या एका कारणांमुळे फक्त आणि फक्त हनुमान भक्तांवर ”शनि देवाची” कृपा कायम असते…कारण हनुमान आणि शनि हे…

धार्मिक

सर्वजण शनीला साडेसातीचा ग्रह असे म्हणतात. शनी लागला म्हणजे आपली साडेसाती चालू झाली. आता आपले वा ईट दिवस येणार. असं प्रत्येकाच्या मनात येत असतं. शनी देवाला खूश करण्यासाठी तसेच साडेसातीचा, शनीचा वा ईट प्रभाव कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो.

सूर्यपुत्र शनिदेव यांना न्या य देवता असे मा नले जाते. पण तुम्हाला हे माहिती आहे का? हनुमान भक्तांना शनिदेव कधीही त्रा स देत नाही. हनुमान भक्तांवर शनी देवाचा प्र कोप होत नाही. आणि याचेच कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर रावणाची बायको मंदोदरी ही ग र्भवती होती. आणि तेव्हा रावणाला आपला मुलगा हा शूर वीर, बलवान आणि दीर्घायुषी व्हावा असे वाटत होते.

आणि त्यामुळे आपला पुत्र हा अमर व्हावा म्हणून रावणाने त्याच्या मुलाच्या ज न्माच्या वेळी सर्व ग्रहांना आपल्या अधीन करून त्यांना आज्ञा दिली कि, सर्वांनी माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी शुभ आणि योग्य स्थानी राहावे. सर्व ग्रहांनी रावणाची आज्ञा पाळली पण शनी हा असा एकमेव ग्रह होता जो कुणालाही भीत नव्हता. आणि हे रावणाला माहीत होते. म्हणून रावणाने त्याला त्याच्या ठिकाणी बां धून ठेवले.

रावणाच्या पुत्राच्या जन्मावेळी आकाशात शनीचा प्रकोप होता. आज्ञा देऊन सुद्धा आपले न ऐकल्यामुळे रावणाने आपल्या तपोबलाने च्या जोरावर शनीला साखळदंडात बांधले. पण तरीही शनीने आपली दृष्टी वक्र केली. त्यामुळे रावणाचा पुत्र मेघनाथ अल्पायुषी ठरला. हे समजताच रावणाने क्रो धित होऊन आपल्या गदेने शनीच्या पायावर प्रहार केला. ज्यामुळे शनि देवाचा पाय देखील तु टला होता.

तेव्हापासूनच शनीची चाल तिरकी आणि धी मी झाली. रावणाने आपल्या तपोबलाच्या ब ळावर शनीला त्याच वेळी लंकेत कै द करून ठेवले. त्यानंतर हनुमान जेव्हा सीतेच्या शोधासाठी लंकेत गेले तेव्हा तिथे त्यांना शनि कै द असलेला दिसला. हनुमानाला पाहताच शनीने आपल्याला कै देतून सोडवण्याची विनंती हनुमानाला केली.

आणि त्यावेळी हनुमानाने त्याला रावणाच्या कैदेतून सोडवले. आणि तेव्हा शनीला घेऊन जात असताना वाटेत शनीने हनुमानला वर मागण्यास सांगितला. तेव्हा हनुमानाने वर मागितला कि, तू माझ्या भक्तांना अजिबात त्रा स द्यायचा नाही. आणि तसा वर शनीने दिला. पण काही वर्षांनंतर हनुमान राम भक्ती करत असताना शनि तिथून जात होता.

हनुमानाला पाहताच शनि हनुमान कडे आला आणि म्हणाला, हनुमंता कलियुग सुरू होत आहे. आणि आता माझा वास तुझ्यात असणार. तेव्हा हनुमंत म्हणाले, मी माझ्या प्रभूंचे ध्यान करत आहे. तेव्हा मला कोणीही स्पर्श करू शकत नाही. जरी तू माझ्या ठिकाणी आलास तरी तुझा माझ्यावर काहीही प्रभाव पडणार नाही. पण शनीने ऐकले नाही.

तो हनुमानाच्या डोक्यावर येऊन बसला. शनि म्हणाला, मी तुझ्या डोक्यावर अडीच वर्षे राहणार. त्या काळात तू भ्र मिष्ट होशील. त्यानंतर अडीच वर्षे तुझ्या हृदयात राहणार. त्या काळात तुझे शरीर रो गाचे भांडार होईल. आणि त्यानंतर अडीच वर्षे तुझ्या पायात बसणार. तेव्हा तू स्थिर न राहता पळत राहशील.

शनीचे हे बोलणे ऐकून हनुमानाने त्याला आपल्या शेपटीने गुंडाळून बां धून ठेवले. आणि हनुमान इकडे तिकडे पळू लागला, उड्डाण करु लागला. त्यामुळे शनीचे सगळे अंग दगडांना ठेचुन, खर्चटून गेले. शनीने हनुमानाची माफी मागितली आणि आपल्याला सोडण्या विषयी विनंती केली. शनीची ही दै न्यावस्था पाहून हनुमानाने त्याला सोडून दिले.

शनीने आपल्या अंगावरील जखमा बऱ्या करण्यासाठी हनुमानकडे उपाय मागितला. तेव्हा हनुमंताने त्याला तिळाचे तेल लावण्यास सांगितले. तेव्हापासून लोक मंदिरात शनिवारी हनुमानाची पूजा करतात आणि शनीला तिळाचे तेल वाहतात. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *