लग्नाच्या ५ वर्षानंतर प्रियकर प्रेयसी्च्या घरी भाडयाने राहायला आला… पण नवरा नसताना त्या दोघांत जे काही घडले.. ते बघून तुम्हाला….

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, मीनाक्षी आणि महेश हे कॉलेजमध्ये खूप जवळचे मित्र होते. पण कॉलेज संपल्यानंतर त्या दोघांचे मार्ग वेगळे झाले. मीनाक्षीचे लग्न झाले आणि महेश अजूनही नोकरीसाठी प्रयत्न करत होता. चार-पाच वर्ष धडपड केल्यानंतर अखेर महेशला मुंबईत नोकरी लागली. पण तो मूळचा रत्नागिरीचा होता, त्यामुळे त्याला मुंबई मध्ये कोणाचीच ओळख नव्हती. महेश मुंबईला गेल्यावर मीनाक्षीचे सासर तेथेच कुठेतरी आहे हे त्याला कळले.

काही दिवस तिथे राहता यावे म्हणून त्याने मीनाक्षीचा पत्ता शोधून काढला. त्या पत्त्यावरील घरात जाताच त्याला समोरच मीनाक्षी उभी दिसली. मीनाक्षीचा रिकामा गळा आणि मोकळे कपाळ बघून त्याच्या मनात प्रश्न आले. महेशला असा अचानक तिथे पाहून मीनाक्षी आश्चर्यचकित झाली. पण जरा वेळ झाल्यावर महेशने मीनाक्षीला तिच्याबद्दल विचारले.

यावर ती बोलली, आमचे लग्न झाल्यानंतर अवघ्या तीन वर्षांनीच त्यांचा अपघाती मृ त्यू झाला. तिने ही गोष्ट सांगितल्यावर त्यावर महेशला काय बोलावे ते समजेना. शेवटी, तो तिला धीर देण्याशिवाय दुसर काहीच करू शकत नव्हता. त्याने तिला येथे त्याला नोकरी मिळाल्याचे सांगितले आणि हे ऐकून तिला खूप आनंद झाला. पण जेव्हा मीनाक्षीला समजले की, महेशला राहण्याची स मस्या आहे, तेव्हा तिने त्याला काही दिवस इथेच थांब असे सांगितले म्हणजे आपल्याला एकमेकांची सोबत होईल.

पण तो म्हणाला अगं पण तुझा नवरा जिवंत नाही मी इथे राहिलो तर लोकांचा उगाच गैरसमज होईल, तुला नावं ठेवतील त्यामुळे नको मी इथे रहात नाही. अरे, लोकं हजार तोंडाने हजार बोलणार, पण सत्य आपल्याला माहीत आहे ना म्हणून काळजी करू नको. तू रहा इथे, मला लोकांची पर्वा नाही. त्यानंतर दोघेही एकत्र राहू लागले. दोघांची कामाची वेळही एकच होती त्यामुळे दोघेही एकत्रच जेवू लागले होते. ते दोघे आता एकत्र वेळ घालवू लागले होते.

कंटाळवाणे आयुष्य जगणाऱ्या मीनाक्षीचे आयुष्य आता आकार घेऊ लागले होते. एकमेकांसोबत मस्ती करत असताना त्यांना पुन्हा कॉलेजमध्ये आल्यासारखे वाटत होते. सकाळी उशिरा उठत असल्याने मीनाक्षी महेशसाठी नेहमी नाश्ता टेबलावर ठेवून जात होती. हळूहळू दोघांनाही एकमेकांची जास्त सवय झाली, लोक त्यांच्याबद्दल बोलायचे पण त्यांनी त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. हळूहळू महेश हा मीनाक्षीच्या प्रे मात पडत चालला होता.

शेवटी एके दिवशी त्याच्या मनात काय होते ते त्याने मीनाक्षीला सांगितले. पण या गोष्टीवर मीनाक्षी मात्र त्याच्या बोलण्यावर लगेच ओरडली, “अरे, मला वाटलं आपली चांगली मैत्री आहे.” पण असे बोलून तू आपल्या असणाऱ्या मैत्रीचा अपमा न करत आहेस. वि वाहित स्त्रीला हे असे काही विचारणे योग्य वाटत का तुला? अग पण तुझा पती तर आता जगात नाही आणि आपण आयुष्यभर एकमेकांना खूप चांगली साथ देऊ.

