सकाळी साडे दहा अकराला झोपेतून उठलेल्या मुलीला पाहून शेवटी वडिलांनी आज थोड्या वरच्या आवाजात बोलायला सुरुवात केली. मग काय ठरवलस तु? हे असंच रोज उशीरा उठायचं, कसं तरी आवरायचं घरात एकही शब्द कुणाशी न बोलता उदास नाराजीने वावरायचं. चहा घे, नाष्टा कर, जेवण घे, आईने दहा वेळा विनवणी केल्यावर शेवटी उपकार केल्यासारखं कुठंतरी शून्यात नजर लावून आलेलं खायचं प्यायचं.
आई घरकामात, मी ऑफिसला गेल्यावर पुन्हा आपलं बेडरूम लावून स्वतःला आत बंद करून तासनतास नुसतं अश्रू ढाळीत, उसासे टाकत पडून रहायचं. आई सांगत होती, गेले आठ दहा दिवस तुझं असं वागणं दिवसागणिक वाढत चाललंय म्हणे. मी सुद्धा नोटीस केलंय, घरी आल्यावर पूर्वीसारखे बोलणे नाही ना हसणं नाही. सारखे चेहऱ्यावर उदासी, नाराजी आणि खि न्न भावना. काही विचारलं तर..जि वाभारी कसंतरी हो! नाही! त्रोटक उत्तर देऊन पुन्हा गप्प बसायचं!इतकं कुठलं आकाश को सळलयं गं तुझ्यावर?
त्यावर ती मुलगी म्हणाली की, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय, तसं काहीच नाही! सद्या माझी तब्बेत थोडी खराब असते, आणि त्यामध्येच परीक्षा सुद्धा जवळ आलीये, म्हणुन खोलीत आतंच अभ्यास करीत बसते. तुम्हाला वाटतं तसं काहींचं नाहीये! म्हणजे तुझी आई सांगतेय ते सगळं खोटं आहे. अगं तुझ्याच कुण्या मैत्रिणीन तुझ्या आईला कॉल करून तुझ्यावर बारीक लक्ष ठेवायला, तुला सांभाळायला, तुझी खुप काळजी घ्यायला लावली आहे.
अगदी स्पष्टच बोलायचे म्हणजे तुझं ते ब्रे कअप का काय म्हणतात ना ते झालंय म्हणे. खुप डि प्रेस आहेस तू. कॉलेज ट्युशन, फिरणं बोलणं सगळं बंद करून कुठंतर हरवल्यासारखं बसून असतेस. दिवसभर आईभोवती चिवचिव करीत तिचं डोकं खाणारी..घरभर बागडणारी हसणारी मुलगी तू ..तुला एव्हढा न र्व्हसनेस आलाय तरी कसा? अगं! झाला असेल प्रेमात ब्रे कअप? त्यासाठी रोजचं जगणं सोडायचं? आम्हाला वाटलं थोडा वेळ देवू तुला…होईल सगळं सुरळीत…घरी आल्यावर रोज तुझ्या आईला विचारायचो.
पण तुझ्यात काहींचं बदल नव्हता..असं उदास राहुन राहुन तू अधिकच त्यांत हरवायला लागली होतीस..म्हणुन आज स्पष्ट बोलायचं ठरवलं आम्ही..पुस ते डोळ्यांतले अश्रू..ये इकडं !बस इथे माझ्याजवळ!आणि सर्वप्रथम पूर्वी जशी खळखळून हसायचिस तसं एकदा मनमोकळं हसून दाखव आम्हाला! नाही बाबा! ते शक्य नाही आता! खरं तेचं सांगते! माझं हसू हिरावून घेतलं त्यानं! धो का दिलाय मला! दुसरी कुणी आलीये आयुष्यात त्याच्या! मग काय! टाळायला लागला मला! थोडा सुद्धा विचार केला नाही माझा! जाब विचारला! र डले! शपथ घातली!
आ त्मह त्या करेन ध मकी सुद्धा दिली..पण तो नाही फिरला मागे! मग कांय करू? नाही विसरू शकत मी त्याला.. जगायची इच्छा नाही राहिली आता… त्यावर तिचे बाबा म्हणाले की, “हा तर तुला खुपच वा ईट प्रकारे त्याने धो का दिला, मग आत्ता तू काय करणार पुढे, आ त्मह त्या? कसा जी व देणार?पण तुला आत्ता अशा प्रकारे मोठा धो का मिळाल्यामुळे, तू पुढे काय करणार, कशी आ त्मह त्या करणार आहेस ?
गळफास घेऊन? विष पिऊन? इमारतीवरून उडी मारून? का रेल्वेखाली झोपुन? या व्यतिरिक्त फेसबुकवर पोस्ट टाकून का, व्हिडीओ अपलोड करुन? काय त्या मुलाने धोका दिला अशी, जबाबदार धरून, चिठ्ठी लिहून? कारण तू आधीच आम्हला सावधान केलीस तर आम्ही मनाची तयारी करण्यास मदत होईल. उगीच पोलीस इथं आल्यावर माहीत होण्यापेक्षा आधीच समजलेलं बरं नाही का? कारण आम्ही कोणीच नाही ना तुझ्यासाठी.
जन्मापासून वाढवलं प्रेम दिलं, हर एक हट्ट पुरवला, चांगलं राहणीमा न दिला, शिक्षण देतोय अर्थात काय एवढं म्हणा, ते काय सगळेच आई वडील करतात. असंच वाटलं ना तुला, मात्र काल परवा ओळख झालेला कोण कुठला तो तुला अधिक जवळचा झाला. तुझं प्रेम नाकारलं म्हणून खाणं पिणं बोलणं सोडलंस, त्याच्या विरहात म रायला, जी व द्यायला तयार झालीस तू. अगं बाळा एक सांग, एकटीनं इतका त्रास सह न करत बसण्यापेक्षा एकदाही आमच्याशी बोलावं.
सांगावं अस नाही वाटलं तुला? आई बाबा समजून घेतील, समजूत घालतील असं कधीच मनात नाही आलं का तुझ्या. नाही बाबा, तुमच्या दोघांसमोर बोलण्याची कधी हिम्मत नाही झाली. ज्याला सर्वस्व मानलं त्यानेच माझा असा प्रेमानं केलेला अपमा न माझ्या जि व्हारी लागला. काहीच सुचत नव्हते. बेटा नाही तर तुम्ही आजकालची मुलं हे अशा बाबतीत आईवडीलांकडे आपली श त्रू म्हणूनच का बघतात हेच नाही कळत.
का शेअर करत नाही या असल्या गोष्टी? प्रेमात, परीक्षेत, नोकरीत अगदी घरात सुद्धा काही कारणांमुळे थोडं म नाविरुद्ध झालं, अ पयश आलं तर लगेच सारासार विवेकबुद्धी न ष्ट होते तुमची. अजिबात सह नशक्ती, स हनशीलता राहिलेली नाही तुमच्यात. आल्या संकटाला, परिस्थितीला तोंड देण्याऐवजी, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याऐवजी त्याविरुद्ध दोन हात करण्याअगोदर तुम्ही हार मानून चुकीचं पाऊल उचलता. पळपुटे झाला आहात का तुम्ही? असं करताना एकदा तरी आम्हा ज न्म दात्यांचा विचार करता तुम्ही?
आमचं काय होईल, एकट्याने निर्णय घेऊन मोकळे होतात तुम्ही. बाबा थोडे उद्वेगाने, थोडे उपरो धक बोलत होते. बाहेर वा दळी वाऱ्यासह को सळणारी पावसाची जोरदार सर आजूबाजूच्या लहान मोठ्या वृक्षराजीला मुळापासून हादरे देऊन उन्मळून टाकायला उतावळी होती. दरम्यान त्या त णावग्र स्त शांततेत..कुणीचं काही बोलत नव्हतं..परंतु पुढच्या क्षणी. तिने अवेगाने बाबांचे पाय धरले होते. बाबा माफ करा मला! चुकले मी! तुम्ही भानावर आणलंत मला! नाहितर खरंच काहीतरी भयंकर घडणार होतं माझ्या हातून! तिचा सं यम सुटला होता.
दाटलेल्या स्वरात तिला नीट बोलताही येतं नव्हतं. दुसऱ्या क्षणी पायाशी झुकलेल्या लेकीला बाबांनी प्रेमानं हृ दयाशी धरलं होतं..सारेच गहिवरले होते..ते दृश्य बरंच काही सांगून जातं होतं..बोलकं होतं..काही विपरीत घडण्या अगोदर..एका प्रेमभं गातुन उठलेलं वादळ हळूहळू निष्क्रिय प्रभावहीन होत होतं….पण तिचा सं यम सुटला होता, झुकलेल्या लेकीला बाबांनी प्रेमानं हृ दयाशी धरलं होतं!