वडील आणि मुलीमध्ये नेहमी एक सुंदर नातं असतं. ज्या मुलींचं आपल्या वडिलांसोबतच नातं सुंदर असतं. त्यांच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यातील आठवणी सुंदर असतात. आपल्या वडिलांबरोबर चांगलं नातं असल्यास आपल्या स्वभावावरही त्याचा परिणाम होत असतो. जो भविष्यातील वै वाहिक आयुष्यावर प्रभाव टाकत असतो.
जर वडील खूप रा गीट किंवा त्यांचा सहवास न लाभल्यास मुलींमध्ये विश्वासाची क मतरता निर्माण होते आणि आयुष्यात येणाऱ्या पुरूषांशी वागण्याबाबत स मस्या निर्माण होतात. याउलट जर वडील सतत पाठिंबा देणारे आणि प्रेम करणारे असल्यास मुलीही तेवढ्याच आ त्मविश्वास असलेल्या आणि कणखर बनतात. त्यामुळे मुलींच्या आयुष्यात वडिलांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे. नाही का?
आता जी स्टोरी तुम्ही वाचणार आहात तशी स्टोरी याआधी कधीच ऐकली नसेल. ह त्ये प्रकरणी एका व्यक्तीला जन्मठेपेची शि क्षा झाली होती. शि क्षेचा कालावाधी सुरू असताना तो परोलवर बाहेर आला आणि १२ वर्ष फ रार राहिला. त्यानंतर अचानक त्याने आ त्मसमर्पण केले. हे सर्व कशासाठी तर मुलीच्या शिक्षणासाठी… गोष्ट खरी वाटत नाही न? पण ही गोष्ट खरी आहे.
संजय तेजने यांना २००३ साली वडील शालीराम आणि भाऊ वासुदेव, नामदेवसह ह त्येच्या आ’रोपात अ टक करण्यात आले होते. या चौघांना २००५ साली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. संजय दोन वेळा पत्नी कल्पना आणि आईला भेटण्यासाठी परोलवर बाहेर आले होते. पहिल्यांदा ते जेव्हा तुरुंगातून बाहेर आले तेव्हा त्याची पत्नी ग र्भवती झाली.
पत्नी कल्पनाने २००७ साली जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर त्यांनी न्यायालयाकडे शि क्षा माफ करण्यासाठी अर्ज केला. पण उच्च न्यायालयाने तो फे टाळून लावला. त्यानंतर संजय यांनी परोलसाठी अर्ज करण्याचे ठरवले आणि दोन्ही मुली मोठ्या होईपर्यंत फरार होण्याचा निर्णय घेतला हो एक माणूस चक्क सोळा वर्षे फरार राहीला, फक्त आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना आपल्या डोळ्यादेखत मोठ होण्यासाठी त्याचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी.
ठरवल्यानुसार संजय यांनी प्लॅन केला आणि तब्बल ४ हजार २०० दिवस फ रार राहिले. फ रार झालेल्या काळात संजय यांना काहीही करता आले असते पण त्यांच्यासाठी मुलींच्या पेक्षा काहीही महत्त्वाचे नव्हते. मुलींसाठी त्यांनी फ रार होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे शिक्षण पूर्ण होताच आ त्मसमर्पण देखील केले.
संजय यांच्या मुली श्रद्धा आणि श्रुती १२ मे रोजी जाहिर झालेल्या दहावीच्या निकालात अनुक्रमे ८६ आणि ८३ टक्के गुण मिळवले. त्यानंतर मुलींचे भविष्य खराब होऊ नये म्हणून त्यांनी आ त्मसमर्पण केले… दरम्यानच्या काळात त्या बापाने मुलींसाठी अपार कष्ट करून पैसे जमवले त्यातून त्याचा उदर निर्वाह केला, आणि आपल्या मुलींच्या सर्व गरजा पूर्ण केल्या.
संजय यांच्या मुली आता १६ वर्षाच्या झाल्या आहेत. गुरुवारी नागपूर मध्यवर्ती तु रुंगात एका NGO आणि तु रुंग विभागाने दोघींचे कौतुक केले. त्या दोघींनी नागपूरमधील हुडकेश्वर खुर्द चि कना संताजी शाळेतून शिक्षण घेतले. वडिलांच्या भेटीबद्दल बोलताना श्रद्धाने सांगितले की, आम्ही गुपचूप भेटायचो. ते माझ्यासाठी पुस्तक आणत परीक्षेच्या काळात ते रोज केंद्रावर सोबत येत.
त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली. मला इंजिनिअरिंग करायचे आहे. त्यानंतर मला वडिलांचे IAS अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. पण आता सर्व काही माझ्या आईच्या हातात आहे. आता तर वडिलांनी आ त्मसमर्पण केलेले आहे. पुढे काय होईल हे बघुयात, पण आम्ही देखील खूप मेहनत करून यश मिळवू.
जेव्हा वडील मुलीच्या शिक्षणात रस घेतात तेव्हा तिचा विश्वास दुणावतो. करिअर निवडणाच्या बाबतीतही वडिलांची साथ मिळाल्यास मुलींना उंच भरारी घेणे शक्य होते. ज्यामुळे त्या हमखास यशस्वी होतात. हेच वरील कथेतून आपल्याला समजते.