मंडळी आपल्याला प्रभू श्रीरामाचे निस्सीम भक्त, ब लशाली, पवनपुत्र हनुमान यांच्या अनेक कथा ऐकायला मिळत असतात. रामायणा मध्ये तर रामसेतू उभारण्यापासून ते सीता मातेचा शोध, लंकाद हन संजीवनी बुटी साठी द्रोणागिरी उचलून आणण्यापर्यंत चे अनेक पराक्रम आपण जाणतोच. तसेच पवनपुत्र हे बलशाली असून बुद्धिमा न देखील होते.
पण त्यांनी त्यांच्या पराक्रमाचा कधीच गर्व केला नाही. त्यामुळेच प्रभू रामांच्या प्रिय भक्तांमध्ये हनुमंत सर्वात वरचा क्रमांक पटकावतात. रामायण संपल्यानंतर देखील प्रभूनी जेव्हा आपला रामावतार समाप्त केला तेव्हा त्यांनी हनुमंताला अमरतत्व बहाल केल आणि त्यांच्या प्रिय भक्तांच्या र क्षणाची जबाबदारी हनुमानावर सोपवली.
आणि त्रेतायुग संपून द्वापरयुग सुरु झाले तेव्हा श्रीविष्णूनी कृष्ण अवतार धरण केला आणि महाभारत काळामध्ये सुद्धा हनुमानजींचा असलेला उल्लेख आपल्याला माहित आहे तो म्हणजे बलशाली भीम याच्या गर्व हरणाचा, आज आपण अजून एका गर्व हरणाची कथा ऐकणार आहोत. हे गर्वहरण आहे प्रत्यक्ष कृष्ण पत्नी सत्यभामा, सुदर्शन चक्र व गरुड यांचे, होय चला तर मग जाणून घेऊया
आपल्याला माहित असेल कि श्रीकृष्णाच्या आठ पत्नी होत्या त्यामध्ये रुक्मिणी, जाम्बवती, सत्यभामा, कालिंदी, मित्र्बिंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा पण यापैकी सत्यभामा हिला आपले सौंदर्य आणि महाराणी पद याचा गर्व होऊ लागला. तर दुसरीकडे सुदर्शन चक्र स्वतःला सर्वात शक्तीमा न समजत होते. तसेच विष्णूचे वाहन गरुड याला देखील आपण सर्वात वेगाने उडतो याचा गर्व झाला होता.
पण एके दिवशी कृष्ण द्वारका नगरीमध्ये राणी सत्यभामा सोबत सिंहासनावर बसले होते. तेव्हा त्यांच्या जवळच गरुड आणि सुदर्शनचक्र सुद्धा आसनस्थ होते. गप्पा गोष्टी, हास्य विनोद चालू असतानाच सत्यभामा राणीने उपहासाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला कि हे प्रभू आपण त्रेता युगामध्ये राम अवतार धारण केला होता तेंव्हा माता सीता आपली पत्नी होती.
मला सांगा की सीता खरंच माझ्याहून सुंदर दिसत होती का? भगवान सत्यभामेच्या प्रश्नाचे उत्तर देणारच तेवढ्यात गरुड विचारू लागले “हे भगवन, माझ्याहून वेगाने उडू शकेल असा कोणी आहे का? या दोघांचे प्रश्न ऐकून सुदर्शन चक्राला पण राहवले नाही त्याने सुद्धा प्रभुना हात जोडून विचारणा केली,”हे प्रभू मी तुम्हाला मोठमोठ्या यु द्धांमध्ये तुम्हाला विजयश्री मिळून देण्यास मदत केली आहे हे तर आपल्याला माहित आहेच.
तर माझ्याहून जास्त श क्तिशाली असा कोणी आहे का ? आता या तिघानाही आपल्या अस्तित्त्वाचा गर्व झाला आहे हे प्रभूंच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही. भगवान मं द स्मित करत विचार करू लागले कि यांच गर्वहरण कस करता येईल. तेव्हाच त्यांना एक युक्ती सुचली आणि भगवंतांच्या लक्षात आल कि यांच्या गर्वाचा ना श करण्याची वेळ आता आलेली आहे.
असा विचार करून त्यांनी गरुडाला आपल्या जवळ बोलून घेतले व सांगितले कि, गरुडा! तू बजरंगबली हनुमानाकडे जा आणि त्याला संग कि हे हनुमंत, प्रभुराम माता सीतेसह महालामध्ये तुझी प्रतीक्षा करत आहेत. गरुड प्रभूंची अज्ञा घेऊन हनुमानकडे जाऊ लागले. इकडे कृष्णाने सत्यभामा देवीनं माता सीतेच्या रुपात तयार होऊन बसण्यास सांगितले. आणि स्वतः राम अवतार धारण करून महालात बसले.
तेव्हाच सुदर्शन चक्राला सांगितले कि,”तू महालाच्या बाहेर पहारा दे आणि माझ्या परवानगी शिवाय कोणालाही आतमध्ये सोडू नकोस. “प्रभूंची अज्ञा ऐकून सुदर्शन चक्र महालाबाहेर पहारा देऊ लागले. तर इकडे गरुड हनुमानकडे जाऊन त्यांना प्रभूंचा नि रोप देऊ लागले,”हे वानरश्रेष्ठ! भगवान राम माता सीतेसह महाला मध्ये आपली वाट पाहत आहेत. तरी आपण त्वरित माझ्यासोबत द्वारीकेमध्ये चलावे.
मी तुम्हाला माझ्या पाठीवरून लगेचच तिथे पोहोचवेन.”हनुमान अतिशय विनम्रपणे गरुडाला म्हणाले कि,”बंधू आपण चला मी येतोच.”गरुडाने विचार केला हनुमानजी तर आता खूप थकले आहेत. माहित नाही हे कधी द्वारिकेत पोचतील. मी तर माझे काम पूर्ण केले, मला काय ते कधीही येवोत असे म्हणून गरुड तेथून निघाले, आणि श्रीकृष्णाच्या महालात पोचले.
तेथे जाताच त्यांना धक्का बसला कारण ते तेथे पोहचण्यासाठी आधीच हनुमंत तेथे हजर होते. ते रामरूपातील कृष्णासमोर बसले होते. गरुड लज्जित होऊन उभे राहिले. तेव्हा कृष्णाने हनुमंताला विचारले, हे हनुमंत तुला माझ्या महालात येण्यापासून कोणी अडवले नाही का? तेव्हा हनुमंत हात जोडून कृष्णाला म्हणाला, हे प्रभू,” तुम्हाला भेटण्यापासून मला अडवू शकेल असा कोणी आहे का? पण या सुदर्शन चक्राने तसा करण्याचा प्रयत्न केला होता, असे म्हणून त्यांनी आपले तोंड उघडले.
आणि आतले सुदर्शनचक्र बाहेर काढले. मी याला माझ्या तोंडात बंद केले व आपल्याला भेटण्यास आलो.”शेवटी आपले हात जोडून हनुमानाने प्रश्न केला कि हे प्रभू! मी आपल्याला ओळखतो आपण कृष्ण अवतारातील माझे प्रभू रामचंद्रच आहात, पण आज आपण आपल्या सिंहासनावर माता सीतेच्या जागी या कोणत्या दासीला स्थान दिले आहे? हे वाचन ऐकून सत्यभामेचा अ हंकार गळून पडला होता. सत्यभामा, गरुड आणि सुदर्शन चक्र तिघांना आपल्या चु कीची जाणीव झाली होती.