मेष रास: जुलै २०२२ येत्या महिन्यात या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणारचं…शिवाय या संकटाना द्यावे लागू शकते तोंड..एकंदरीत…

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, प्रामाणिकपणा हा शिकवण्याची बाब नाही तो गुण र क्तात असावा लागतो, मेष राशीमध्ये तो गुण निसर्गतः बघायला मिळतो. कारण मेष राशीचा स्वामी मंगळ हा ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखला जातो. सेनापती जेव्हा प्रामाणिक असतो तेव्हाच राज्य चांगल्या प्रकारे चालतं. हा प्रामाणिक पणा मेष राशीमध्ये उपजत असतो.

जुलै महिन्याचा विचार केला असता तुमचा राशी स्वामी मंगळ हा तुमच्या राशीत विराजमान असतो, तिथे तो रुचक राजयोगाचा निर्माण करत आहे. मात्र तेथे राहू देखील विराजमान असल्यामुळे अंगारक योग देखील निर्माण होत आहेत. व्यक्तिमत्व – व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या राशीत होणारा मंगळ आणि राहू यांचा युती योग हा परस्पर विरोधाभास निर्माण करणारा आहे.

आपल्या आयुष्यात परस्पर विरुद्ध गोष्ट होत असतात म्हणजेच एक अत्यंत आनंदाची तर दुसरी दुःखाची, एक यशाची तर दुसरी पराजयाची गोष्ट घडत असते तसच काहीसं या महिन्यात घडणार आहे. एकीकडे राशीत निर्माण होणारे रुचक योग तुम्हाला कर्तृत्व देईल, यश देईल, यशाच्या संधी देईल तर दुसरीकडे निर्माण होणारा अंगारक योग तुम्हाला संताप, राग देईल ज्यामुळे तुम्ही यशाचा योग्य प्रकारे आनंद घेऊ शकणार नाही. हा विरोधाभास आहे त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होईल. मेष राशीच्या जातकानी या महिन्यात जाणीवपूर्वक कर्तृत्व वाढवावं, राग कमी करावा.

कुटुंब – या दृष्टीने विचार केला असता द्वितीय स्थान आणि त्या स्थानात विराजमान ग्रह, त्यावर दृष्टी टाकणारे ग्रह या सर्वांचे एक वेगळे महत्व असते. लहान, मोठे असे प्रवास तुम्हाला या काळात करावे लागतील, त्या प्रवासात अडी अडचणींचा सा मना देखील करावा लागू शकतो. मात्र मेष जातक हे सं घर्षशील असल्यामुळे अडचणीतून मार्ग काढत ते प्रवास करतील.

या काळात मेष जातकाना कौटुंबिक सौख्य बऱ्यापैकी प्राप्त होईल. धनाची आवक वाढेल कारण धनेश धनात ही स्थिती निर्माण होत आहे. धन आणि कुटुंबाच्या दृष्टीने हा अत्यंत शुभ काळ असलेला हा योग वाणीच्या दृष्टीने मात्र नकारात्मक होणार आहे. तुमची भाषा नको तेवढी उग्र होऊ शकते. काही लोक सर्वांसाठी खूप काही करतात पण बोलण्याने सगळं काही व्यर्थ होत तस तुमचं होऊ नये म्हणून सावधान व्हा.

परिश्रम- मेष रास ही चोवीस तास परिश्रम करणारी रास आहे मात्र परिश्रमेश जेव्हा परिश्रमाच्या व्ययातुन प्रवास करतो तेव्हा कुठे तरी थोडा आळस येण्याची शक्यता असते. या महिन्यात तुम्ही अत्यंत योग्य दिशेने परिश्रम करणार आहात त्यातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल. थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठा परिश्रमाचा असणार आहे, त्याचा सदुपयोग करा.

वास्तू, वाहन, जमीन – या दृष्टीने विचार केला असता वास्तू आणि वाहनाचे अत्यंत शुभ योग तुमच्या साठी या महिन्यात निर्माण होणार आहेत किंबहुना तुम्ही प्लॉट देखील खरेदी करू शकता. मात्र सुखशांतीच्या दृष्टीने तुमच्या घरातील सुखशांती मोठ्या प्रमाणात हरवलेली असेल. सुखशांती तुम्हाला जाणीव पूर्वक टिकवून ठेवावी लागेल.

शिक्षण- शैक्षणिक दृष्ट्या अभ्यासात मन न लागणे, आजच काम उद्यावर टाकण्याची प्रवृत्ती निर्माण होणे यासारखे प्रकार घडू शकतात त्यामुळे आपली इच्छा शक्ती वाढवून योग्य ते नियोजन करून जास्तीत जास्त अभ्यास करा. ज्ञान कारक ग्रह बृहस्पतीच्या आपल्या स्वराशी मध्ये दहाव्या भावात उपस्थित होण्याने विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल राहील विशेषतः उच्च शिक्षण घेण्याची तयारी करणाऱ्या जातकांना यश मिळेल. मनासारख्या विषय आणि संस्थानात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते.

नोकरी व व्यवसाय – नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे मेष जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी थोडा सं घर्ष तर व्यवसाईक जातकांसाठी बऱ्यापैकी आर्थिक लाभाच्या संधी या महिन्यात निर्माण होणार आहेत. या महिन्यात मेष जातकांसाठी अनेक शुभ संकेत देखील आहेत त्यात व्यक्तिमत्वामध्ये विकास घडून येणं, व्यवसायाची किंवा नोकरीची नवीन दिशा सापडणे असे अनेक शुभ संकेत आहेतच शिवाय आर्थिक कार्याची ओढ लागणे हा शुभ संकेत मेष जातकाना प्राप्त होणार आहे.

शुभ व ता ण त णावाचे दिवस – महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ व काही दिवस त णावाचे व संघर्षाचे जातात. या महिन्यात 5, 16 आणि 24 जुलै हे दिवस शुभ आहेत तर 3, 13 आणि 22 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *