नमस्कार मित्रानो, एका आगळ्या वेगळ्या कथेमध्ये, तर शहरातले सर्वात गजबजलेले हॉ स्पिटल होत ते त्यामुळे अनेकानेक आ जारांचे असंख्य रु ग्ण तेथे उ पचार घेत होते. तर कोणी औ षधांच्या अतिरेकाला कंटाळून निपचित पडून होत, तर कोणी नुकतंच मृ त्यूशी यशस्वी झुं ज देऊन विजयी पताका मिरवीत होत.
नातेवाईकांचा गजबजाट, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची वर्दळ, औ षधांचा दर्प पण या अलिप्त असा आयसीयु वॉर्ड आणि त्यामध्ये निपचित पडलेला मंदार. तर मंदार हा एक अतिशय हुशार आणि धा डसी तरुण आपल्या हिमतीवर अस्तित्त्व निर्माण केलेला असा उमदा राजबिंडा तरुण. आज जगाशी सगळं नातं तोडून आयसीयू मध्ये निपचित पडला होता.
३- ४ दिवसांपूर्वीच ऑ क्सिजनच्या क मतरतेमुळे त्याला इथे आणले होते. त्याच्यावर सर्वात उत्तम उपचार चालू असून देखील तो त्याला प्रतिसाद देत नव्हता. त्याची हि अ वस्था पाहून प्रत्येक जण हळहळत असे. आणि असेच एकदा जनरल वॉर्डमधल्या लोकांच्या सर्व तपासण्या करून सिस्टर आयसीयू मध्ये आल्या.
त्यांनी मंदारची तपासणी केली, त्याच्या तब्येती मध्ये कोणतीच सुधारणा होत नाही हे पाहून त्यांना खूप वाईट वाटलं. त्याची प्र कृती सुधारावी म्हणून त्यांनी देवाकडे प्रार्थना देखील केली. त्या उठून पुढे जाणार तोच मंदारचा फोन वाजला. सिस्टरने फोन उचलून मंदार काहीच ऐकण्याच्या अव स्थेत नाही आहे असे सांगितले.
पण पलीकडून एका मुलीने मंदार सोबत तिचे बोलणे किती महत्त्वाचे आहे ते सांगून तो फोन मंदारच्या कानाला लावण्याची विनंती केली. सिस्टरने ते मान्य करून फोन मंदारच्या कानाला लावला. मंदार जरी काही बोलू शकत नसला तरी आवाज ऐकणं त्याला जमत होत. म्हणूनच सिस्टरने त्याला फोन दिला.
हॅलो मंदार…पलीकडील आवाज ऐकून मंदारच्या शरीरात काही बदल झाल्याचे सिस्टरला जाणवले, तिने लक्षपूर्वक मंदारच्या हा लचालींचे निरीक्षण करायला सुरुवात केली. फोन वरील आवाज ऐकून मंदार हालचाल करू लागला होता.
मंदार मी पल्लवी, पलीकडून पुन्हा आवाज आला. तू मला ३ दिवसांपूर्वी असा का मेसेज केलास कि मी मेल्यानंतर तरी मला पाहायला ये म्हणून? मंदार, तुला माहितीये माझं तुझ्यावर किती प्रेम आहे.
तरीसुद्धा तू असा का वागलास? मी गावाकडची साधी सरळ मुलगी आहे, इथे कामासाठी आले. काम करून स्वतःची ओळख निर्माण करण्याचं स्वप्न होत माझं. ते पूर्ण करण्यास तूच मदत केलीस मला. इथे तुझ्या ओळखीने जॉब मिळाला मला. आपण कितीतरी दिवस एकमेकांसोबत एकत्र होतो, ऑफिस नंतर भेटायचो, कधी भेळ, पाणीपुरी, कधी सामोसा खायचो.
कधी बाहेरच जेवायचो, तर कधी नुसतंच चौपाटीवर बसून यायचो. खूप छान दिवस होते ना ते. या मैत्रीने प्रेमाची गाडी कधी पकडली आपल्यालाच समजलं नाही. मला तुझ्याशी ल ग्न करून मस्त सेटल व्हायचं होत. तूला मात्र ल ग्न म्हणजे बंधन वाटत होत. तुला लि व्ह इन रीलेशीप मध्ये राहायचं होत. एकमेकांशी जमल तर ठीक नाहीतर आनंदाने वेगळ होऊयात अस तुझ मत.
मी मात्र याच्या एकदम वि रुद्ध मताची. चार लोकांच्या साक्षीने दिमाखात ल ग्न करून मिरवायची हौस होती. या बाबतीत आपली खूप भां डणे झाली, पण तरी सुद्धा आपण एकत्र राहिलो आणि परवा अचानक तुझा असा मेसेज.. मंदार, माझ आजही तुझ्यावर तेवढच प्रेम आहे. तू लवकर बरा हो आपण ल ग्न करून छान सेटल होऊयात प्लीज…
आणि तिकडून फोन कट झाल्याच सिस्टरच्या लक्षात आल. पाणावलेल्या डोळ्यांना नजरेआड करून तिने मंदारकडे पहिले त्याचे डोळे सुद्धा भरून वाहत होते. त्यादिवासा नंतर मंदारच्या प्र कृतीमध्ये कमालीची सुधारणा होत गेली. तो आता व्यवस्थित बोलू शकत होता, उठून उभ राहू शकत असे. एकूणच मंदार आता पूर्ण बरा झाल्याचे डॉ क्टरांनी सांगितले.
आणि मग काही दिवसांनी पल्लवी त्याला घेऊन गेली. लवकरच मंदार आणि पल्लवीने लग्न केले. आज ते दोघही सुखाने सं सार करत आहेत. मंडळी, तुमच्या लक्षात आल का? कि खर प्रेम हे तुमच्या शा रीरिक स्वा स्थ्यावर, तुमच्या दिसण्यावर अवलंबून नसते तर तुमच्या असण्यावर अवलंबून असते.
तुम्ही कोण आहात यापेक्षा तुम्ही कसे आहात यावर प्रेम करणारी व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यात येते तेव्हा आपल्या आयुष्यात खरा टर्निग पाॅईंट असतो. मंडळी कशी वाटली मग आजची गोष्ट ? आवडली ना? मग आपल्या आयुष्यात अशी कोण व्यक्ती आहे का जिला तुम्ही आज सुद्धा मिस करत आहात? तर आम्हाला नक्की सांगा