रावणाच्या पायाखाली असलेला हा माणूस कोण होता…का रावण त्यांच्या अंगावर पाय ठेवत होता…काय आहे यामागील रहस्य..जाणून आपले सुद्धा होश उडतील

धार्मिक

रावणाच्या सिंहासनावर त्याच्या पायाखाली असलेल्या या माणसाबद्दल अनेक कथा आहेत. या व्यक्तीच्या अस्तित्वाच्या आणि त्याच्या बंदिवान बनण्यामागे अनेक प्रकारच्या कथा प्रचलित आहेत. रामायणाशी सं बंधित अनेक कथा भारतात प्रचलित आहेत. रामायण ही एक अशी कहाणी आहे, जी प्रत्येकाला पहायला आवडते आणि प्रत्येक हिंदू कुटुंबात ती वाचली जाते.

गेल्या वर्षी को रोना वि षाणूमुळे लॉ कडाऊन झाला होता आणि याचकाळात रामानंद सागर यांची जुनी ‘रामायण’ मालिका टीव्हीवर प्रसारित झाली होती. या मालिकेने टीआरपीचे सर्व रे कॉर्ड तो डले होते. या व्यतिरिक्त लोकांना रामायणाशी सं बंधित कथा देखील ऐकायला आवडतात. भगवान राम तसेच रावणाबद्दलही अनेक कथा प्रचलित आहेत. जेव्हा जेव्हा आपण रामायण पाहिले असेल तेव्हा कदाचित आपणास ते लक्षात आले असेल किंवा नसेल.

पण रावणाच्या सिंहासनाच्या पायाजवळ एक माणूस असायचा. या व्यक्तीची त्वचा पूर्ण निळी आहे आणि तो खाली झोपलेला आहे. पण, आपण कधी विचार केला आहे का की, हा व्यक्ती कोण आहे, जो नेहमी रावणाच्या पायाखाली खाली दबलेला आहे? चला तर, जाणून घेऊया तो व्यक्ती कोण आहे आणि त्यामागची कथा काय आहे…रावणाच्या सिंहासनावर त्याच्या पायाखाली असलेल्या या माणसाबद्दल अनेक कथा आहेत.

या व्यक्तीच्या अस्तित्वाच्या आणि त्याच्या बंदिवान बनण्यामागे अनेक प्रकारच्या कथा प्रचलित आहेत. इंटरनेटवरील माहिती आणि बर्‍याच पंडितांच्या कथा वेगवेगळ्या गोष्टी प्रकट करतात. तथापि, बहुतेक अहवालांमध्ये असे दिसून आले आहे की, ही व्यक्ती नऊ ग्रह देवतांपैकी एक शनिदेव आहे. असे म्हणतात की, रामायणात रावणाच्या सिंहासनावर त्याच्या पायाखाली असणारी ही व्यक्ती म्हणजे खुद्द शनिदेव आहेत.

पौराणिक कथेनुसार म्हटले जाते की, रावणाने फक्त देवांना त्रा स दिला नाही, त्याने नवग्रहांनाही आपल्या मुठीत ठेवलं होतं. त्यांना डांबून तो त्यांना लंकेला घेऊन गेला होता. रावण खूप मोठा ज्योतिषी होता आणि त्याने नऊ ग्रह आपल्या ताब्यात घेतले होते. ज्योतिषशास्त्रात या 9 ग्रहांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि त्यांच्या स्थानाच्या आधारावर भविष्य वर्तवले जाते. असे म्हणतात की, रावणाने सर्व ग्रहांना आपल्या पायाजवळ बं दिस्त केले होते.

अशा परिस्थितीत रावणाने आपल्या पुत्रांच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती आपल्या नियंत्रणाखाली ठेवली. या 9 ग्रहांमध्ये निळ्या रंगाचे केवळ शनिदेव होते. रावण ज्योतिषविद्येत पारंगत होता. जेव्हा मेघनादचा जन्म होणार होता तेव्हा रावणाने सगळ्या ग्र हांना अशा घरांमध्ये बसवलं की होणारा मुलगा अजय, अमर होईल. पण शनिदेवांनी एक युक्ती केली, बरोबर मेघनादच्या जन्माच्या आधी एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश केला.

यामुळे झालं असं की, मेघनाद अजय आणि दीर्घायुषी होऊ शकला नाही. हे बघून रावण प्रचंड चि डला आणि त्याने शनीच्या पायावर गदा प्र हार केला. एवढं करूनही रावणाचा रा ग शांत झाला नाही. शनीचा अपमान करण्यासाठी आणि शनिदेवांच्या वक्रदृष्टीपासून लंकेला वाचविण्यासाठी रावणाने शनिदेवांचं तोंड खाली जमिनीकडे करून त्यांना सिंहासनासमोर टाकून दिलं. सिंहासनावर बसल्यावर पाय ठेवण्यासाठी रावण पालथ्या शनिदेवांचा उपयोग करत असे.

सिंहासनावरून उठताना, बसताना रावण शनिदेवांच्या अंगावर पाय ठेवून मुद्दाम त्यांना जोरात दाबत असे. शनिदेवाच्या मुक्तीची देखील एक कहाणी आहे. ती अशी की, जेव्हा हनुमान लंकेत गेले होते, तेव्हा त्याने लंका जा ळण्याच्या वेळी शनिदेवला रावणाच्या गु लामगिरीतून मुक्त केले होते. याआधी नारद मुनी यांनी रावणाला आपल्या शब्दात अ डकवून शनिदेवांना तु रूंगात हलवले होते.

परंतु, रावणाने शनिदेवाला तु रूंगात टाकली आणि तु रूंगाच्या दारावर शिवलिं ग अशा प्रकारे ठेवले की, शनिदेव त्यावर पाय न ठेवता पळूच शकत नाहीत. यानंतर हनुमानजी लंकेत आले आणि त्यांनी शनिदेव यांना आपल्या डोक्यावर बसवले आणि त्यांना मुक्त केले. शनिदेवांना आधीच असे वरदान मिळाले होते की, हनुमान त्यांना मुक्त करतील. बर्‍याच कथांमध्ये असेही म्हटले जाते की, रावणाने काल, मृ त्यू यांनादेखील वश केले होते.

हनुमानाने शनिदेवांना मुक्त केलं, यामुळे प्रसन्न झालेल्या शनिदेवांनी हनुमानाच्या भक्तांनाही आयुष्यातील त्रा सापासून दूर ठेवण्याचा आशिर्वाद दिला. या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. तसेच आजची माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *