रेसच्या लंगड्या घोड्यांना मारून का टाकलं जातं?…घोड्यांना बरं करण्याऐवजी घोड्याचे मालक त्यांना मारून का टाकतात

लाईफ स्टाईल

मित्रांनो आपल्याला घोडा या प्राण्याचे उपयोग माहीत असतीलच. अगदी वरातीच्या नवरदेवापासून ते अवजड असे ओझे वाहण्यासाठी घोड्याचा उपयोग केला जातो. कुणी रेसकोर्सवर घोडसवारी साठी तर तर कुणी टांगा चालवण्यासाठी त्याचा उपयोग करतो. घोडा हा एक प्राणी आहे ज्याचे स्वरूप आणि आ रोग्य थेट त्याची काळजी कशी घेतली जाते यावर अवलंबून असते.

निसर्गाने प्रत्येक सजीवाला एक प्रकारची श रीर रचना दिली आहे. या रचने प्रमाणे त्याला कार्य करता येते. घोडा का बसत नाही, या अगोदर आपण इतर दोन पायाच्या यांची शरीर रचना समजून घेऊ. प्रथम आपली शरीर रचना तपासून पहा. आपण का बसतो? तर आपले पाय गुडघ्यापासून दुमडता येतात म्हणून आपण बसू शकतो.

गाय, बैल किंवा कुत्रा बसतांना तुम्ही पाहिले तर त्यांचे गुडघे त्यांना दुमडता येतात म्हणून ते बसू शकतात. घोडयाची पायांची रचना तुम्ही पाहिलीत तर तुमच्या असे लक्षात येईल कि त्यांचा पाय गुडघ्यात दुमडू शकत नाही. कारण, निसर्गाने तिथे सांधेच दिले नाहीत. सांधा असला तरी तो बिजािगरीचा नाही, त्यामुळे तो पायाची हाडे मागे पुढे दुमडू शकत नाहीत.

घोडयाला आपले पाय दुमडता येत नाहीत, त्यामुळे तो बसू शकत नाही. त्यामुळे घोड्याला आणि त्यातल्या त्यात रेसचा घोड्यांना आणि त्यांच्या आणि पायांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतू रेसचा घोडा हा धावपट्टीवर असे पर्यंत त्याला किंमत दिली जाते, पण एकदा का त्याचा पाय मोडला की त्याचा जी व घेतला जातो. हजारो ज खमी, पाय मो डलेले घोडे दरवर्षी मा रले जातात.

घोड्यांना बरं करण्याऐवजी घोड्याचे मालक त्यांना मा रून का टाकतात असा प्रश्न पडला ना ? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. आपल्याला हा प्रकार अमानुष जरी वाटत असला तरी विज्ञान म्हणतं की हे घोड्यासाठीच फा यदेशीर आहे. आता कसंं ते समजून घेऊया. त्याचं असं आहे, घोडा हा माणसाप्रमाणे मो डलेल्या पायावर दीर्घकाळ उपचार करून घेऊ शकत नाही.

या उपचारा दरम्यान घोड्यांना कुत्र्याप्रमाणे ३ पायांवर चालताही येत नाही. त्यांचा सगळा भार पेलण्यासाठी त्यांचे चारही पाय शाबूत राहणं अतिशय गरजेचं असतं. अगदी लहानसहान दु खापतीच्या वेळी घोड्यांवर एका दिवसाकरता उपचार करता येतो, पण जेव्हा मोठी दु खापत असते तेव्हा त्यांना उपचार घेता येत नाही. कारण तज्ञांच्या मते घोडे दीर्घकाळाचा उपचार सहन करत नाहीत किंवा त्यांच्यात तो दीर्घ काळात उपचार स हन करण्याची ताकद नसते.

हे जरी असले तरी याचं दुसरं कारण दिलं जातं ते म्हणजे रेसच्या घोड्याची असलेली जटील शरीर रचना. रेसचा घोडा हा नक्कीच इतर घोड्यांपेक्षा वेगळा असतो. त्याच्या शरीरात २०५ हाडं असतात, त्यातली ८० ही पायाच्या भागात असतात. ही हाडे प्रचंड वेगाने धावण्यासाठी तयार झालेली आहेत. घोड्याचं जवळजवळ ५०० किलो वजन पेलण्याची जबाबदारी या हाडांवर असते.

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही हाडे वजनाने हलकी असतात. याच कारणाने जेव्हा घोड्याचा पाय मोडतो तेव्हा या हाडांना पुन्हा जोडणे कठीण होऊन बसते. घोड्याच्या बाबतीत या सर्व गोष्टी लक्षात घेता एकच पर्याय उरतो तो म्हणजे घोड्याचा मृ त्यू. होय बरोबर आहे मित्रांनो घोड्याचा मृ त्यू, कारण दुसरा कुठला पर्यायच शिल्लक राहत नाही. घोड्याला मा रण्याचा निर्णय घोड्याचा मालक घेत नसतो.

हा निर्णय पशुवै द्याचा असतो. या निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी खात्री केली जाते की घोडा कधीच बारा होऊ शकत नाही किंवा त्याच्या उपचाराला फार मोठा कालावधी लागणार आहे. एकदा का निर्णय पक्का झाला की लगेचच घोड्याचे प्रा ण घेतले जातात. मंडळी, हाच प्रकार भारतीय सै न्यात रिटायर्ड कुत्र्यांसोबत होतो. पण निवृत्त होणाऱ्या कुत्र्यांचा जी व घेण्यामागे एक वेगळं लॉजिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *