‘या’ व्यक्तीच्या प्रेमात होत्या लता मंगेशकर…पण या दोन कारणांमुळे त्यांनी कधीच लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, भारताची गाण कोकिळा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लता मंगेशकर. पण त्यांचा आवाजच त्यांची ओळख आहे. लता मंगेशकर या लहानपणापासूनच गाणी गात होत्या. लता मंगेशकर यांनी तीस हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. छत्तीस भाषेमध्ये त्या गाणं गाऊ शकत होत्या आणि त्यांनी छत्तीस भाषेमध्ये गाणे गायले सुद्धा.

भारतरत्न लता मंगेशकर हे एक नाव नसून एक युग आहे, लता मंगेशकर यांचे जाणे म्हणजे एक युग संपल्यासारखे आहे. जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या लता मंगेशकर यांचे रविवारी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील रु ग्णालयात नि धन झाले. मागच्या 28 दिवसांपासून ब्रीच कँडी या रु ग्णालयात त्यांचे उपचार सुरू होते.

लता मंगेशकर यांचे पहिला नाव हेमा होते पण जेव्हा त्या 5 वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी हेमा नाव बदलून लता ठेवले. त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांना ही माहीत नसेल की हे नाव जगभरात इतके सुप्रसिद्ध होईल. लता मंगेशकर यांचे वडील गेल्यानंतर सगळ्या भावंडांमध्ये मोठ्या असल्याने दोन बहिणी आणि एक भाऊ यांची जबाबदारी त्यांच्यावर आली.

वयाच्या तेराव्या वर्षांपासून त्यांनी गाणी गायला सुरुवात केली. त्यांचे बालपण हे सांगलीत गेले आणि शिक्षण देखील तेथेच पूर्ण झाले. सण 1974 मध्ये दुनियेत सर्वात जास्त गाणी गाण्याचा रेकॉर्ड लता मंगेशकर यांच्या नावे होता आणि हा रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सामील झाला. लता मंगेशकर या पहिल्या महिला आहेत ज्यांना भारतरत्न आणि दादासाहेब फाळके हे पुरस्कार मिळाले.

लता दीदींच राहणीमान हे अत्यंत साधे होते, त्या नेहमी साडी मध्येच दिसत होत्या. त्यांना मेकअप अजिबात आवडत नव्हता. मात्र त्यांना डायमंड रिंगची आवड होती आणि फोटो काढायला सुद्धा त्यांना आवडत होते. सेटवर जाताना त्या नेहमी चप्पल बाहेर काढूनच जात असत आणि कोणतेही गाणे चप्पल न घालताच गात होत्या.

लता मंगेशकर यांनी जवळजवळ पाच पिढ्यांना आवाज दिला आहे. देशभरामध्ये त्यांच्या आवाजाचे चाहते आहेतच शिवाय जगभरात सुद्धा त्यांचे अनेक चाहते आहेत. एवढं नाव असूनही त्या मात्र अवि वाहितच राहिल्या आणि यामागचे नेमके कारण हे होते की एकेकाळी लता दिदी सुद्धा कोणाच्या तरी प्रेमात होत्या.

तत्कालीन डुंगरपूर संस्थानचे राजकुमार राजसिंह यांच्यावर लता दीदींच प्रेम होते. राजसिंह हे उत्तम क्रिकेटर होते. आणि त्यांच्या क्रिकेट प्रेमामुळे पुढे ते क्रिकेट नियामक मंडळातही गेले आणि बीसीसीआयचे अध्यक्ष झाले. काही कारणांनी त्यांचे लता मंगेशकर यांच्यासोबतचे प्रेम फुलले नाही.

राज आणि लता दीदी हे दोघे एकमेकांच्या प्रेमात इतके वेडे झाले होते की त्यांनी आजी वन अवि वाहित राहण्याचा निर्णय घेतला. आणि या गोष्टींबद्दल खुप कमी लोकांना माहीत आहे. राजसिंह हृदयनाथ मंगेशकरांचे खुप चांगले मित्र होते. मुंबईत असताना राजकुमार यांचे हृ दयनाथ यांच्या घरी येणं जाणं होतं.

त्यामुळे त्यांची लता मंगेशकरांशी ओळख झाली. पण राजसिंह यांच्या वडिलांना ही गोष्ट पसंत नव्हती आणि त्यांचा लग्नाला विरो ध होता. लता मंगेशकर या सामान्य घरातल्या होत्या आणि राजघरण्याबाहेरच्या सामान्य घराण्यातल्या मुलींशी लग्न करायला डुंगरपूर महाराजांचा विरो ध होता असे म्हणले जाते.

त्यांनी का लग्न केले नाही हे एक गूढच आहे पण राजसिंह डुंगरपूर यांनीही शेवटपर्यंत लग्न केले नाही. दोघांनीही कधीच उघडपणे आपलं असफल प्रेम व्यक्त केले नाही. आणि 2009 मध्ये राजसिंह डुंगरपूर यांचे नि धन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *