नमस्कार मित्रांनो, लहानपणी आम्ही गावाला गेलो की आमची आजी नेहमी एक गोष्ट सांगायची ती शेजारची रमा आजी आहे ना ती खूप श्रीमंताची मुलगी, तिच्या लग्नात म्हणे बादलीने साजूक तूप वाढले होते, बिछाने घालण्यास सुद्धा घरगडी. या शामराव आजोबा सोबत लग्न झाले आणि फार हाल झाले बिचारीचे.
आग् आजी पण अशा गरीब घरी का दिलं, दिसायला पण छान आहे रमा आजी. अगं ते खोटे बोलले 25 एकर शेती सांगितली तिचे आई-वडील शेती बघायला गेले तर दुसऱ्याची शेती दाखवली आणि गावातील लोक ती पण तशीच, म्हणतात ना कशास कोणाचे लग्न मोडा ते पण खरं सांगत नाही.
गंमत म्हणजे घरात पन्नास पोती वैरण भरून ठेवलेली आणि सांगितले की पन्नास पोती गहू पिकले. तिच्या आई वडिलांना तेच खरं वाटल. 5 एकर शेती शेतात काबाड कष्ट करण्यात आयुष्य गेले बिचारीचे. कधी शेत न पाहिलेल्या मुलीने आयुष्यभर शेतात काम केले. मग सोडून द्यायचे ना असं होतं तर.
एकदा लग्न झाले की तिला तडजोड करावीच लागते आणि तिने पण आपले नशीब म्हणून स्वीकारले. ही गोष्ट आम्ही बरेचदा ऐकायचो, आम्हाला फार राग यायचा. मग माझी आई म्हणायची अगं फसवणूक आत्ताही होतेच की तो आपल्या गावातल्या सुधाकर आहे ना, चपराशी होता श्रीमंत घराची मुलगी शोधली बडा बाबू आहे म्हणून सांगितले. मुलीचे वडील ऑफिसमध्ये चौकशीसाठी गेले त्याला तशी कल्पना होती.
त्यांनी आधीच आपल्या सहकाऱ्याला सांगितले होते तिचे बाबा ऑफिसमध्ये गेले तर सहकारी म्हणाला सुधाकर बाबू का इथेच काम करतात बडे बाबु आहेत, पुढच्या वर्षी प्रमोशन पण होईल आणि वडील आणि मुलीचे लग्न लावून दिलं. नंतर कळले चपराशी आहे म्हणून पण काय करणार नशीब आपले म्हणून मुलीने स्वीकारले. मनात म्हणायची फसवणूक आजच होत नाही.
तर अगदी जुन्या काळापासून होत आहे. माझ्या एका मैत्रिणीची मैत्रीण पोस्ट ग्रॅज्युएट, दिसायला छान सुशिक्षित घरची. एका मुलाचे स्थळ आले मुलगा सेनेमध्ये चांगल्या पदावर असल्याचे सांगितले इतक्या लांब जाऊन काय चौकशी करणार. त्यातल्या त्यात स्थळ ओळखीतल्या नातेवाईकाने सुचवले होते त्यामुळे लग्न झाले. मुलगी मुलासोबत मुलाची पो स्टिं ग होती तिथे गेली.
दोन-तीन दिवसात ती नवऱ्याचे कपडे धुवायला गेली तेव्हा तिला खिशात आयकार्ड सापडले का र्डवर पद दिले होते क्लास फोर. तिच्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिने हे सर्व घरी सांगितले. मी या मुला सोबत राहू शकत नाही, यांनी माझी फसवणूक केली आणि ती महिन्याभरात घरी वापस आली. वरील तिन्ही बाबतीत फसवणूक ही सारखीच झालेली आहे. आयुष्यात त्रा स हा तिघींना ही झालेला आहे.
परंतु फरक इतकाच की तिसऱ्या प्रकरणात मुलींनी नवऱ्याला सो डण्याचा निर्णय घेतला म्हणजे आता मुली फसवणूक झाली की स हन करत नाहीत. लग्न जुळवताना मध्यास्थवर किंवा जुजबी चौकशीवर पूर्ण विश्वास ठेवला जातो बरेचदा आयुष्यभर बरोबर राहून ही माणसे कळत नाहीत. तर या तुटक भेटीच्या माहितीच्या आधारावर कशी कळणार. लग्न आणि फसवणूक हे अगदी पूर्वापार चालत आलेली आहे.
शेतकरी मुलगा असला की पाच एकर शेती असली तरी दहा एकर सांगतो, पगार वाला 30 हजार असेल तर 40 हजार सांगतो, शिक्षण, आ जार अशा अनेक बाबतीत फसवणूक होते. जोडीदार मा नसिक शा री रिक दृष्ट्या अ पंग कम जोर, कधी वि वाहित तर बरेचदा वाईट सवयी व्यस निक असू शकतो. फसवणूक मुलींचीच होते असे नाही तर मुलांचीही होते आणि स माजाच्या सगळ्या स्तरातील लोकांची होते.
परंतु बराच खर्च करून लग्न झालेल्या अशा लग्नातील फसवल्या गेलेल्या व्यक्ती आयुष्यातून उध्वस्त होतात. मुळात लग्नांमध्ये विश्वास हाच महत्त्वाचा असतो. परंतु लग्न जुळवताना खोटे बोलून फसवणूक करून जर होत असेल तर मा नसिक त्रास होतो त्याची परिणती घट स्फो टा त होते. त्या गोष्टी टाळता येण्यासाठी मुला-मुलींनी खरी माहिती दिली पाहिजे. आई-वडिलांनी आपल्या परीने पूर्ण चौकशी करायला हवी.
जेणेकरून आपल्या मुलांना सुखी वै वाहिक जी वन जगता यावे. कारण आता पूर्वीसारखे मुले-मुली तड जोड करत नाहीत त्यामुळे फसवणूक झाले ही बाब लक्षात येताच ते घट स्फो ट घेतात आणि त्यामुळे दोघांचे आयुष्य उध्व स्त होते. तेव्हा आयुष्याची सुरुवात खरं बोलूनच करावी. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.