या बैलाने मालका सोबत अस काही केलं ते पाहून आपण देखील..”मालकाची मुलगी ग’रोदर राहिली होती..” आणि हा बैल..

लाईफ स्टाईल

नमस्कार मंडळी, आज पर्यंत आपण पाळीव प्राणी आणि त्यांचे मालक यांच्यामधील ऋणानुबंधाच्या अनेक कथा किस्से ऐकले आणि पाहिले असतील आपल्या धन्यासाठी अतोनात कष्ट सोसण्याची आणि मेल्यानंतर सुद्धा आपल्या धन्याच्या कमी येण्याची इच्छा असणाऱ्या बैलाची कविता देखील आपण शाळेत शिकत आलो आहोत. आज आपणही अशीच एक घटना पाहणार आहोत.

आपण नेहमीच म्हणतो मीच का? याचे उत्तर ही या कथेमध्ये आहे. एखाद्या वस्तूचे किंवा समाजाचे राखण करायचा असेल तर काही लोकांना जागे रहावेच लागते. त्यात स माजाचे रक्षण होते. तस झाल नाही तर तो स माज नष्ट होण्यास वेळ लागत नाही, म्हणून काही लोकांना जाग रहावच लागतं, प्रामाणिक माणसांमुळे स माजाचे नेहमी भलेच होत असते असा बोध या गोष्टीतून होतो.

ही गोष्ट आहे रामू शेतकऱ्याची आणि त्याच्या लाडक्या ढवळ्या आणि पवळ्याची.रामू शेतकरी हा अतिशय सधन शेतकरी होता. आपल्या कुटुंबासोबत तो गावीच राहत असे, त्याच्या कुटुंबामध्ये सहा बैलजोड्या देखील होत्या. सोबत गायी, म्हशी आणि अनेक दुध-दुभती जनावरे होती. आपल्या साऱ्या कुटुंबासोबत तो अतिशय आनंदात आणि सुखात राहत असे.

त्याच्या सहा बैलजोड्याच्या मध्ये ढवळ्या आणि पवळ्या त्याची अतिशय लाडकी जोडी होती. हि जोडी दिसायला देखील अतिशय देखणी होती शिवाय काम देखील उत्तम करत असे. त्यामुळे रामू त्यांना आपल्या पोटच्या पोराची माया लावत असे. तसेच ढवळ्या आणि पवळ्या देखील आपल्या धन्यासाठी कीतीही कष्ट करावे लागले तरी मागे हटत नसत.

शुभ्र पांढऱ्या रंगाचे हे दोन बैल त्यांच्या कमानदार शिंगांनी अजूनच शोभून दिसत असत. कामासाठी देखील ते वाघ होते, शेतात काही काम करायचे असूदे, किंवा गाडीला जुंपून ओझे वाहून न्यायचे असु दे कोणतेही काम ते सराईतपणे करत असत. म्हणूनच रामूचे ते लाडके होते. एकेदिवशी शेतातली कामे आवरून रामू आराम करत होता ढवळ्या- पवळ्या देखील निवांत चारा खात बसले होते.

आणि त्याच्या मुलाचा जो काही दिवसांपूर्वीच काही कामासाठी शहरात गेला होता त्याने फोन करून आपल्याला न्यायला स्टेशनवर यायला सांगितले. रामूने अर्थातच आपल्या लाडक्या बैलजोडीला गाडीला जुंपले आणि तो आपल्या पोराला घ्यायला स्टेशनवर गेला. काही मैलांचं अंतर त्याच्या लाडक्या बैलानी काही तासातच पार केले आणि सगळी मंडळी रात्री सुखरूप घरी पोचली.

जेवण करून रात्री सगळे झोपले असताना रामूच्या मुलीच्या पोटात दुखू लागले जी बा ळंतपणा साठी म्हणून काही दिवसांपूर्वी रामू कडे आली होती. रात्रीची वेळ असल्याने सार्वजन घाबरून गेले. तिला शहरातल्या मोठ्या द वाखान्यात नेण्याशिवाय काही पर्याय नव्हता, म्हणून रामूने लगेचच आपल्या गड्यांना सांगून आपल्या लाडक्या ढवळ्या पवळ्याला गाडीला जुंपायला सांगितले.

दिवसभर त्यांनी खूप कष्ट केले होते तरी आता या वेळी वेगाने पळण्यासाठी त्यांच्याशिवाय कोणीच नव्हत. म्हणूनच त्यांना गाडीला जुंपून रामूच्या मुलीला शहरात नेण्यात आले. आपल्या मालकाच्या विश्वासाला खरे उतरत दोघांनी शक्य तेवढ्या वेगाने पळत त्यांनी वेळेत त्याच्या मुलीला द वाखान्यात नेले. द वाखान्याबाहेर ढवळ्या आणि पवळ्या उभे असताना पवळ्याने ढवळ्याला विचारले,”काय रे आपल्या मालकाकडे सहा बैलजोड्या आहेत.

सगळेच आपल्यासारखे सरस आणि सुंदर तरी देखील आपला धनी शेतात आपल्यालाच राबवतो, स्तेशांवरून मुलाला आणायला आपणच असतो आणि आता रात्री आपल्या मुलीला द वाखान्यात नेण्यासाठी सुद्धा आपणच ..असे का?आपल्यालाच का नेहमी एवढे कष्ट का करावे लागतात?”

ढवळ्या काही बोलणार तेवढ्यात रामू बाहेर येऊन आपल्या बैलांना मिठी मारून म्हणाला गड्यानो आज तुम्ही होतात म्हणून माझी पोर वाचली. आपल्याला थोडा जरी उशीर झाला असता तरी तीचा आणि तिच्या बाळाचा जी व धोक्यात आला असता. तुमच्यामुळे आज सगळ काही ठीक आहे. आपल्याला नातू झाला, तुमच्या उपकाराची उतराई मी कधीच होऊ शकत नाही. असे म्हणून रामू डोळे पुसू लागला. आपल्या मालकाची कृतज्ञता पाहून ढवळ्या आणि पवळ्या दोघानाही भरून आले. पवळ्याला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता मिळाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *