नमस्कार मित्रांनो, ग र्भावस्था हे एक सुंदर सौभाग्य आहे, निसर्गाने स्त्रीला दिलेली अनमोल भेट आहे. एखाद्या स्त्रीला आई होणं ही खुप महत्वाची गोष्ट असते. ती आपल्या मुलांसाठी कोणत्याही गोष्टींसाठी ल ढायला तयार असते. पण हे सौभाग्य सगळ्यांनाच प्राप्त होत नाही. अनेक स्त्रिया अशा आहेत ज्यांना मुलं होत नाहीत.
अनेक उपाय, ट्रीटमेंट केले तरीही त्यांच्या हाती अपयश येते. परंतु आज आपण अशा मंदिराबद्दल माहिती घेऊया जिथे महिला सं तानप्राप्तीची इच्छा घेऊन जातात. अस म्हणलं जात की सिमसा देवीच्या मंदिरात आपत्यहीन महिलांना बालसुखाचे आशिर्वाद मिळतात. या मंदिरात जर स्त्रिया झोपल्या तर त्या ग र्भवती होतात.
चला तर मग जाणून घेऊया या चमत्कारिक मंदिराबद्दल. हिमांचल प्रदेशातील प्रत्येक मंदिराचे खास महत्व आहे आणि वेगवेगळ्या मान्यताही आहेत. मंडिजीला मधील सिमस गावातील सिमसा देवीचे हे मंदिर आहे आणि ते संतदात्रीच्या नावाने प्रसिद्ध आहे. या देवीबद्दल लोकांची खुप आस्था आहे.
अशी मान्यता आहे की या मंदिरात स्त्रिया झोपल्या तर त्या ग र्भवती होतात. ही देवी स्वप्नात येऊन फळ वगैरे च्या मदतीने दाखवते की सं तान प्राप्ती होणार की नाही. हे मंदिर लोकांचे श्रद्धास्थान आहे, त्यामुळे अनेक जोडपी सिमसा देवीच्या मंदिरात वर्षभर सं तानप्राप्तीच्या इच्छेने येत असतात. भरपूर लोकांची ही इच्छा पूर्ण ही झाली आहे.
जर स्वप्नात सुकलेले लाकूड किंवा दगड आले तर त्यांना सं तान प्राप्ती होत नाही. ज्या स्त्रियांना मुलं नाहीत अशा महिला नवरात्रीमध्ये नऊ दिवस स्वप्नं येईपर्यंत त्या मंदिरात फरशीवर झोपत असतात. नवरात्रीमध्ये या सिमसा मंदिरात होणाऱ्या उत्सवाला स्थानीय भाषेत सलींद्रा म्हणलं जातं, सलींद्रा चा अर्थ स्वप्न असा होतो.
महिला येथे स्वप्न येऊपर्यंत दिवसरात्र झोपतात व अस म्हणलं जात की जर स्वप्नात फळ आले तर त्या महिलेला सं तान प्राप्तीचा आशिर्वाद मिळतो. आणि बहुतेकवेळा अस घडलं आहे की ज्या स्त्रीच्या स्वप्नात इतर फ़ळे, किंवा कंदमुळे अली तर त्यांना सं तान प्राप्ती झाली आहे.
अशी मान्यता आहे की देवी सिमसा होणाऱ्या बाळाचे लिं ग निश्चयाचे सुद्धा संकेत देते जस की एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात पेरू आले तर त्या स्त्रीला मुलगा होणार आणि जर भेंडी आली तर मुलगी होणार. जर एखाद्या स्त्रीला धातु, लाकूड किंवा दगडापासून बनलेल्या वस्तू स्वप्नात आल्या तर तिला सं तान प्राप्ती होणार नाही.
अस म्हणलं जात की ज्या स्त्रीला स्वप्न येते त्या स्त्रीला स्वप्न आल्यानंतर ते मंदीर लगेच सोडावे लागते आणि जर एखाद्या स्त्रीने स्वप्न येऊनही ते मंदिर सोडले नाही तर तिला शरीराला खाज सुटते व लाल फोड उठतात. त्यामुळे तिला ते मंदिर सोडून जावे लागते.
सिमसा मंदिर हे खुप प्रसिद्ध मंदिर आहे आणि येथे भारतातीलच नाही तर विदेशातूनही लोक येतात. या मंदिरात वर्षभर खुप गर्दी असते, विशेषतः नवरात्रीत खुप गर्दी असते. या मंदिरात एक दगड ही आहे ज्याला कितीही हलवलं तरी तो हालत नाही.
पण जर हाताच्या लहान बोटाने तो दगड हलवला तर तो हलतो या दगडाचे हलने हे एक शुभ संकेत मानले जाते. वर दिलेली माहिती व उपाय हे सा माजिक आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज लाइक, शे अर आणि फॉ लो करा.