नमस्कार मित्रांनो, तर आपल्याला माहित असेलच कि मेष रास ही राशीचक्रातील पहिली रास आहे आणि या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि ही अ ग्नीतत्वाची रास आहे. तर या राशीचे बोध चिन्ह आहे मेंढा. आणि आज आपण जानेवारी महिन्यातील ग्रहाची दिशा, आपले भविष्य, करियर, संतती, नोकरी, व्यवसाय, याबद्दल माहिती घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात
व्यक्तिमत्व:- व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तवंग राशी स्वामींची स्थिती अत्यंत महत्वाची ठरते. कारण राशी स्वामी म्हणजे तुम्ही स्वतः असता आणि तुम्ही आनंदी असाल तर जग आनंदी असते. तुमचा स्वामी स्वराशीचा मात्र स्व स्थानापासून अष्टमात विराजमान आहे त्यामुळे एकीकडे आढथळे आणि अडचणी निर्माण होतील तर एकीकडे त्या अडचणींवर मा त करून पुढे जाण्यासाठी सामर्थ्य देखील देईल. या पद्धतीने तुमचे या महिन्यातील व्यक्तिमत्व असणार आहे.
कुटुंब:- कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता कुटुंबात विनाकारण विसंगती निर्माण होईल. घरात सुंदर वातावरण असताना अचानक वातावरण बिघडेल. पण 16 जानेवारी नंतर या परिस्थितीत बदल जाणवेल. थोडक्यात महिन्याचा पहिला पंधरवडा हा कौटुंबिक दृष्ट्या सं घर्षाचा असेल व दुसरा पंधरवडा उत्तम असणार आहे.
वास्तु, वाहन, जमीन:- वास्तु, वाहन, जमीन यांचा विचार केला असता मेष जातकांसाठी बऱ्यापैकी दुसरा पंधरवडा उत्तम राहील. मेष राशीच्या लोकांसाठी पहिला पंधरवडा हा सं घर्षाचा तर दुसरा पंधरवडा हा भाग्याचा किंवा सहकार्याचा राहील. ही बाब लक्षात घेऊन त्यानुसार तुम्ही कामाचं नियोजन करा.
शिक्षण:- शिक्षण या दृष्टीने विचार केला असता जानेवारी 2022 हा महिना संपूर्णतः मेष जातकांसाठी आहे. मेष जातकाना या काळात खुप मोठ शैक्षणीक यश प्राप्त होऊ शकतं व अभ्यासाला योग्य ती गती व दिशा प्राप्त होऊ शकते त्यामुळे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या.
आ रोग्य:-हा महिना मेष जातकांसाठी संमिश्र फळ देणारा राहील म्हणजे महिन्यातील पहिला पंधरवडा त्रा साचा तर दुसरा पंधरवडा लाभाचा असेल. महिन्यातील दुसरा पंधरवडा हा आ रोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. पहिल्या पंधरवड्यात आ रोग्याच्या दृष्टीने स मस्येचा असू शकतात परंतू त्या अल्पकालावधीसाठी असतील.
नोकरी व व्यवसाय:- नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता या दोन्ही आघाड्यावर मेष जातकांसाठी हा काळ बऱ्यापैकी यशाचा राहील किंवा सामान्य यशाचा राहील असही आपण म्हणू शकतो. मेष राशीच्या लोकांना एक सवय असते वेगाने काम करायची पण आजूबाजूला त्यांच्या पद्धतीने काही घडत नाही त्यामुळे त्यांना सातत्याने आढतळे येण्याची सवय असते आणि ते पार काढून पुढे जाण्याच सामर्थ्य ही यांना निसर्गतः प्राप्त असतं. त्यामुळे नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यावर यांना यश प्राप्त होईल.
भाग्य:- भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता भागेश लाभ स्थानात विराजमान आहे म्हणजेच तुम्हाला भाग्याने लाभाची प्राप्ती होईल. इतर गोष्टीत विपरीत परिस्थिती असली तरी मेष जातकांसाठी भाग्याची साथ निश्चितच प्राप्त होईल. परिश्रम :- पराक्रम आणि परिश्रम या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्ही अत्यंत परिश्रम कराल, मूळ स्वभावानुसार ध डाडीने कार्य कराल पण त्यात विनाकारण आढतळे निर्माण होतील.
कर्म:- कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातक हे मूलतः कर्म प्रधान म्हणून ओळखले जातात. मेष राशीचा बोधचिन्ह बघितलं तर मेंढा हा सतत चालत असतो आणि अतिशय शांतपणे त्याचं कार्य चालू असत त्या दृष्टीने मेष जातक हे सतत कार्यरत असतात. आणि हा महिना तुमच्यासाठी कर्मप्रधान राहील त्याचा लाभ घ्या.
लाभ:- लाभाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना मेष जातकांसाठी लाभाचा राहील कारण भागेश तुमच्या लाभात येऊन बसला आहे जी अत्यंत शुभ स्थिती समजली जाते. त्यामुळे या महिन्यात तुम्हाला लाभाची प्राप्ती निश्चित होईल.
शुभ दिवस:- आयुष्य हे सुख दुः ख आणि चढ उताराणी भरलेलं असतं त्याप्रमाणे मेष जातकांसाठी 3, 12 आणि 22 जानेवारी हे दिवस शुभ असतील म्हणून जास्तीत जास्त महत्वाची काम या दिवशी करा. तर 1, 9 आणि 20 जानेवारी हे दिवस त णावाचे असतील म्हणून या वेळेत तुमची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून तुमचे स्वा स्थ्य टिकून राहील.