या एका कारणामुळें बोमन इराणी आणि त्याच्या पत्नीला…सुधीर जोशी याच्या घरी ते हिंदू धर्माचें नसताना सुद्धा बसावे लागले होते सत्य नारायणच्या पूजेला

बॉलीवूड

आपल्याला माहित आहे कि आजच्या जगात मैत्रीला किती किंमत आहे, आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे मैत्री असते असे म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, प्रत्येक व्यक्तिला सर्वात जवळचा असा कोणी वाटत असेल तर तो म्हणजे त्याचा मित्र. मित्राशिवाय म नातल्या भावनांना दुसरं कोणी समजून घेईल का? जरी कोणी समजून घेतलं तरी त्या व्यक्तीला ही मित्रच व्हावं लागतं.

आणि अशीच अतूट मैत्री आपल्याला कलाविश्वात अनेकदा पाहायला मिळाली आहे. अनपेक्षितपणे समोर आलेली एखादी व्यक्ती आपल्या जी वनात किती महत्वाची होऊन जाते हे आपल्याला सुद्धा कळत नाही. आणि अशाच आदरयुक्त आणि एका वेगळ्याच नात्याची प्रचिती अभिनेते बोमन इराणी यांनाही आली. आणि त्याचं हे मैत्रीची नातं आपल्या मराठी सिने सृष्टीतील दिगग्ज अभिनेते सुधीर जोशी याच्या सोबत होते.

आपल्या अभिनयाच्या ब ळावर कलाविश्वात मा नाचं स्थान निर्माण करणाऱ्या सुधीर जोशी यांच्यासोबत काम करण्यासोबतचा अऩुभव शेअर केला. सुधीर जोशी यांच्यासोबत काम करणं म्हणजे कोणा एका महाविद्यालयात काम करणंच जणू, अशा शब्दांत त्यांनी या नात्याचा उलगडा केला.

आणि अशाच एका मुलाखतीमध्ये, त्यावेळी त्यांनी हा किस्सा सांगितला, कि कशा प्रकारे सुधीर जोशी याच्या घरात मला पूजेला बसायला लागले होते. आपल्याला माहित असेल कि जर आपल्या घरात कोणती पूजा वैगेरे करत असेल तर त्या घरातील एखादी जोडी पूजेला बसते, आणि अशीच एक पूजा अभिनेते सुधीर जोशी याच्या घरात आयोजित केली होती.

पण आपणास कदाचित माहित असेल कि सुधीर जोशी याना मुलबाळ नाहीत, आणि अशावेळी त्याच्या समोर प्रश्न पडला कि आपल्या घरी पूजा तरी आयोजित केली आहे पण पूजेला बसावयाचे कोणाला, आणि हाच विचार करत असताना त्याच्या डोक्यात बोमन इराणी याचे नाव आले, आणि त्यांनी लगेच बोमन इराणी याना फोन लावला.

आणि त्यांना सरळ सांगितले कि उद्या माझा घरी पूजा आहे आणि तुला आणि तुझ्या पत्नीला पूजेला बसायचे आहे, तेव्हा बोमन इराणी सुद्धा अवाक झाले, त्यांना वाटले कि सुधीर जोशी यांनी आपली मुद्दाम मजा तरी केली नसेल ना? हा विचार करून बोमन इराणी यांनी पुन्हा सुधीर जोशी याना फोन करून विचारले. तेव्हा सुधीर जोशी यांनी सुद्धा अगदी मजेत उत्तर दिले तुला एकदा संगीतलेली गोष्ट कळत नाही का?

त्या वेळी बोमन इराणी याच्या म नात सुद्धा अनेक प्रश्न आले, अरे आपली तसेच आपल्या पत्नीची जात वेगळी आहे, तरी सुद्धा हा माणूस आपल्याला कसं काय पूजेला बसण्यास सांगत आहे, पण त्यांनी दिलेले हे आमंत्रण मोठ्या म नाने स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी शुटींग असताना सुद्धा सर्व कार्यक्रम रद्द करून ते अगदी मराठी थाटात सुधीर जोशी याच्या घरी पोहचले.

ते म्हणाले कि जोशींच्या घरी पूजेसाठी बसणं हे अतिशय भाग्याचं होतं, असं म्हणत आपल्याला त्यांनी कुटुंबातील व्यक्तीचाच दर्जा दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. बोमन इराणी हे सुधीर जोशींना त्यांच्या मुलाप्रमाणंच होते. असं हे नातं अनपेक्षितपणे सर्वांसमोर आलं आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही एक वेगळंच स्मित उमटलं.

ही आठवण सांगताना ते काहीसे भावुकही झाले. तसेच ‘आय एम नॉ ट बाजीराव’ या नाटकाच्या प्रयोगावेळी जेव्हा ते विंगेत आले होते तेव्हा त्यांनी आपल्याया सॅ ल्यूट केला होता, तसेच त्यांनी मला आपला मुलगा समजून पूजेचा मा न दिला होता ही आठवण सांगताना एका मोठ्या महान मराठी कलाकाराची महानता बोमन इराणी यांनी सर्वांसमोर ठेवली.

एका कलाकारानं दुसऱ्या कलाकाराला दिलेला हा मा न शब्दांतही व्यक्त करणं त्यांना थोडं कठीणंच जात होत, तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.