राधेचा मृ’त्यू कसा झाला ? राधेच्या मृ’त्यू मागे नेमके काय कारण होते…श्री कृष्णची यामध्ये काही चूक होती का.. एकदा बघाच…

धार्मिक

जगात जेव्हा जेव्हा प्रेमाची चर्चा होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि देवी राधा यांचे प्रेम नेहमीच सर्वोच्च असेल. राधादेवीच्या या प्रेमाने जगाला हे ज्ञान दिले आहे की प्रेम हे कोणत्याही सा माजिक बंधनाने बांधलेले नसते. देवी राधाचा विवाह भगवान कृष्णाशी झाला नसेल, परंतु आजही त्यांची नावे एकत्र घेतली जातात. मंदिरांमध्ये त्यांच्या मूर्ती एकत्र ठेवल्या जातात, त्यांची एकत्र पूजा केली जाते.

राधा, राधिका, राधे अशा नावांनी प्रसिद्ध असलेलीही भारतीय पौराणिक साहित्यातील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. श्रीकृष्णाची सखी अशा संदर्भाने ती भारतीय संस्कृतीत प्रसिद्ध पावली आहे. त्याच जोडीने महालक्ष्मीचा एक अवतार म्हणूनही वैष्णव संप्रदायात तिला आदराचे स्थान आहे. वैष्णव संप्रदायाशी सं बंधित असल्याने प्रामुख्याने राधारानी अशा संबोधनाने ती पश्चिम बंगाल, मणिपूर, ओरिसा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली या प्रांतात विशेष पूजनीय आहे.

भारतीय संस्कृतीत निंबाक संप्रदाय आणि चैतन्य महाप्रभूंचा संप्रदाय यांच्याशी तिचा सं बं ध जोडलेला दिसतो. कालांतराने राधा ही लक्ष्मी किंवा अशा रूपात पूजनीय देवता म्हणून मान्यता पावली. राधा- कृष्ण प्रेम जगात अमर आहे इतक्या वर्षानंतर ही दोघांचे नाव एकत्र घेतले जाते. उत्कट आणि निस्वार्थी प्रेम म्हणून त्यांचे दाखले दिले जातात. आतूट प्रेम असूनही राधाकृष्णाचा विवाह होऊ शकला नव्हता.

त्यामुळे प्रत्येकाच्या मनात हे प्रश्न येतात ते कृष्ण वृंदावना मध्ये गेल्या देवी राधाचे काय झाले? पद्म पुराणानुसार राधा वृषभानू नावाच्या एका वैश्य गोप्याची कन्या होती. तिच्या आईचे नाव कीर्ती असे. तिचे नाव वृषभानू कुमारी पडले. राधाचे वडील वृषभानू बरसाना येथे वास्तव्यास होते. काही विद्वानांच्या मतानुसार राधाजीचा जन्म यमुनेच्या जवळ असलेल्या रावळ गावात झाला त्यानंतर तिचे वडील बरसाना येथे वास्तव्यास आले.

बहुतेकांचा विश्वास असे की राधाजींचा जन्म बरसाना येथे झाला होता. ब्रह्मवैवर्त पुराणातील प्रकृती खंडाच्या अध्याय 49 श्लोक 35, 36, 37, 40, 47 च्या अनुसार एका वेगळ्या नात्याने राधा श्रीकृष्णाची मामी पण होती. कारण त्यांचे लग्न कृष्णाची आई यशोदाचा भाऊ रायाणशी झाला होता. रायाणला रापाण किंवा अयानघोष या नावाने देखील ओळखतात.

पूर्व जन्मी राधाचा पती रायाण गोलोकात श्रीकृष्णाचा अंशभूत गोप होता. म्हणून गोलोकाच्या नात्याने राधा श्रीकृष्णाची सून असे. अशी आख्यायिका आहे की रायाण गोकुळात वास्तव्यास होते. त्याचा अर्थ असा की श्रीकृष्ण आणि राधाचं गत जन्मापासूनच नातं आहे. तसेच तिला लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. ब्रह्मवैवर्त पुराणाच्या ब्रह्माखंडातील 5 व्या अध्यायातील श्लोक 25 आणि 26 च्या अनुसार राधाला कृष्णाची मुलगी म्हणून सिद्ध केले आहे.

श्रीमद् भागवत आणि विष्णू पुराणानुसार कंसाच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी नंद आपल्या कुटुंब आणि आप्तेष्टांसह नांदगाव येथून वृंदावनास स्थायिक झाले. येथे बरसाणेचे लोकंही होते. असे मानले जाते की इथेच वृंदावनात श्रीकृष्ण आणि राधा एकाच घाटावर जोड्याने स्नान करीत असे. त्या वेळी श्रीकृष्ण 7 वर्षांचे होते आणि राधा ही 12 वर्षांची होती. त्यांच्याच वयोगटाच्या मुलांचा मोठा गोतावळा असे.

जो दिवसभर धुडगूस घालायचा. मुलांच्या या धुडगुसाला भक्तिकाळाच्या कवींनी प्रेमलीलेत रूपांतर केले आहे. वृंदावनातच श्रीकृष्ण आणि गोप्या लपंडाव खेळत होते. येथेच श्रीकृष्ण आणि त्यांचे सर्व बाळसखा मिळून होळी आणि सर्व सणांवर नृत्य करीत होते. 11 वर्षाच्या वयोगटात श्रीकृष्ण मथुरेला गेले होते आणि तेथेच त्यांनी कंसाचा व ध केला होता.

जेणे करून मगध आणि भारताचा सर्वात शक्तिशाली सम्राट त्यांचा जी वनाचा श त्रू बनला, कारण कंस त्यांचा जावई असे. त्यानंतर राधा आणि कृष्ण मिलनाचा उल्लेख कुठेच आढळत नाही. कृष्णाने वृंदावन सोडले तेव्हा राधाच्या आयुष्याला वेगळे वळण लागले. राधाचा विवाह यादवशी झाला. राधाने तिच्या वै वाहिक जी वनातील सर्व विधी पार पाडले.

परंतु तिचे मन अजूनही कृष्णाला समर्पित होते. राधाने पत्नी म्हणून तिची सर्व कर्तव्ये पार पाडली. दुसरीकडे श्रीकृष्णाने आपले दैवी कर्तव्य पार पाडले. असे म्हणतात की राधा आणि श्रीकृष्णाची शेवटची भेट द्वारकेत झाली होती. सर्व कर्तव्यापासून मुक्त झाल्यावर, राधा शेतीच्या वेळी आपल्या प्रियकर कृष्णाला भेटावयास गेली. ज्यावेळी ती द्वारकेला पोहोचली तेव्हा तिने कृष्णाचा राजवाडा आणि कृष्णाच्या 8 बायकांना बघितले.

कृष्ण राधेला बघून फार आनंदित झाले. राधाच्या विनवणीला मान देऊन त्यांनी राधाला आपल्या राजवाड्यात एक देविका म्हणून नियुक्त केले. असे म्हटले जाते की तिथेच राधा राजवाड्याशी निगडित काम बघत असायची आणि संधी मिळाली की श्रीकृष्णाला बघायची. एके दिवशी राधाने त्या राजवाड्यापासून लांब जाण्याचे ठरविले. असे म्हणतात की राधा एका अरण्य गावात राहू लागली.

वेळ सरता सरता राधा एकटी आणि दुर्बळ होऊ लागली. त्यावेळी त्यांना श्रीकृष्णाची आठवण येऊ लागली. शेवटच्या क्षणी श्रीकृष्ण तिच्या समोर आले. त्यांनी राधाला काहीही मागण्याचे सांगितले. पण राधाने नकार दिला. कृष्णाने तिला परत आग्रह केल्यावर तिने कृष्णाला बासरी वाजवायला सांगितले. श्रीकृष्ण मधुर सुरात बासरी वाजवू लागले. श्रीकृष्ण राधेसाठी दिवसरात्र बासरी वाजवीत असे. बासरीचे मधुर सूर ऐकतच राधाने आपल्या दे हाचा त्याग केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *