आत्मविश्वास, कष्ट , जिद्द आणि चिकाटी या चार अशा महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यामुळे माणूस अगदी शून्यातून यशाच्या शिखरावर पोहोचतो .काम आणि कष्ट करण्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. कुटुंबाचे पोट भरायचे असेल तर काम आणि काम. याशिवाय दुसरा पर्याय असूच शकत नाही. आणि ही जबाबदारी जेव्हा वयाच्या अगदी लहान वयात अंगावर पडते तेव्हा काय होते? असच काहीस घडलय या मुलीच्या बाबतीत….
तिने वयाच्या सोळाव्या वर्षी म्हशी घेऊन व्यवसाय चालू केला आणि आज ती महिना सुमारे सहा ते सात लाख रुपये उत्पन्न घेते. चला तर पाहूया कोण आहे ही तरुणी, आपणास सांगू इच्छितो कि अहमदनगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील निघोज या गावातील या तरुणीचे नाव आहे श्रद्धा ढवण. तिने बीएससी फिजिक्स या सब्जेक्ट सह ग्रॅज्युएशन पूर्ण केली आहे.
ती सध्या 21 वर्षांची आहे. तिने सध्या एमएससी ला ऍडमिशन घेतले आहे. श्रद्धा चे वडील म्हशींची खरेदी विक्री करत होते. हाच त्यांचा व्यवसाय होता. श्रद्धा ही लहानपणापासून त्यांच्यासोबत जत्रेत म्हशी खरेदी विक्री करण्यासाठी जात असे. त्यामुळे तिला देखील म्हशी ओळखणयामध्ये थोडेफार अनुभव होते. श्रद्धा चे वडील अपंग असल्याने आणि काम होत नसल्याने अलीकडे तिच्या वडिलांनी सर्व जबाबदारी तिच्यावरच टाकली.
श्रद्धाने शिक्षण घेत घेत तसेच अभ्यासावर कोणताही परिणाम होऊ न देता हा दुग्ध व्यवसाय चालू केला. श्रद्धा साधारणतः दहावी ते अकरावीपासून म्हशींचे दूध काढायला शिकली. श्रद्धा सांगते , 1998 पासून वडिलांनी म्हशी पाळायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे सात ते आठ म्हशी होत्या. लिंबाच्या झाडाखाली ते म्हशी बांधत होते. श्रद्धा च्या वडिलांनी काम होत नसल्याने तिच्यावरच म्हशी ची जबाबदारी टाकली.
.
नेट वरती सर्च करून तिने आपला व्यवसाय कसा वाढवता येईल यावर विचार केला, खूप कष्ट केले आणि या व्यवसायात त्यांचा फायदा होऊ लागला ,थोड्या दिवसानंतर पंचवीस ते तीस म्हशी झाल्या. त्यामुळे जागा कमी पडायला लागली. म्हणूनच त्यांनी साधारणतः तीस म्हशींचा गोठा बांधला. आज त्यांच्याकडे जवळ जवळ 80 म्हशी आहेत.
म्हणून त्यांनी परत 80 म्हशींना पुरेल एवढा दुमजली गोठा बांधला. श्रद्धा म्हणते गोठ्यासाठी जवळजवळ 40 लाख रुपये खर्च आला. त्यांची तीन ते साडेतीन एकर शेती आहे. सुरुवातीला जेव्हा वीस ते पंचवीस म्हशी होता तेव्हा शेतातील चारा पुरायचा. पण म्हशींची संख्या वाढल्यानंतर चारा विकत घ्यावा लागतो असं ती म्हणते. उन्हाळ्यामध्ये वैरण महाग होते त्यासाठी ते आधीच चारा साठवून ठेवतात.
कडबा कुट्टी करतात. आज श्रद्धा, तिचा लहान भाऊ आणि तिची आई मिळून हा गोठा सांभाळतात. आज त्यांच्याकडे चार गडी कामाला आहेत. श्रद्धा सांगते, वीस म्हशी ती स्वतः सांभाळते आणि राहिलेल्या 60 म्हशी गडी सांभाळतात. गडी जेव्हा गैरहजर असतात त्यावेळी तिचे वडील सुद्धा मदत करतात.
श्रद्धा सकाळी लवकर उठून म्हशींना चारा, कडबा, घालते. तसेच दूध काढून ती स्वतः मोठ्या गाडीतून डेरी ला घालून येते. दररोज जवळजवळ चारशे पन्नास लिटर दूध निघते. ती सांगते, तिचे वडील तिला ती दहावीत असल्यापासून मोटार सायकल वरून दूध डेरी मध्ये घालून यायला सांगत असत. गावात आज पर्यंत कुठल्याही मुलगीने असे काम केले नव्हते. आणि तिनेही कुठल्या मुलगीला असे करताना पाहिले नाही. असं श्रद्धा म्हणते.
सुरूवातीला तिला देखील ही सर्व कामे करताना विचित्र आणि अनोखं वाटत होतं. तिचं हे काम पाहून गावातील लोकांनी तिचे कौतुक केले आणि तिला प्रोत्साहन दिले. त्यामुळे श्रद्धा मध्ये अधिकच उत्साह आणि विश्वास निर्माण झाला. आज जवळजवळ महिन्याला सर्व खर्च जाऊन दीड लाख रुपये उत्पन्न होते, असे ती सांगते. इतकच नाही तर सेंद्रिय खत बनवण्याचा अभ्यास देखील ती करत आहे.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.