पण हे मला बिलकुल मान्य नाही, मी अजूनही माझ्या पतीवर आधी करत होते तितकेच प्रेम करते आणि मी त्याला कधीच विसरू शकत नाही. बरं, तुला जे वाटतंय ते मला मान्य आहे असं म्हणत महेश झोपी गेला. सकाळी लवकर उठून ती नेहमीप्रमाणे त्याचा नाश्ता टेबलावर ठेऊन गेली. पण दुपारनंतर जेव्हा ती जेवायला घरी आली, तेव्हा मात्र तिने ठेवलेला नाश्ता हा तसाच होता आणि तिथे एक चिठ्ठी सुद्धा होती.

त्या चिट्ठीत महेशने तिने आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मा नले होते. तिने महेश ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी त्याच्याबद्दल चौ कशी केली, पण महेशने राजीनामा दिल्याचे तिला समजले. जसजसे दिवस उलटून जात होते तसतसे तिला महेश नसल्याची क मतरता जाणवू लागली होती. जेवताना त्याच्यासोबत केलेली धमाल मस्ती, एकमेकांशी होणारे छोटे-मोठे वा द हे सर्वच तिला आठवू लागले होते. हळूहळू तिला त्याच्याशिवाय जगणे कठीण वाटू लागले होते.

त्याची आठवण मीनाक्षीला अधिक त्रा स देऊ लागली, सर्व काही समोर होते. पण तरी सुद्धा तिचे म न भरकटत होते, तिचे लक्ष कशातच लागत नव्हते. मीनाक्षीने तिच्या मैत्रिणीला तिची झालेली ही अवस्था सांगितली. तिच्या मैत्रिणीने तिला सांगितले की, तुला या परिस्थितीतून खरच बाहेर पडायचे असेल तर, तू महेश सोबत लग्न कर. तू हे सर्व न जुमानता एकदा महेश सोबत बोल आणि तिच्या मैत्रिणीचे म्हणणे मीनाक्षीला पटले. त्यांनतर तीने लगेचच एक दिवस सुट्टी घेतली आणि रत्नागिरीला महेशला भेटायला त्याच्या घरी गेली.

तिथे त्याची वृद्ध आई होती, ती त्याच्या आईला आधीपासूनच ओळखत होती कारण ती त्याच्या आईला या आधी पण भेटली होती. तिने आईला महेशबद्दल विचारले असता ती म्हणाली, “तो सकाळपासून बाहेर आहे कुठे गेला माहीत नाही.” वेळ हळू हळू सरकत होती आणि मीनाक्षी त्याची खूप वाट पाहत होती. पण महेश काही अजून आला नव्हता. शेवटी तिने वै तागून आईचा निरोप घेतला आणि मुंबईला जाणाऱ्या गाडीत बसली. जेव्हा गाडी चालू लागली होती. तेव्हा मात्र ती त्याला भेटण्यासाठी स्वतःला थांबवू शकली नाही.

शेवटी गाडीतून जात असताना तिला त्यांचं कॉलेज दिसलं आणि तिच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ती थोडावेळ ती गाडी थांबवून उतरली आणि त्यांच्या कॉलेजचे गेट बघितल्याने तिला त्यांनी केलेली मजा मस्ती, दंगा सर्वकाही आठवत होत. तसेच, जसजशी ती पुढे जात होती, तसतसे तिला वर्गाचे दार उघडे दिसले आणि तिला जाणवू लागले की, त्या ठिकाणी आत कोणीतरी आहे त्यामुळे ती आत गेली.

खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या झोताने एका बेंचवर ठेवलेल्या वहीची पाने स्वतःच पलटून बदलत होती, तिने त्या खिडकीचे दरवाजे बंद केले आणि ती वही उचलून हातात घेतली. जेव्हा मीनाक्षीने ती वही पाहिली तेव्हा तिला जाणवलं की यामधे जी कविता लिहिली आहे ती तिने अगोदर कुठेतरी वाचली आहे. पण अचानक तिला आठवल की, ही कविता महेशने लिहिली आहे आणि त्याने ही कविता कॉलेजच्या शेवटच्या दिवशी सर्वांसमोर वाचली सुद्धा होती.

त्यावेळी तिला महेश तिथेच कुठेतरी असल्याचं जाणवलं. मीनाक्षी मात्र त्याला सर्व ठिकाणी शोधत होती आणि शेवटी तो तिला गच्चीवर सापडला. महेश टेरेसवर भिंतीच्या कडांवर हात ठेवून उभा राहिला होता. त्याला तसं बघून ती स्वतःचे अश्रु थांबवू शकली नाही आणि तिला झालेल्या अनंदामुळे ती स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिने पळतच जाऊन त्याला मिठी मा रली. तसं तो पुढे म्हणाला, ”आलीस तू… किती दिवस मी इथे वाट पाहत होतो, मला माहीत होतं की तुझ्यावरचं माझं प्रेम तुला इथे यायला लावेल, पण आता तर नाही ना मला सोडून जाणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *