आज अरविंद आणि सपनाच्या लग्नाला वर्ष झालं. तिचे आई बाबा आज खूप आनंदात होते. वर्षभरापूर्वी झालेल्या सगळ्या घटनांची आठवण काढत ते निवांत गप्पा मारत बसले होते. मोठी मुलगी आंतरजातीय विवाह करून पळून गेल्याने धाकट्या मुलीचे लग्न कसे होईल? तिला सासर कसे मिळेल याची त्यांना चिंता होती, पण अरविंद आणि त्याच्या घरचे खूपच चांगले लोक होते.
त्यांनी तुमची मुलगी आमच्या घरी मुली सारखीच नांदेल असा विश्वास दिल्यामुळे ते आता थोडे शांत झाले होते. वर्ष भरात पोरीने आपण खूप आनंदात असल्याचे सांगितले असल्याने त्यांच्या सर्व चिं ता आता दूर झाल्या होत्या. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. एवढ्या राती कोण आले म्हणून घाबरूनच सपनाच्या वडिलांनी दरवाजा उघडला…
समोर विस्कटलेल्या केसांची, कपाळावर टेंगुळ असलेली काळ्यानिळ्या अनेक जखमा अंगभर असलेली, गळ्यावर नखांचे ओरखडे आणि ओठाच्या बाजूने र क्त वाहत हनुवटीपर्यंत आलेली सपना हातात एक मोती बॅग घेऊन उभी असलेली त्यांना दिसली. तीची केविलवाणी अवस्था कोणालाही बघवणारी नव्हती. तिला पाहताच तिच्या बाबांना घेरी आली. त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली, पण क्षण भरात त्यांनी स्वतःला सावरल आणि सपनाच्या हातातली बॅग घेऊन तिला आत घेऊन आले.
तिला सोफ्यावर बसवत आईला पाणी आणायची खुण त्यांनी केली. आईने लगेचच पाणी आणले आणि, तिच्या पाठीवरून हात फिरवू लागली. तिच्या मायेच्या स्पर्शाने ती शहारली आणि तिचा कंठ दाटून आला. ती आईच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी र डू लागली. तिची अवस्था बघून आई बाबा दोघांनाही भरून आले. तिला सावरत आईने तिच्या पाठीवरून हात फिरवला. तेवढ्यात ती जोरात किंचाळली.
आईने तिच्या पाठीकडे बघितले तर तिच्या पाठीवर पट्ट्याचे काळे निळे व ण उठलेले तिला दिसले. तिच्या अश्या अवस्थेचे तियाच्या आई बाबांना आश्चर्य देखील वाटत होते. कारण, गेल्या वर्षभरात तिने आपण किती आनंदात आहोत हेच सांगितले होते आपल्या पोरीला सासरी येवढा त्रा स स हन करावा लागत असेल याची त्यांना तिळमात्र देखील शंका कधी आली नाही.
सपना हुंदके देऊन सांगू लागली, तिचं अं ग अजूनही थरथरत होत. अरविंद अतिशय सं शयी आणि वि कृत स्वभावाचा निघाला. लग्नानंतर दोन महिने व्यवस्थित गेले. मला अगदी फुलाप्रमाणे संभाळल त्याने. त्यानंतर जेंव्हा आम्ही बाहेर फिरायला गेलो तेंव्हा त्याची खरी ओळख मला झाली, माझ्या दि रासोबत माझे शारी रीक सं बं ध आहेत असे सांगून तो मला हिणवू लागला. अरविंद फक्त रात्री पुरता माझ्याजवळ येतो.
रात्रभर मला हव तसा वापरून घ्यायचा. मी त्याला हवा तसा प्रतिसाद दिला नाही कि मला त्रा स द्यायचा. माझ्या अंगभर मला कसेही आणि कुठेही चा वायचा, सि गारेटचे च टके द्यायचा. त्यात त्याला आसुरी आनंद मिळत असे. मी कळवळून त्याला कितीही सांगितलं तरी ते तो ऐकत नसे. महिन्याचे ते पाच दिवस सोडले तर इतर दिवशी एखाद्या खेलाण्य्प्रमाणे तो माझ्याशी रात्रभर खेळत राहायचा.
माझं संपूर्ण अंग ओरबाडून आणि चा वून काढायचा. मी अनेकवेळा त्याला समजावत होते. पण त्याच्या डोळ्यातून मात्र खोटे अश्रू यायचे. तेवढ्या पुरते नाटक करून मला पश्चाताप झाल्याचे सांगायचा. चार दिवस गोड बोलून मला फसवायचा. माझी एखाद्या लहान मुलाप्रमाणे काळजी घ्यायचा. त्याला खरच पश्चाताप झाला आहे असे वाटून मी त्याला माफ करायचे.
त्यानंतर एक-दोन दिवस वाया गेले त्याच्या मते म्हणून, दुपारीच घरी येत असे. त्याची चार दिवसांची कसर भरून काढण्यासाठी, त्यानंतर मझी दुसऱ्या दिवशी उठण्याची देखील ता कत राहत नसे. माझे संपूर्ण श रीर आखडून जाई. माझी स हन शक्ती आता संपली आहे आई, आता देखील इकडे येताना त्याची भूक भागावूनच मी इकडे आले आहे. निघताना मला निर्लज्जासारखा विचारतो, उद्या माझी इच्छा झाली तर मी तिकडे येऊ कि तुला इकडे बोलावू?
सगळ्या गोष्टी सांगतला देखील तिचं अंग थरथरत होत. सराव ऐकून आईबाबांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या मुलीने आजवर एवढा त्रास स हन केला आणि आपल्याला त्याबद्दल काहीच सांगितला नाही याच त्यांना वाईट वाटत होत. सपनाचे वडील एका निर्धाराने उठले, त्यांनी सपना आणि तिच्या आईसोबत तडक पो लीस स्टेशन गाठल आणि अरविंद आणि त्याच्या घरच्यांच्या विरुद्ध तक्रार केली. आपल्या मुलीला त्या सै तानाच्या घर आता परत कधीच पाठवायचं नाही असा निर्धार केला.