मराठी सिनेसृष्टीतील विनोदाचा बादशहा म्हंटले की अशोक सराफ यांचेच नाव आपल्या डोळ्यासमोर येते. त्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि विनोदी शैलीने मराठीतील अनेक चित्रपट गाजवले. जवळ जवळ तीस वर्षे त्यांनी प्रेक्षकांच्या म नावर राज्य केलं. त्यांचे ” नवरी मिळे नवऱ्याला”, “गंमत जंमत”, “अशी ही बनवाबनवी,” “एक डाव भु ताचा”, “भुताचा भाऊ”, “आमच्या सारखे आम्हीच”, “नवरा माझा नवसाचा”, “एका पेक्षा एक”, “अफलातून ” अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांना पोट धरून खळखळून हसवले.
आणि हे चित्रपट त्यांनी अजराम र केले. आजही लोक त्यांचे चित्रपट न चु कता आणि अत्यंत आवडीने पाहतात. अशोक सराफ यांची शा रीरिक बोलीभाषा इतकी सहज आणि विनोदी आहे कि त्यांनी एकाधे साधे वाक्य जरी बोलले तरी त्याचे हसू येते आणि म्हणूनच विनोदाचा बादशहा अशी त्यांची मराठी चित्रपट जगतात ख्याती आहे.
अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत देखील नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला.अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे . “चोर पे मोर”, “दामाद”, ” बडे घर की बेटी”,” करण”,” आ गले लग जा”, अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. त्यांना बॉलीवूड मधील मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
पण त्यांना हव्या असलेल्या आणि त्यांच्या म नाप्रमाणे भूमिका त्यांना मिळाल्या नाहीत. पण त्यांनी प्रयत्न चालूच ठेवले. बॉलीवूड मध्ये नेहमी मराठी कलाकारांना दुय्यम दर्जा का दिला जातो, या मागचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. बॉलीवूड मध्ये मराठी कलाकारांना नेहमी नोकरांच्या आणि दुय्यम भूमिका का दिल्या जातात? यामागचे कारण अशोक सराफ यांनी स्पष्ट केलं आहे.
काय आहे यामागचं कारण:- सह्याद्री वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अशोक सराफ यांनी त्यांच्या करियर मध्ये त्यांना आलेले अनुभव शेअर केले आणि यावेळी बोलताना त्यांनी मराठी कलाकारांना बॉलीवूड मध्ये दुय्यम आणि नोकरांचे रोल का दिले जातात याचे खरे कारण त्यांनी सांगितले.
याबद्दल बोलताना अशोक सराफ म्हणाले,” मराठी एक अत्यंत प्रयोगशील मनोरंजनसृष्टी आहे. मालिका असो, नाटक असो वा चित्रपट मराठी मनोरंजन विश्वात पटकथाना खूप महत्त्व दिलं जातं. मराठी सृष्टीत खरंतर कथेला फार महत्त्व दिले जाते आणि कथा हीच खरी हिरो असते आणि त्या कथेच्या अनुषंगाने कलाकारांना काम मिळत असते.
पण बॉलीवूड मध्ये तसं नाही. तिथं हिरो ना अधिक महत्त्व दिलं जातं. तिथं रोल जरी साध्या माणसाचा असला तरीसुद्धा हिरोच सुंदर आणि रुबाबदार दिसतो.आणि यावरून अर्थातच ग्लॅ मर, सुंदर आणि फिट दिसणं हाच बॉलीवूडचा केंद्रबिं दू आहे आणि याच कारणामुळे मराठीतील अनेक कलाकार त्यांच्या या चौकटीत बसत नाहीत.
मराठी प्रेक्षक कलाकाराचे रंगरूप नाही तर त्यांचा अभिनय पाहून त्यांच्यावर प्रेम करतात. त्यामुळे मराठीतील अनेक लोकप्रिय कलाकार हे अगदी सर्वसामान्य दिसतात आणि त्यांचं हे सर्वसामान्य दिसणं आणि असणं हेच बॉलीवूडला नको आहे. यासाठीच मराठी कलाकारांना बॉलीवूड मध्ये कायम दुय्यम, नोकर आणि तत्सम रोल दिले जातात. अर्थात स्मिता पाटील, नाना पाटेकर, अमोल पालेकर यांसारखे काही कलाकार त्याला अपवा द आहेत.”
वरील गोष्टीवरून असे लक्षात येते की बॉलीवूडकरांचा हा भे दभाव पणा योग्य नाही. कलाकाराला त्याच्या दिसण्यावरून नाही तर त्यांचे टॅ लेंट आणि अभिनय पाहून चित्रपटांमध्ये घेतले पाहिजे. फक्त रंग रूपावरूनच नाही तर कलाकारांना त्यांच्या टॅ लेंट वर योग्य तो रोल मिळाला पाहिजे.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा