आपल्याला माहित आहे कि भारत देशात ठिकठिकाणी शेकडो मंदिरे आहेत. आणि या मंदिरांमधील देवतांचे कोट्यवधी भाविक पूजन, भजन करत असतात. ध र्म आणि संस्कृतीशी जोडलेल्या अनेक मान्यता या देशात आहेत आणि कोट्यवधी लोकांची त्यावर श्रद्धाही आहे. आणि आपल्याकडे चार युग मा नली गेली आहे. त्यातील चौथे आणि शेवटचे युग म्हणजे कलियुग सुरू आहे. हजारो वर्षांनंतर युग बदलतात. कलियुगाच्या समाप्तीनंतर पृथ्वीचा अं त होणार असेही म्हटले जाते.
कलियुग कधी सं पणार याबाबत भुवनेश्वरी गुहेत काही रहस्य दडलेली आहेत. भुवनेश्वरी हे एकमेव स्थान आहे, जिथे चारही धाम एकत्र वसलेले आहेत. या पवित्र गुहेचे ऐतिहासिक महत्त्वही अधोरेखित करण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे हिं दू ध र्मातील ३३ कोटी देवता येथे एकत्र वास करत असल्याचे सांगितले जाते. जाणून घेऊया या गुहेविषयी आणि त्याच्या कलियुगाशी असलेल्या सं बंधाविषयी…
भारत हा देश पौराणिक कथा, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन संस्कृती, पुरोगामी विचार यांसह विविधतेत एकता असलेला देश आहे. हिं दू ध र्म आणि संस्कृती यांना भारतात खूप महत्त्व आहे. उत्तराखंडामधील कुमाऊं हिमालयात असलेल्या अल्मोडा शहरापासून १६० कि.मी. अंतरावर अनेक पर्वतरांगा आहेत. यामधील गंगोलीहाट पर्वतरागांमधील एका पर्वतावर पाताल भुवनेश्वर नावाची गुहा आहे.
या गु हेच्या चारही बाजूला देवदाराचे घनदाट जंगल आहे. या परिसरात अनेक गुहा असल्याचे आढळून येते. यापैकी एका गुहेत भगवान महारुद्र महादेवाचे मंदिर आहे. आदि गुरू शंकराचार्य प्रथम या स्थानी आले होते, असे सांगितले जाते. पौराणिक संदर्भानुसार, त्रेतायुगातील राजा ऋतुपर्ण याने प्रथम ही गुहा पाहिली होती. तो त्या ठिकाणी गेल्याचे दाखले पुराणात मिळतात.
द्वापार युगात भगवान शंकर आणि पांडवांनी येथे चौपाड नामक खेळ खेळला असल्याची मान्यता आहे. तर कलियुगात जगत् गुरू शंकराचार्यांना इ.स.पूर्व ७२२ च्या दरम्यान या गुहेबद्दल साक्षात्कार झाला. येथे येऊन त्यांनी तांब्याचे शिवलिं ग स्थापन केले, असे सांगितले जाते. आज पाताळ भुवनेश्वर हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू झाले आहे.
हिं दू ध र्मात गणेशाला प्रथमेश मा नले जाते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना प्रथम गणपतीचे पूजन केले जाते. गणेश ज न्माच्या कथा आपण ऐकतो. भगवान शंकराने क्रोधीत होऊन गणपतीचे म स्तक ध डापासून वेगळे केले होते. यानंतर माता पार्वतीच्या आग्रहावरून शंकराने गणपतीला हत्तीचे मस्तक लावले, अशी कथा सांगितली जाते.
धडापासून वेगळे केलेले गणपतीचे मूळ म स्तक शिवशंकरांनी या पाताल भुवनेश्वर गुहेत ठेवले होते, अशी कथा रूढ आहे. पाताळ भुवनेश्वर या गुहेत चारही युगांचे म्हणजेच कृत, द्वापार, त्रेता आणि कलियुगाचे प्रतिक म्हणून चार दगड आहेत. यातील कलियुगाचा प्रतिक असणारा दगड हळूहळू वर सरकत आहे. हा दगड ज्यावेळी भिंतीला स्पर्श करेल, तेव्हा कलियुगाचा अ स्त होईल, अशी मान्यता आहे.
केवळ भारतातील नाही, तर देश-विदेशातील अनेक पर्यटक या गुहेला भेट देण्यासाठी येत असतात. काही भाविक श्रद्धा म्हणून येथील मंदिरात दर्शनासाठी येतात. गुहेमध्ये असे ठिकाण आहे, जेथे महादेवाने श्रीगणेशाचे कापलेले शी र ठेवले आहे. संपूर्ण जगात हे एकमेव असे ठिकाण आहे, जेथे श्रीगणेशाची शी र नसलेली मूर्ती आहे. गणेश मूर्तीच्या ठीक वर १०८ पाकळ्यांचे ब्रह्मकमळ असून यातून पाणी टपकत राहते.
गुहेमध्ये नागाच्या आकृतीची एक मोठी शिळा आहे. असे मा नले जाते की, राजा परीक्षितला मिळालेल्या शा पातून मुक्ती देण्यासाठी त्यांचा मुलगा ज न्मेजयने याच कुंडात सर्व नागांना जा ळून भस्म केले होते. परंतु तक्षक नाग यातून वाचला आणि या नागाने परीक्षित राजाला य मसदनी पाठवले. गुहेमध्ये पुढे गेल्यानंतर ऐरावत हत्तीची दगडात कोरलेली आकृती दिसते.
पांडवांनी याच गुहेत तपश्चर्या केली होती. गुहेत काळभैरवाचे सुद्धा दर्शन होते. असे मा नले जाते की, जो व्यक्ती काळभैरवाच्या मुखातून ग र्भात प्रवेश करून शेपटीपर्यंत पोहोचतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. जवळच ब्रह्मा, विष्णू आणि महेश तसेच महेश्वर यांच्या मूर्ती आहेत. गुहेच्या छतामधून गायीच्या एक थानची आकृती दिसते. यालाच कामधेनु गायीचा स्त न म्हटले जाते.
अतिशय पवित्र मा नल्या गेलेल्या चार धामांचे सुलभ दर्शन या पाताळ भुवनेश्वर या गुहेत होते, असे म्हणतात. या गुहेत केदारनाथ, बद्रीनाथ आणि अमरनाथाचे दर्शन होते, असे सांगितले जाते. यात यम, कुबेर, वरुण, लक्ष्मी, गणेश आणि गरुड यांचा समावेश आहे. तक्षक नागाची आकृती येथील एका मोठ्या दगडावर असलेली पाहायला मिळते. अशा अनेक विस्मयकारक चमत्कृती असणारी ही गुहा आहे.