नमस्कार मित्रांनो, मोठ्या पदावर असलेला हा बँक मॅनेजर! एक पत्नी व तीन मुले असा सुखी संसार. आर्थिक व्यवस्थापन व्यवस्थित केल्याने आयुष्याची घडीदेखील वडिलांनी योग्य प्रकारे बसवलेली. मुले मोठी होतात आणि त्या तिघांचीही लग्न होतात. तिघेही मुले नोकरीनिमित्त वेगवेगळ्या शहरात राहायला जातात. वडीलही इकडे निवृत्त होऊन पत्नीसह मूळ शहरात राहत असतात.
मात्र वडिलांनी एक नियम लावलेला असतो की, वर्षातून एकदा दिवाळीला सगळ्यांनी एकत्र यायचच! मुलेही ते आनंदाने मान्य करतात आणि मग प्रत्येक दिवाळी आनंदाने प्रकाशात उजळून निघत असे. मुले, सुना, नातवंडांनी घर अगदी भरून जायचं. दिवाळीचे चार दिवस कसे भुर्रकन संपले हे कळायचच नाही. असं सगळं आनंदात सुरु असत!
पण का कोण जाणे सुखाला जणू दृष्ट लागते अस म्हणतात ना अगदी तसच होतं अन अचानक एके दिवशी त्या मुलांची आई हार्ट अटॅकने मृत्यु मुखी पडते, वडील सैरभैर होतात. हि बातमी कळताच मुलं सुना सगळे धावत येतात. रिवाजाप्रमाणे आईचे अंत्यसंस्कार केले जातात. संध्याकाळी सगळे मिळून हॉल मध्ये बसलेले असताना धाकटा मुलगा म्हणतो, “आता आई गेली, तुम्ही एकटे इथं एवढ्या मोठ्या घरात कसे राहणार?
तुम्ही आमच्यासोबत चला, माझ्या घरी राहा.” धाकटी सूनही त्याला होकार देते. मात्र वडील नकार देत म्हणतात, “माझ्या सगळ्या आठवणी या घराशी जोडलेल्या आहेत. तुमच्या आईचा सहवास लाभलेले सगळे आनंदी क्षण इथल्या वास्तूत भरून राहिलेले आहेत. ते सोडून दुसरीकडे माझं मन रमणार नाही” यावर सगळे गप्प होतात.
शांततेचा भं ग करत वडील सांगू लागतात की, “मुलांनो, माझी संपत्ती माझ्यासाठी थोडी ठेवून बाकी तुम्हा तिघांमध्ये समान वाटून दिली आहे. त्याची कागदपत्रे तुम्ही घ्या. मात्र तुमच्या आईच्या दोन वस्तू आहेत. त्याची वाटणी कशी करू हे कळत नाहीये. एक म्हणजे तिचे सुमारे लाखभर रुपये किमतीचे सोन्याचा पट्टा असलेले घड्याळ व दुसरं म्हणजे वेणीफणीचे शृंगार सामान ठेवण्याची चांदीची सव्वा लाखाची सुंदर पेटी आहे.
वस्तू दोनच आहेत आणि तुम्ही तीन आहात. कशी वाटणी करू?” क्षणभर सगळे शांत !! काय बोलावं कुणालाच सुचत नाही. शेवटी धीर करून धाकटी सून म्हणते, “सासूबाई मला नेहमी म्हणत होत्या की, हे घड्याळ मी नंतर तुलाच देणार आहे, तोवर मी वापरत जाईन” तिच्या सुरात धाकटा मुलगाही सूर मिळवतो.
हे पाहून मधली सून पुढे येत म्हणते, “माझ्यानंतर माझी हि शृंगार पेटी मी तुलाच देण्याची व्यवस्था करणार आहे, असं सासूबाई मला बोलल्या होत्या” तिच्या म्हणण्यावर मधला मुलगाही होकार भरतो. आता वडिलांची नजर थोरल्या सुनेकडे जाते की आता ती काय म्हणणार ? हे ओळखून थोरली सून हसून म्हणते, “मामंजी, मला लक्षात आलं की तुमच्या मनात काय आहे.
पण तुम्ही दोनच बाबतीत बोलताय पण तिसरं पण एक अजून शिल्लक आहे, जे या दोन गोष्टीपेक्षा खुपच अनमोल आहे. ते मला द्या” आता बाकी दोन सुना मनातल्या मनात विचार करत असतात की, आपल्याला माहित नाही असे तिसरं काय आहे ? जे या दोन गोष्टीपेक्षा अनमोल म्हणजे महागडं आहे? आता ती वस्तू थोरलीला जाणार हे पाहून या दोघी विचारात पडतात.
वडील गोंधळात पडलेले पाहून शेवटी शांततेचा भं ग करीत थोरली सून म्हणते, “सर्वात अनमोल तर तुम्ही स्वतः आहात मामाजी. सासूबाई मला म्हणाल्या होत्या की, माझ्या नंतर माझ्या पतीची काळजी घेणारी तूच योग्य आहेस. मायेने तू त्यांना सांभाळ! तर म्हणून मामंजी, तुम्हीच ते तिसरे आहात. तुम्ही माझ्या घरी राहायला यायच आहे. माझे स्वतःचे वडील माझ्या लहानपणीच वारले त्यामुळे वडिलांची सेवा करायच राहून गेलं.
ती संधी जणू देवाने मला तुमच्या रूपात दिली आहे. तेव्हा तुम्ही आमच्या सोबत राहायच आहे.“ तिचे हे बोलणे ऐकून थोरला मुलगा भारावतो. वडिलांच्या डोळ्यातही पाणी येते. थोरल्या मुलाला घट्ट मिठी मा रून वडील अश्रूंना वाट करून देतात. तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर आमचे पेज फॉ लो करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.