नमस्कार मंडळी, मंडळी आपला भारत देश हा प्रचंड ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पौराणिक वारसा लाभलेला आहे. हे आपण सर्वच जाणतो, इथल्या अनेक वास्तु ,किल्ले, धा र्मिक क्षेत्रे हा समृद्ध वारसा जपण्याचे काम करत आहेत. हे आपल्याला माहित आहेच. यापैकी अनेक ठिकाणे सर्वांच्या परिचयाची आहेतच. काही ठिकाणे ही नव्याने परिचित होत आहेत .
आजही आपण अशाच एका नवीन ठिकाणाची माहिती घेणार आहोत ज्याचा सं बं ध हा अनेक पौराणिक घटनां सोबत आहे. हे ठिकाण आहे उत्तर प्रदेश राज्यातील कानपुर या जिल्हा मध्ये वसलेले बिठूर हे ठिकाण. गंगा नदीच्या किनारी वसलेले हे ठिकाण अत्यंत पवित्र तसेच शांत व निर्मळ असे क्षेत्र आहे.
चला तर अधिक माहिती जाणून घेऊयात मंडळी, रामायण, वेद ,गीता इ. चे हिंदू धर्मातील महत्त्व तर आपण जाणतोच त्यामधील घटना या काल्पनिक नसून वास्तव आहेत याचे अनेक पुरावे आजही आपल्याला बघायला मिळतात. ज्यामुळे रामायण हे काल्पनिक काव्य नसून सत्य घटना आहे याची खात्री पटते. अशाच अनेक जागांपैकी एक असलेले एक ठिकाण म्हणजे बिठूर.
बिठूर तीर्थ क्षेत्र गंगा नदीवर वसलेल अत्यंत पवित्र व महत्त्वाचे ठिकाण मा नले जाते, याच ठिकाणी सृष्टीच्या निर्माणापूर्वी ब्रम्ह देवाने घोर तपस्या केली ते ठिकाण म्हणजे ब्रम्हावर्त घाट हा बिठूर मध्येच आहे. ध्रुवाने भगवान विष्णुंची तपश्चर्या केली ते ठिकाण सुद्धा बिठूर नगरी. कार्तिक पौर्णिमेला याठिकाणी कार्तिकी उत्सव हा संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे.
प्रभू श्री रामांनी सीता मातेचा त्याग केल्यानंतर जेव्हा त्यांना वनात वाल्मीकि ऋषिच्या आश्रमात पाठवले , तो पवित्र आश्रम येथेच आहे. सीता माता या घटनेनंतर येथेच राहू लागली. याच आश्रमात लव कुश यांचा ज न्म झाला. बिठूर हे ठिकाण अनेक पौराणिक घटनाशी सं बं धित आहे. वाल्मीकि ऋषिनी रामायण येथेच लिहिले व लव कुश यांना ते शिकवले.
मंदिरातील पुजार्यांच्या सांगण्यांनुसार या घटना सुमारे आठ लाख वर्षापूर्वी घडल्या आहेत .लव कुश यांनी शिक्षण येथेच घेतले.त्यांनी ज्या विहिरीत स्ना न केले त्याचे पाणी कधीच आटत नाही अशी आख्यायिका आहे. तसेच ते दोघे जेथे विद्याप्रात करून घेत होते ते वृक्ष आजही येथे असल्याचे सांगितले जाते सीता मातेने स्वयंपाका साठी वापरलेली भांडी येथे सुरक्षित ठेवली आहेत.
श्रीरामप्रभुच्या अश्व मेध य ज्ञासाठी घोडे चोरण्यासाठी आलेल्या हनुमानाला लवकुश यांनी यु द्ध करून येथेच बंदी केले होते. हनुमानानंतर जेव्हा लक्ष्मण गेले असता त्यांचे लव कुश यांच्या सोबत घनघोर यु द्ध केले व त्यांना बंदी केले. आपल्या प्रिय सेवकांचा शोध घेण्यासाठी प्रभू राम स्वत: निघाले असता त्यांची लव कुश यांच्याशी युद्ध झाले ते ठिकाण सुद्धा हेच आहे.
येथेच श्री रामांना लव कुश आपले पुत्र आहेत हे समजले होते. तेंव्हाच सीता व श्रीराम यांची भेट झाली. भेटी नंतर जेव्हा रामचन्द्रानि सीतेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सीता मातेने जेंव्हा धरणी कंपाची प्रार्थना केली व ती भूमीमध्ये विलीन झाली ते ठिकाण सुद्धा हेच आहे अशी मान्यता आहे.
या मार्गाला लोक पाताळा मध्ये जाण्याचा मार्ग मानतात. वाल्मिकी ऋषींचा आश्रम आजही येथे आहे. तर मंडळी अशा या शांत व पवित्र ठिकाणाला आपण कधी भेट देताय मग? तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.