मंडळी आपले शरीर स्वस्थ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्या शरीराला योग्य पोषण आणि मुबलक आहार मिळणे खूप गरजेचे असते हे आपल्याला माहितच आहे. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात आपण पिष्टमय पदार्थ, क्षार, प्रथिने, कार्बोदके आणि वेगवेगळ्या जी वनसत्वांचा समावेश असणारा आहार घेणे खूप गरजेचे असते.
यातील कोणत्याही पदार्थाचे संतुलन जर बि घडले तर आपल्या शरीराचे संतुलन सुद्धा बि घडू शकते म्हणूनच आपला आहार हा नेहमी संतुलित असला पाहिजे. आपल्या शरीरात विटामिन बी १२ हे खूप गरजेचे आहे. हे जी वनसत्व शरीरासाठी खूपच आवश्यक मानले जाते. पण भारतीय आहारामध्ये याचे प्रमाण कमी असल्याने अनेक भारतीय लोकांना त्याच्या क मतरतेमुळे उद्भवणाऱ्या स मस्यांना सामोरे जावे लागते.
जसे की, कोड रो ग आणि ही एक दीर्घकालीन त्वचेची स्थिती असून त्वचेचे ठिपक्यांचे रंग द्रव्यात रूपांतरित होतात. जगभरात १% लोकांना हा त्वचेचा त्रा स असू शकतो. काही लोकांत तर २% पेक्षा अधिक प्रमाणात जाणवून येतो.
कोड हा असा आ जार आहे ज्याला सोपा इलाज नाही. परंतु आरंभीच्या अवस्थेमध्ये निदान आणि उपचार झाल्यास हा रो ग कमी करता येऊ शकतो आणि तो पसरण्यावर नियंत्रण आणता येतं. हा रो ग सं सर्गजन्य नाही आणि प्रा णघा तकही नाही.
मानवाच्या त्वचेतील मेलॅनिन पेशी किंवा रंग निर्माण करणा-या पेशी योग्य प्रकारे कार्यरत नसतात तेव्हा कोड नावाचा रो ग होतो. आरंभीच्या अव स्थेमध्ये फिक्कट रंगाचे ते दुधी पांढ-या रंगाचे भाग दिसू लागतात, जे हळूहळू आकाराने वाढत जातात किंवा शरीराच्या दुस-या भागात दिसू लागतात. त्यामुळे शरीराच्या त्वचेवर परिणाम होतो. तसाच परिणाम टाळू, ओठ आणि ज ननेंद्रि यांवर दिसून येऊ शकतो.
विटामिन बी १२चे महत्व:- लाल र क्त केशिकांच्या म्हणजेच लाल र क्त पेशींच्या निर्मिती साठी विटामिन बी १२ जरुरीचे असते. याच्या क मतरतेमुळे शरीरात र क्ताची कमी भासू लागते परिणामी अनिमिया सारख्या आ जाराचा सा मना करावा लागू शकतो.
- शरीरातील मज्जासंस्थेच्या कामात सुसूत्रता राहावी अस्थी सुद्धा विटामिन बी १२ मदत करत असते. ज्यामुळे अचानक होणारे ब्रेन हॅम्रेज सारखे आ जार रोखण्यास यश मिळते.
- शरीरात फोलिक अ सिड सारखे वि षारी घटक विरघळू न देण्याचे काम सुद्धा हे विटामिन करत असते.
- हृदयरो गाचा धो का कमी होण्यास सुद्धा मदत होते.
- कर्करो ग आणि अल्झायमर सारखे आ जार होऊ नयेत यासाठी सुद्धा विटामिन उपयुक्त ठरते.
- या विटामिन मुळे संपूर्ण शरीराला उर्जा मिळते आणि वृद्धत्वापासून दूर राहण्यास हे विटामिन मदत करत असते.
- रो ग प्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये सुद्धा या विटामिनचा खूप मोठा वाटा आहे असे म्हणावे लागेल. त्यामुळेच त्याला ‘anti -stress विटामिन’असे म्हणले जाते.
विटामिन बी १२ च्या क मतरतेमुळे काय होते:- ऍ नेमिया: हजार लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीला होणारा हा रो ग असला तरी भारतामध्ये याचे प्रमाण जास्त मानले जाते. योग्य पोषण आहार न घेणे हे या आ जाराचे मुख्य कारण मानले जात असले तरी आहारात विटामिन बी १२ चा समावेश नसणे हे याचे मुख्य कारण मानले जाते. ज्या व्यक्ती पूर्ण शाकाहारी असतात, त्यांच्या मध्ये मुखत्वे विटामिन बी १२ ची कमी असल्याचे सांगितले जाते.
ज्या व्यक्ती दुध आणि दु ग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करतात त्यांना सुद्धा या विटामिनच्या कमीला सामोरे जावे लागते. तसेच ज्या व्यक्ती, आ म्लपित्ताच्या त्रा साने ग्र स्त आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा विटामिन बी १२ ची कमी असते. पचन शक्ती क मजोर असणे किंवा पोटाच्या व्याधी असणे यामुळे सुद्धा विटामिन बी १२ ची स मस्या निर्माण होऊ शकते.
विटामिन बी १२ ची क मतरता आहे हे कसे ओळखाल?
- क मजोरी, खूप थकवा येणे.
- आळस येणे
- उत्साह नसणे
- र क्ताची कमी
- पचनशक्ती क मजोर असणे
- भूक कमी लागणे.
- प्रचंड डोकेदु खी
- हात-पायात मुंग्या येणे.
- डोळ्यांना कमी दिसणे.
विटामिन बी १२ ची क मतरता भरून काढण्यासाठी काय करावे?:- आपल्या आहारात दुध, मीठ, मटन, मासे यांचा समावेश प्रामुख्याने करा. दुध, दही, पनीर, चीज यांच्या सेवनाने सुद्धा विटामिन बी १२ ची क मतरता भरून काढता येते. त्याच बरोबर सुका मेवा, फळे, भाज्या यांचा समावेश सुद्धा अवश्य करावा. ग रोदर स्त्रीयाच्या मध्ये विटामिन बी १२ च्या क मतरतेमुळे अनेमिया होण्याचे प्रमाण अधिक असते तेव्हा त्यांनी आपल्या आहारात वरील गोष्टींचा समावेश प्रमुखाने करावा.