र क्त ठिपकत राहीलं. कधी त्यातून हिरवट- पिवळा पू ठिपकत राहीला. पण जखमा बऱ्या झाल्याच नाहीत”. वयाच्या पन्नाशीत घटस्फो टाचा अर्ज केलेल्या अर्जदाराच्या मुलाला मी त्याच्याच घरची कहाणी सांगत होतो. बैजू सावंत विरूद्ध भक्ती सावंत अशी घटस्फो ट केस सुरू होती.
त्यांना बलराज हा मुलगा होता. मी, बैजू सावंत आणि पुर्वीची भक्ती शिंदे एकाच काॅलेजचे विद्यार्थी होतो. त्या दिवशी बलराजला मीच बोलवून घेतले होते. बलराजला मी पुढे सांगू लागलो. मुळात तुझी आई ही पत्नी झाली. पण तुझ्या बापाची सावली होता आलं नाही तिला. तुझा बाप कष्ट करीत राहिला, दुःख झेलीत राहिला, प्रपंचाचं घरटं बांधत राहिला. तुम्हा सर्वांचा रात्रंदिस विचार करीत राहिला.
काही निर्णय चुकले, बरेच यशस्वी झाले, पण तो थांबला नाही…पुढे चालतच राहिला. घराबाहेरच्या संकटांना तो कधीच घाबरला नाही. धीराने तोंड दिले. खचला नाही, निराश झाला नाही, उमेद हरला नाही. तु लहान होतास बलराज. (तुझ्या बापाला ) बैजूला धाकल्या भावाने आणि बहीणीने घराबाहेर काढलं. खूप मोठं भांडण झालं. अंगावरच्या कपड्यानिशी बैजू बाहेर पडला. सरळ माधवनगर गाठलं. दोन दिवस पाहुण्यांकडे राहिला.
तुम्ही दोघं भावंडंं, भक्ती आणि बैजू. चौघेजण किती दिवस पाहुण्यांकडे राहणार? दोन दिवसांनी निर्णय घेतला…. कोल्हापूरला जायचं. कोल्हापुरात एक खोली भाड्याने घेतली, गवत मंडईला लागून. तिथेच एका दुकानात बैजूला काम मिळालं. आटोपार्टची पार्सल डोक्यावरून आणायची. दुकानातली पार्सल ट्रा न्सपोर्टला टाकायची. पॅकिंग करायचं. त्यावर नाव आणि पत्ता टाकायचा. बारदान व्यवस्थित लावायचं. या कामाच्या बदल्यात पहिल्यांदा उच्चल घेतली.
घर मालकाला थोडं ॲडव्हान्स दिलं. राहिलेल्या पैशात स्टो व्ह, रॉ केल, तांदूळ, चार भांडी घेतली. कोल्हापुरात त्या पडक्या खोलीत तुझ्या बापाने पुन्हा संसार चालू केला. तुमच्या शिक्षणाचा प्रश्न होता. प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला हवा होता. पण वर्ष संपण्यापूर्वी अध्ये-मध्ये दाखलाही मिळत नव्हता. तुमचं वर्ष वाया जाणार होतं. पण इलाज नव्हता. दोन दिवस बापाला झोप नाही. मित्राकडे गेला, शिक्षकांकडे गेला, शाळेत गेला. पिच्छाच सोडला नाही.
शेवटी एक मार्ग निघाला. एका शाळेतील हेडमास्तर म्हणाले, “आपण पूर्वीच्या शाळेत पत्र पाठवू या. मुलांना उद्यापासून शाळेला सोडा.” त्या दिवशी बैजू थोडा शांत झोपला. बैजूची अशी रोज धावपळ, तुमचं शिक्षण, राहण्याची सोय, घराचं भाडं, अंगावरची उच्चल, गावाकडचे भावाबरोबरचे वा द, दुकानातली कामं, अंधारलेलं भविष्य, पुढची खडतर वाट. या काळोखातही बैजू चालत राहिला. पण तुझ्या आईला मात्र यातलं काहीच पटत नव्हतं.
आईची वाटच वेगळी होती. तिला कायम तिच्या भावाच्या पोराबाळांची चिं ता. सतत माहेरचीच ओढ. भाऊ भोळा आहे त्याला कुणाचा पाठिंबा नाही. त्याला कळत नाही. तो निर्णय घेऊ शकत नाही. सारं मलाच बघावं लागतं. अशी तुझ्या आईची भावना. पोटच्या पोरांचं सोडून भावाच्या पोरांची कशाला काळजी करतेस? एकदाच बैजू असं म्हणाला. भक्तीनं आठ दिवस अबोला धरला. बैजूबरोबर तीनं उभा दावाच मांडला.
माझ्या भावाबद्दल आणि आई-वडीला बद्दल बोललेलं मला आवडणार नाही, म्हणाली… आणि एक दिवस तुम्हा सर्वांना सोडून ती माहेरी निघून गेली. बैजूची चाललेली धडपड. ऊर फुटेस्तोवर धावाधाव. घरावर आलेले संकट, बैजूचं कष्ट. कशाचाच विचार नाही. हे कोणासाठी चाललंय याचा ही विचार नाही. भडक माथ्याने थेट माहेर गाठलं. बैजूच्या ऊरातली ही पहिली जखम… बैजूने धाकल्या भावावर नको तेवढा विश्वास टाकला. व्यापारामुळे बैजू कधी नागपूर तर कधी औरंगाबादला, दोन-दोन महिने गावी नाही.
आईला दिलेल्या वचनाप्रमाणे बैजू पळत होता. राबत होता घरासाठी, धाकल्या भावासाठी, बहीणीसाठी. धाकला मात्र शौकीन निघाला दिवसभर हूंदडायचा. कधी कधी दारु प्यायचा. कोळ्याच्या विधवा रंजीचं प्रकरण गावभर झालं. पण धाकल्याला त्याचं सोयरसुतक नव्हतं. बैजूचं गावात वजन होत. मानमरातब होता. त्याच्या कानावर ही गोष्ट गेलीच नाही. कोण घालणार? कोण धाडस करणार? तुम्ही गावी असता तर कदाचित हे झालं नसतं. बैजू मिळवत होता.
धाकला उधळत होता. बैजू गावी येणार कुणकूण लागली की धाकला घर सोडायचा नाही. कामात दंग रहायचा. शेताकडे जायचा. वैरण काडी बघायचा. चार दिवस मळकी, फाटकी कपडे घालायचा. बैजू परत गेला की धाकल्याचं मागचं ते पुढं. रंजीच्या नादानं धाकला कं गाल झाला. रंजीची दोन पोरं, एक पोरगी, त्यांचा प्रपंचा धाकलाच चालवत होता. कष्ट बैजूचं…पैसा बैजूचा… मालक धाकला आणि प्रपंचा मात्र रंजीचा. एके दिवशी रंजीच्या चुलत भावानंच बैजूला हे सांगितलं.
बैजूनं धाकल्याला बोलवून घेतलं आणि दोन तडाखं लावलं. बैजू कडाडला, संतापला, चवताळून उठला. पण धाकल्याच्या चेहर्यावरची रेषही हलली नाही. थंडगार बर्फागत तो बसून राहिला. चुकलं म्हणला नाही. पुन्हा असं करणार नाही म्हटला नाही. उलट त्याने बैजूबरोबर बोलणं सोडलं. बैजूच्या ऊरातली ही दुसरी जखम…. आईच्या माघारी घराचं वाळवंट झालेलं. तुझ्या आजोबानं दा रूच्या पायात कर्ज करून ठेवलेलं.
सारा जमीन-जुमला भगवान देसाईला गहाण दिलेला. शेवटी दा रूतच आजोबा मेलेला. आज्जीनं मात्र बैजू, धाकला, आणि तुझी आत्त्या यांना घरपण दिलं, शिकवलं, शहाणं केलं. पण तिलाही द म्याचा वि कार होता. एका रात्री खोकत खोकतच गार झाली. शेजारी बैजू होता, म्हणाली, “आता तूच कर्ता. तुझ्यावरच भार पडलाय आणि धाकल्याकडे, तुझ्या आत्तीकडे हात करून म्हणाली, “यांना अंतर देऊ नको. जमीन जुमला सोडव …” खोकल्याच्या उबाळीतच डोळं गारगोटी झालं, आई कायमची गेली. बैजूच्या ऊरातली ही तिसरी जखम…
ती ही जखम घेऊन तो पळू लागला. कर्ता बनून बहिणीचं लग्न केलं. चांगल्या घरात दिली, सोनं नाणं केलं, माहेरवाशिणीच्या दुरडीपासून पाहुण्यांच्या आहेरापर्यंत सगळं केलं आणि तिचं सुरळीत लावलं. कधी तरी तिचा फोन यायचा. ”धाकल्याकडे बघ! तू काय चार रुपये कमवशील पण तो भोळा आहे, त्याला तुझ्याशिवाय कोण आहे ?” बैजू ऐकून घ्यायचा. पण बहिणीच बोलणं जिव्हारी लागायचं. आई बापाच्या माघारी सगळ्यांनी घर उभारावं ती सर्वांचीच जबाबदारी आहे.
पण त्याऐवजी सगळे बैजूला दो षी धरत होते. एके दिवशी बहिणीने धाकल्याला मुक्कामाला बोलावलं जेवण केलं. झोपताना म्हणाली, “तुझं तू आता काहीतरी बघ बाबा. त्याचं काय लग्न झालय. पैसे मिळवतोय पोरं होतील पण तुझं काय?” मग धाकला जास्तच बिथरला. बैजू पैसे पाठवायचा आजोबानं केलेलं कर्ज फिटावं, जमीन जुमला सोडवावा म्हणून. पण झालं उलटंच.
धाकला चैनी करायला लागला. बहीण त्याचीच बाजू उचलून धरु लागली. ही बैजूच्या ऊरातली चौथी जखम…. मात्र काही झालं तरी आईला वचन दिलय. जबाबदारी आपलीच आहे ही बैजूची ठाम भावना होती. धाकल्याचं लग्न करायचं होतं. बैजू भोसेला गेला, खानापूरला गेला, वांगीला गेला, इलाख्यात फिरला. मुलगी बघितली आणि लग्न करून दिलं. बहिणीला दागिनं, भावजयला सोनं. सगळं एकट्यानं केलं.
बैजूच्या अंगावर कर्ज वाढलं. नागपूरकडची धंद्याची साईट बंद झाली. सगळा बोऱ्या बिस्तरा घेऊन बैजू गावी आला. आता इथेच काहीतरी व्यवसाय करायचा ठरवले. भावाची साथ नव्हती. बहिणीचा आधार नव्हता. आई-वडील तर केव्हाच गेलेले. जाताना विस्कटलेला संसार टाकून गेलेले, अंगावर कर्ज होतं, जवळ पैसा नव्हता. लग्न झाल्यापासून धाकला अजिबात बोलत नव्हता. बहीण काड्या घालतच होती.
एके दिवशी बहीण आली होती. घरातल्या राशनवरुन भांडण निघालं. बहीण बैजूला म्हणाली, “तू अजिबात घरात काही आणत नाहीस. अशानं घर कसं चालणार? बैजू म्हणाला, ”आतापर्यंत कमवले तेवढं तुमच्या स्वाधीन केलं. पैशाचा हिशेब मागितला नाही, विश्वास ठेवला. त्या सगळ्या पैशाची तुम्ही वाट लावली. आज तुम्ही जे बोलताय ते बोलताना लाज नाही का वाटली?”
धाकला वस्सकन उठून अंगावर आला. “कुणाची लाज काढतोस? केलं ते आमच्यासाठी नाही. तुझ्या आईने सांगितलं म्हणून केलंस. आमच्यावर उपकार केलेस काय? जे मिळालं ते आईच्या आशीर्वादानेच ना? कशाला एवढा टेंबा मिरवतोयस? आता तुझी एक दमडी नको आम्हाला. आत्ताच्या आत्ता घराबाहेर हो.” बहीण काहीच बोलत नव्हती. ती खाली बघून जमीन टोकरत होती. थोडा वेळ गेल्यावर बैजूला म्हणाली, “तू लई चुकीचं वागलास….”
तुझ्या बापानं घर सोडलं. बैजूला तिथच राहता आलं असतं. घर काही धाकल्याच्या एकट्याच्या मालकीचं नव्हतं. पण बैजू स्वाभिमानी होता. नियतबाज होता. त्यानं कोल्हापूर गाठलं, तिथं हमाली केली, नोकरी केली, भागीदारी केली, स्वतः दुकान टाकलं…मालक बनला. रात्रीचा दिवस केला आणि संसार उभा केला. तुला बी एड केलं. बंगला बांधला. प्लाॅट घेतला. पण यात तुझ्या आईची कुठेच साथ मिळाली नाही. ती अर्धांगिनी झालीच नाही तर झाली ती भागीदारीण.
बैजूने भावाला, बहिणीला मदत केली की तुझ्या आईचे डोके फिरे. गावाकडे पैसे दिले की ती भां डण काढे. आईच्या वचनाचं सांगितलं की, मेलेल्या आज्जीला शि व्या द्यायची. बैजू तिला समजवायचा. “तू काही काळजी करू नकोस. मी कमवतोय. तुम्हाला काहीही कमी पडू देत नाही. थोडे दिवस कळ काढा. माझी जबाबदारी संपली की मी रिकामा झालो.” पण ती ऐकण्याच्या अव स्थेत नसे. या ना त्या कारणावरून रोज भां डण होत असे.
अलीकडे तर ती भावाला, भावाच्या मुलांना पैसे देवू लागली. कपडालत्ता बघू लागली. तुम्ही तुमच्या बहिण-भावाला पैसे देत असाल तर मीही देणार असा हट्ट करू लागली. एके दिवशी तुझा बाप सांगायला गेला तर आईने भांडण काढलं. माहेरी निघून गेली. दोन दिवस… चार दिवस… आठवडा गेला तरी परत आली नाही. तू कॉलेजला मुंबईला. बैजूने तुला फोन केला. पण तुझा प्रतिसाद म्हणावा तसा मिळाला नाही. तू ही आईची बाजू घेतलीस. “तुमचं पण चुकतय पप्पा.”
तुझे शब्द ऐकून बाप आतून जळाला. काळीजच करपलं. बापाच्या ऊरातली ही पाचवी जखम… अशा अनेक जखमा घेऊन बैजू झुंजत राहिला. एकाकी लढत राहिला. कधी परिस्थितीशी तर कधी नातलगांशी. कधी भावाशी तर कधी बहीणीशी आणि कधी बायकोशी. पण यात बायकोने कहर केला. मग नाईलाज म्हणून बैजूने घटस्पो टा करिता अर्ज केला. अर्जाची कोर्टनोटीस निघाली. तुझ्या आईला ती मिळाली. आई जमिनीवरच आली. तिला तिची चूक उमगली. पण का यद्याप्रमाणे तिनेही वकील दिला.
मुलं लग्नाला आली. आता नातू येतील. या वयात घट स्फो ट? को र्टाने ते प्रकरण मध्यस्थीकडे पाठवले. तिथे तडजोड झाली. आज ते संपूर्ण प्रकरण मिटलं आहे. यातलं तुला काहीच माहिती नव्हतं. म्हणून सगळं सांगावं लागलं. बलराज ऐकत होता. तो खूपच अस्वस्थ आणि गं भीर झाला होता.
मी म्हटलं, “बलराज घरी गेल्यावर आता दोघांनाही समजावून सांग. झाले गेले विसरून जा म्हणावं. इथून पुढे आनंदी राहा…. बलराज बाकड्यावरून उठला. त्याचे डोळे डबडबले होते. म्हणाला, “सर, मी दोघांना समजावत बसणार नाही. पण एक नक्की करणार. घरी गेलं की, गेल्या-गेल्या माझ्या बापाला कडकडून घट्ट मिठी मा रणार…..!!!!